अयोध्येतील राम मंदिर चोरीचा निषेध अन आरोपींवर कारवाईची मागणी करणारी तहकुबी भाजपने चक्क फेटाळून लावली

Date:

पुणे महापलिकेत घडला अजब गजब प्रकार — जय श्रीराम म्हणत गैरबाबींना अनाहुतपणे दिला पाठींबा

पुणे :

काल पुणे महापालिकेच्या सकाळी ११ वाजताच्या सर्वसाधारण सभेला सव्वा अकरा वाजता सुरवात झाली तरीदेखील भाजपचे अनेक नगरसेवक सभागृहात आलेले नव्हते. या संधीचा फायदा घेत अयोध्येतील ऐतिहासिक श्रीराम मंदिरातील कथित चोरीच्या निषेधाची आणि चोरीवर कडक कारवाईची तहकूब काँग्रेसने मांडली. पण चक्क भाजपने यास विरोध करत हि तहकुबी फेटाळून लावली . भाजप च्या उपस्थित असलेल्या सर्व ३१ नगरसेवकांनी तहकुबीच्या विरोधात मतदान करत ती फेटाळली.
पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला सकाळी ११ वाजता सुरुवातहोणार होती. पण महापौर मंजूषा नागपुरे या १५ मिनिटे उशिरा आल्या. त्यामुळे सर्वसाधारण सभेचे कामकाज सकाळी ११.१५ वाजता सुरू झाले. त्यावेळी भाजपचे केवळ २१ नगरसेवक सभागृहात उपस्थित होते. नगरसेवकांची आवश्यक गणसंख्या (कोरम) पूर्ण न झाल्याने सभा तहकूब करावी लागते की काय?, अशी भीती सत्ताधारी नेत्यांना सतावत होती. यामुळे सभागृह नेते गणेश बिडकर आणि भाजपचे ज्येष्ठ नगरसेवकांची धावपळ सुरू होती .
काँग्रेसचे गटनेते चंदूशेठ कदम यांनी यावेळी अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित चोरीचा निषेध करणारी आणि चोरी करणारांना कडक शासन करण्याची मागणी करणारी तहकूबी मांडली. ‘हा श्रद्धेचा आणि सुरक्षेचा विषय असून यावर तातडीने चर्चा झालीच पाहिजे’ अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी केली.अरविंद शिंदे यांनी आम्हाला तहकुबीवर बोलायचे असे जाहीर सांगितले त्यावर महापौर मंजूषा नागपुरे यांनी विरोधकांना भाषणाची संधी दिल्यास मोठी नाचक्की होईल, हे ओळखून थेट तहकूबीवर मतदान घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे तहकूबीच्या विरोधात ३१ मते पडली, तर बाजूने उपस्थित विरोधकांची केवळ ४ मते पडली. भाजपने बहुमताच्या जोरावर ही तहुकबी फेटाळली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुठा प्रदूषणावर विधानपरिषदेत आवाज; आरएमसी धोरण सभागृहासमोर मांडावे – डॉ. नीलम गोऱ्हे

आमदारांना त्रैमासिक माहिती द्यावी मुंबई.दि.१: पुणे शहरातील रेडिमिक्स काँक्रीट (आरएमसी)...

महिलांच्या नावावरील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलतीला मंजुरी

पुणे-: पुणे महापालिका हद्दीतील फक्त महिलांच्या नावावर असलेल्या ५००...

प्रभाग २५ मधील पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी

अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र...

परिक्षांचे खाजगीकरण होणार नाही

MPSCची भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी...