पुणे-मोबाइल शॉपीचे शटर उचकटून चोरट्यांनी ३० लाख रूपयांचे ९५ मोबाइल चोरून नेले आहेत. ही घटना धनकवडीतील श्रीराम कम्युनिकेशन शॉपीत घडली आहे. याप्रकरणी तरूणाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणाची धनकवडीतील चव्हाणनगर कमानीजवळ श्रीराम कम्युनिकेशन मोबाइल शॉपी आहे. २४ जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या शॉपीचे शटर उचकटले. आतमध्ये शिरून ३० लाख रूपयांचे ९५ मोबाइल चोरून नेले आहेत. दुसर्या दिवशी मोबाइल शॉपीत चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे पुढील तपास करीत आहेत.
मांगडेवाडीतील घरफोडीतून साडेपाच लाखाचा ऐवज चोरीस
पुणे शहरातील कात्रज भागातील एका सदनिकेचे कडी तोडून सोन्या चांदीच्या दागिने, रोख रक्कम असा ५ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल चोरटयांनी लांबविल्याची घटना घडली.याप्रकरणी मंगेश खुशालराव श्रीरामे (वय-३५, रा, मांगडेवाडी, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी हे मांगडेवाडी भागातील साई सुष्टी अपार्टमेंट मध्ये राहायला आहेत. तक्रारदार हे राहते घर बंद करून बाहेरगावी गेले होते त्यावेळी चोरट्यांनी फ्लॅटची कडी तोडून चोरट्याने सोन्या चांदीच्या दागिने, रोख रक्कम असा ५ लाख ३९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. पोलीस निरीक्षक एस कोळ पुढील तपास करत आहेत.