महिलांच्या नावावरील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलतीला मंजुरी

Date:

पुणे-: पुणे महापालिका हद्दीतील फक्त महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यतच्या निवासी मिळकतींना मिळकत करात ५० टक्के सवलत देण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. आता प्रस्ताव राज्य सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर या निर्णयाची प्रत्यक्षात अमंलबजावणी होणार आहे.
महानगरपालिका अधिनियमातील कलम १४०-अ आणि १४०-ब अंतर्गत करसवलतीसंबंधी तरतुदींचा आधार घेत हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र, या योजनेची अंमलबजावणी काही अटी व शर्तीवर आधारित असेल. त्यानुसार ३१मार्च २०२५ रोजी ज्या मिळकती महिलांच्या नावावर नोंद आहेत, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही सवलत केवळ आर्थिक वर्ष २०२६-२७मधील चालू मागणीपुरती मर्यादित राहील. दि. १ एप्रिल २०२६ पूर्वीची थकबाकी, तसेच व्याज, दंड आणि शास्तीवर कोणतीही सवलत लागू होणार नाही. अनधिकृत मिळकतींवर लागू असलेली शास्ती कायम राहणार असून, संबंधित कलम २६७ (अ) अंतर्गत नियम लागू राहतील. तसेच, ज्या मिळकतींना सध्या ४० टक्के सवलत लागू आहे, त्यांना ५० टक्क्यांऐवजी २५ टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव आहे. महिलांसाठी खास ही योजना आहे.सुमारे ७० हजार ७७३ मिळकतींना होणार लाभ
महापालिकेच्या नोंदीनुसार महिलाच्या नावावरील मिळकतींची संख्या या समारे सुमारे ७० हजार ७७३ इतकी आहे. या मिळकतींकडून मिळकत कराच्या रूपाने सुमारे ४०.४८ कोटी रुपये उत्पन्न मिळते. प्रस्तावित ५० टक्के सवलतीमुळे महापालिकेच्या उत्पन्नात अंदाजे २० कोटी रूपये कमी होणार आहे. या योजनेमुळे महिला सक्षमीकरणास प्रोत्साहन मिळणार आहे,महिलांच्या नावे मालमत्ता नोंदणीस प्रोत्साहन देणे व आर्थिक सक्षमीकरण, हाच योजनेमागील उद्देश आहे. असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुठा प्रदूषणावर विधानपरिषदेत आवाज; आरएमसी धोरण सभागृहासमोर मांडावे – डॉ. नीलम गोऱ्हे

आमदारांना त्रैमासिक माहिती द्यावी मुंबई.दि.१: पुणे शहरातील रेडिमिक्स काँक्रीट (आरएमसी)...

प्रभाग २५ मधील पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी

अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र...

परिक्षांचे खाजगीकरण होणार नाही

MPSCची भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी...