Home Blog Page 1407

गरीब रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविणे हीच खरी सेवा-उपमुख्यमंत्री

पुणे, दि.६: महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्यावतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचा समारोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. आपल्या जीवनात पद मिळण्याचा आनंद क्षणिक असतो, मात्र उपचाराने बरे झालेल्या रुग्णाच्या चेहऱ्यावरचे हास्य बघून मिळणारा आनंद हा खरा आनंद असतो आणि आरोग्य सेवा देणे आणि गरीब रुग्णाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलविणे हीच खरी सेवा आहे, असे श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाला राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, धीरज घाटे, जगदीश मुळीक, राजन तेली, विद्याधर अनास्कर, सनी निम्हण आदी उपस्थित होते.

आरोग्य शिबिरात नि:स्वार्थ भावनेने सेवा देणाऱ्या डॉक्टरांचे आणि आयोजकांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, उत्तम शिक्षण आणि आरोग्य सेवा आपल्या कुटुंबियांना मिळाव्यात अशी गरीबातल्या गरीब माणसाची इच्छा असते. आज विज्ञानाने प्रगती केली असताना प्रदूषण, वातावरणातील बदल, बदलती जीवनशैली यामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे उपचारावरचा खर्च चिंतेची बाब झाली आहे. महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत ५ लाखापर्यंतचे उपचार मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात रुग्णालायांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. हे करतांना अनेक रोग नेहमीच्या यादीत नसतात पण त्यांच्यावर वेळेत उपचार करणे गरजेचे असते. यासाठी अशी शिबिरे उपयुक्त ठरतात.

राज्यात गिरीष महाजन यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. अनेक प्रथितयश डॉक्टरांनी या शिबिरात वैद्यकीय सेवा देण्याचे कार्य केले. या माध्यमातून शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचार करण्यात आले.या माध्यमातून आरोग्य सेवेचा पॅटर्न महाराष्ट्रात सुरू झाला. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्याची नवी श्रृंखला सुरू झाली आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

स्व.विनायक निम्हण हे जनसमान्यांच्या प्रति संवदेना असलेले, समाजाची स्पंदने ज्याला समजतात असे सामाजिक नेतृत्व होते. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम करताना त्यांचा वारसा आणि वसा त्यांच्या कुटुंबियांनी पुढे सुरू ठेवला. त्यामुळे ६० हजार रुग्णांना आज लाभ झाला आहे, असे श्री.फडणवीस म्हणाले.

ग्रामविकासमंत्री श्री.महाजन म्हणाले, राज्यातील सर्व जिल्ह्यात अशा स्वरूपाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येऊन नामांकित डॉक्टरांच्या सहकार्याने रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असल्यास गरजूंना मोफत वैद्यकीय सेवा दिली जाते. अवयवदान, रक्तदान, मुखकर्करोग, स्तनाचा कॅन्सर याबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. लोकसहभागातून हे सेवाकार्य करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून गरजूंना ५ लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचेही श्री.महाजन म्हणाले.

यावेळी निरामय फाऊंडेशनचे रामेश्वर नाईक, श्री.निम्हण यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. एकूण ९० बाह्यरुग्ण कक्षाद्वारे शिबिरात आरोग्य तपासणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते शिबिरासाठी आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी शिबिराला भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधला.
0000

महापुरुषांना जाती-धर्मात अडकवू नये : डॉ. श्रीपाल सबनीस

अंकल सोनवणे यांना ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान
पुणे : “महापुरुषांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. त्यांनी कार्य उभारताना जात किंवा धर्म बघितला नाही. समाजातल्या शेवटच्या घटकाचे कल्याण व्हावे, यासाठी या महापुरुषांनी आपले आयुष्य खर्ची घातले. त्यामुळे महापुरुषांना जाती-धर्माच्या चौकटीत अडकवू नये,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अंकल सोनवणे यांना डॉ. सबनीस यांच्या हस्ते ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आचार्य रतनलाल सोनग्रा, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “अंकल सोनवणे यांनी समर्पित भावनेने दलित चळवळीशी एकनिष्ठ राहून काम उभारले आहे. कृतिशील विद्वत्ता आणि अनुभवाचे शहाणपण त्यांच्याकडे आहे. दलित सेवक संघाच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात भरीव योगदान दिले. फुले-शाहू-आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचारांवर चालणारा हा ८३ वर्षाचा कार्यकर्ता आहे.”
अंकल सोनवणे म्हणाले, “आंबेडकरी चळवळीत काम करणे म्हणजे मिरवणे नाही. समाजाच्या हितासाठी, स्वाभिमानासाठी झोकून देऊन काम करावे लागते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून काम करत गेलो. अण्णाभाऊ साठेंचे विचार मार्गदर्शक ठरले. अण्णाभाऊंच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार मिळाला, याचा मनोमन आनंद आहे.”
आचार्य रतनलाल सोनग्रा म्हणाले, “अण्णाभाऊ साठे यांना जिवंतपणी कायम उपेक्षित ठेवले गेले. ते सर्व समाजाचे साहित्यिक होते. अण्णाभाऊ या देशाला एक अजरामर साहित्य देऊन गेले. त्या साहित्यातून आपण त्यांचे सातत्याने स्मरण केले पाहिजे.”

धंगेकरांना नाही प्राधान्य कॉंग्रेस भवनाला हवे-प्रमुख पदाधिकाऱ्याने नेत्याला दिले संकेत

पुणे- शंकरराव चव्हाण जेव्हा पुण्यात येत तेव्हा प्रथम कॉंग्रेस भवनात येत जेव्हा कलमाडी यांनी पुण्याच्या कॉंग्रेस पक्षावर वर्चस्व प्रस्थापित केले तेव्हा एकदा शंकरराव चव्हाण पुण्यात आले आणि नेहमीप्रमाणे ते कॉंग्रेस भवनावर आले तेव्हा ते येतील याची चाहूल लागल्याने कलमाडी यांनी अगोदरच सर्वांना भवनाला कुलूप लावून निघून जायला सांगितले . चव्हाण आले कुलूप पाहिले अक्षरशः काही वेळ प्रतीक्षा त्यांनी केली आणि अखेरीस श्रेष्ठींना भावना कळवून निघून गेले हा इतिहास असलेल्या कॉंग्रेस भवनात आज वेगळाच किस्सा ऐकायला मिळाला.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांची नुकतीच विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली. या निवडीनंतर प्रथमच त्यांनी पुणे शहराचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांना पुणे शहरातील काँग्रेसमधील गटबाजीचा अनुभव आला. पुणे काँग्रेसमध्ये दोन गट असल्याचे यानिमित्ताने समोर आले. शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि आमदार रवींद्र धंगेकर यांच्यात नाराजी असल्याचे समोर आले. त्यांच्या या दौऱ्यात नाराजीनाट्याची चर्चा चांगलीच रंगली होती.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पुणे दौऱ्यावर होते. ते पुण्यात येताच काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले. विजय वडेट्टीवार पुणे काँग्रेस भवनात जाणार होते. परंतु त्यांनी अचानक आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयात जाण्याचे ठरले.त्यानंतर त्यांच्या गाडीत असलेले शहराध्यक्ष अरविंद शिंदे नाराज झाले. ते थेट विजय वडेट्टीवार यांच्या गाडीतून उतरले अन् थेट काँग्रेस कार्यालयात आले. त्यामुळे वडेट्टीवार यांच्यासमोर धंगेकर गट आणि शहराध्यक्ष शिंदे गटातील गटबाजी समोर आली. या घटनेमुळे पुणे कॉंग्रेसमधील धूसफूस पाहायला मिळाली आहे.

गटबाजीचे तुफान माजलेल्या कॉंग्रेस भवनात आल्यावर वडेट्टीवार काय म्हणाले ठाऊक आहे

….हेवेदावे सोडले तर पुण्यातील ६ विधानसभा जिंकू – विजय वडेट्टीवारांनी कॉंग्रेस भवनातून केले आवाहान

पुणे-काँग्रेस पक्षाला संपूर्ण देशामध्ये सध्या चांगले वातावरण असून भाजपने ज्या पद्धतीने धार्मिक ध्रुवीकरण करत आहे सध्या अनेक राज्याचे अशांततेचे वातावरण आहे राज्य राज्यांमध्ये जे विरोधी पक्ष फोडून सत्ता स्थापनेचे जे उद्योग सुरू आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये भाजप विरुद्ध असंतोष आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आपापसातील हेवेदावे सोडून काँग्रेस पक्षाचे काम केल्यास पुणे जिल्ह्यातील विधानसभेच्या किमान सहा जागा आपण निश्चित जिंकू असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते श्री विजय वडट्टीवार यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना व्यक्त केले 

कालच श्री विजय वडेट्टीवार  यांची महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल ऐतिहासिक पुणे काँग्रेस भवनला भेट दिली यावेळीप्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी श्री वडेट्टीवार यांचा  यांचा फुले पगडी,पुष्पगुच्छ,शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला, प्रदेश अनुसूचित जाती विभाग व भवानी पेठ ब्लॉक काँग्रेस च्या वतीने ‘भारताचे संविधान देऊन अध्यक्ष सुजित यादव यांनी सत्कार केला यावेळी’ डरो मत  ‘ या लोगोचे उद्घाटन वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले. डरो मत हे राहुल गांधी यांचे ब्रीदवाक्य आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, अभय छाजेड माजी आमदार दीप्ती चौधरी, संगीता तिवारी नीता परदेशी , देवकी सदानंद शेट्टी, वैशाली मराठे शहर काँग्रेस हे सर्व पदाधिकारी तसेच ब्लॉगचे सर्व अध्यक्ष महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी विविध सेलचे सर्व प्रमुख यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अजित दरेकर यांनी केले तर आभार संगीता तिवारी यांनी मानले. सदर कार्यक्रमाप्रसंगी नवनिर्वाचित विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय  वडेट्टीवार यांचा यावेळी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी सत्कार केला.

