‘मसाला किंग’ धनंजय दातार यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्याला शाहरुख खान, सोनू निगम यांची उपस्थिती

Date:

मुंबई | प्रतिनिधी

‘मसाला किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योगपती धनंजय दातार आणि वंदना दातार यांनी त्यांचा मुलगा रोहित दातार आणि सानिया नरवाडे यांच्या विवाहानिमित्त मुंबईतील फेअरमाँट हॉटेलमध्ये २३ व २४ जून रोजी दोन दिवसीय भव्य सोहळ्याचे आयोजन केले. या सोहळ्याला बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान, गायक सोनू निगम यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.

२३ जून रोजी झालेल्या संगीत समारंभाची सुरुवात विनोदी कलाकार कृष्णा अभिषेक आणि राजीव ठाकूर यांच्या सादरीकरणाने झाली. त्यानंतर शाहरुख खानने आपल्या लोकप्रिय संवादांद्वारे आणि नृत्याने उपस्थितांचे मनोरंजन केले. रोहित व सानियासह तसेच दातार कुटुंबासोबत त्याने रंगमंचावर ठेका धरला. ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील गाण्यावर झालेल्या नृत्याने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली.

यावेळी धनंजय दातार यांनी नवदाम्पत्याला आयुष्यभर सुख, समृद्धी आणि प्रेम लाभावे, अशा शुभेच्छा देत हा क्षण कुटुंबासाठी अत्यंत आनंदाचा असल्याचे सांगितले.

२४ जून रोजी झालेल्या स्वागत समारंभात सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी आपल्या गाण्यांनी वातावरण भारावून टाकले. या कार्यक्रमात रोहितची आई वंदना दातार यांनी सोनू निगम यांच्यासोबत ‘तेरे हाथ में, मेरा हाथ हो’ हे गाणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

सानियाचे आई-वडील सीमा आणि कुमार नरवाडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर रोहितचा भाऊ हृषिकेश दातार आणि पत्नी आकांक्षा यांनीही कुटुंबासह उत्साहाने कार्यक्रमात सहभाग घेतला.

दोन दिवस चाललेल्या या विवाहसोहळ्याचा समारोप स्वादिष्ट भोजन आणि संगीताच्या सुरेल मैफलीत झाला.

धनंजय दातार हे ‘आदिल ग्रुप’चे संस्थापक असून, भारतीय किराणा व मसाल्यांच्या जागतिक स्तरावरील अग्रगण्य व्यावसायिकांपैकी एक म्हणून त्यांची ओळख आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विधान परिषद उपसभापती:महाविकास आघाडीच्या उमेदवाराची ऐनवेळी माघार, महायुतीचे सचिन अहिर यांची बिनविरोध निवड

मुंबई-महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदावर अखेर शिवसेना (शिंदे गट) नेते...

टॉक्सिक’च्या जगात दमदार महिलांची एन्ट्री; ‘लेडीज अँड लेडीज’ व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई | रॉकिंग स्टार यश अभिनित बहुचर्चित 'टॉक्सिक : अ...

आकांक्षा रंजनच्या ‘इक्का’ची झलक; कोर्टरूम थ्रिलरमध्ये दिसणार नव्या अंदाजात

मुंबई | अभिनेत्री आकांक्षा रंजन आपल्या प्रत्येक नव्या भूमिकेत वेगळेपणा...

युवा महिला कुस्तीपटूंना आलिया भट्टची भेट

ऐल्फा  च्या प्रदर्शनापूर्वी आलिया भट्टने पुण्यातील जोग महाराज व्यायामशाळेला...