श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे कार्यक्रम ; प्रसिद्ध देवस्थानांच्या छायाचित्रांचा समावेश
पुणे : श्री विश्वकर्मा लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे संस्थेच्या दिनदर्शिका २०२३ चे प्रकाशन नुकतेच झाले. सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात झालेल्या कार्यक्रमात श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व श्री महालक्ष्मी मंदिराचे विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक विश्वकर्मा, सचिव रामअवध विश्वकर्मा, खजिनदार रामजनम विश्वकर्मा, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयराम शर्मा, उपाध्यक्ष नेमचंद विश्वकर्मा, प्रचारप्रमुख नरेंद्र शर्मा, संघटक सुनिल परदेशी, छोटेलाल विश्वकर्मा यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
अशोक विश्वकर्मा म्हणाले, प्रतिष्ठानची स्थापना सन २०११ साली झाली. प्रतिष्ठानतर्फे सामाजिक, सांस्कृतिक असे विविध कार्यक्रम वर्षभर राबविले जातात. दिनदर्शिका प्रकाशन हा देखील एक त्यातील कार्यक्रम असतो. यंदाच्या दिनदर्शिकेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरातील दत्तमहाराज आणि श्री महालक्ष्मी देवी यांसारख्या प्रसिद्ध देवस्थानांची छायाचित्रे घेण्यात आली आहेत.