कॉंग्रेस पक्षात गटबाजीचे तुफान

हर्षवर्धन पाटील कॉंग्रेसला सोडून गेले, अनंतराव गाडगीळ नाममात्र उरले ,आता आबा बागुल, रमेश बागवे हि कॉंग्रेसची तरुण कार्यकर्त्यांची फौज बाळगणारी मातब्बर मंडळी पुण्यात आहेत . ज्येष्ठही आहेत , युवाही आहेत ,पण ज्याचा त्याचा सन्मान होण्या ऐवजी भवनात आता अवमान होऊ लागल्याचे बोलू लागले आहे. जिथे कार्यकर्त्यांची ,पत्रकारांची तुफान गर्दी असायची आता तिथे ठराविक भागातील ठराविक चेहरेच दिसू लागले आहेत . चहा विक्रेत्याचे म्हणणे आहे, खारी सोडाच पण चहाही अमावस्या पौर्णिमेला थोडा फार विकला जाऊ लागला आहे . कॉंग्रेसला देशभर चांगले दिवस येत असताना पुण्यात असे काहोतेय याकडे लक्ष मात्र द्यायला प्रदेश अध्यक्ष वा कोणीही बड्या नेत्यांना वेळ नसावा. प्रभारी शहर अध्यक्ष कि शहर अध्यक्ष हा वाद निर्माण होण्यामागची कारणे नेतृत्वाची रस्सीखेच नाही तर पाडापाडी हेच आहे .निवडणुकीच्या तोंडावर होणारी कॉंग्रेसमधील गटबाजी निश्चितच तोंडापर्यंत आलेला यशाचा घास हिरावून नेईल यात शंका नाही.

गरीबांचे प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सहकार क्षेत्राने केले- केंद्रीय गृह व सहकारमंत्री

महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे दि.६: छोट्या स्वरुपातील गुंतवणूकीच्या आधारे मोठे कार्य उभारण्याचे काम सहकाराच्या माध्यमातून झाले असून गरीबांचे प्रगतीचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम सहकार क्षेत्राने केले, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केंद्रीय सहकारी संस्था निबंधक कार्यालयाच्या डिजीटल पोर्टलच्या उद्घाटन कार्यक्रमात केले. डिजिटल पोर्टलचा सर्वाधिक लाभ देशात सर्वात जास्त बहुराज्य सहकारी संस्था असलेल्या महाराष्ट्राला होईल, असेही श्री. शाह यावेळी म्हणाले.

चिंचवड येथे आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील,पालकमंत्री मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय सहकार सचिव ज्ञानेश कुमार, विशेष सचिव तथा केंद्रीय निबंधक विजय कुमार, राज्याचे सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र सहकाराची राजधानी
महाराष्ट्राचा ‘देशाच्या सहकार क्षेत्राची राजधानी’ असा उल्लेख करुन श्री. शाह म्हणाले, महाराष्ट्रातूनच सहकाराचे संस्कार देशात पोहोचले. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, धनंजय गाडगीळ, वैकुंठभाई मेहता अनेकांनी सहकार क्षेत्राला पुढे नेले. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यात सहकार क्षेत्राने चांगली प्रगती केली आहे. म्हणूनच केंद्रीय निबंधक कार्यालयाच्या डिजीटायझेशनच्या कार्यक्रमाचा शुभारंभ पुणे येथून करण्यात येत आहे. बहुराज्य सहकारी संस्थांचे कामकाज पाहणाऱ्या केंद्रीय सहकार निबंधकाचे कामकाज पूर्णत: डिजीटल होत आहे. संस्थांना आपल्या कार्यालयातूनच निबंधक कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे. सहकारी संस्थांशी संबंधित सर्व कामकाज लक्षात घेऊन हे पोर्टल बनविण्यात आले आहे.

सहकारात छोट्या गुंतवणुकीतून मोठे उद्योग उभे राहिले. १०० रुपये गुंतवणूक करणाऱ्या ३६ लाख महिलांच्या गुंतवणूकीमुळे ६० हजार कोटी लाभ मिळवणारी अमूल सारखी संस्था उभी राहिली आहे. सहकाराचा अर्थ छोटी गुंतवणूक करणाऱ्यांना एकत्र करून मोठा उद्योग स्थापित करणे आहे. लहान लहान व्यक्तीला आपले जीवन उन्नत करण्याची संधी देणे, देशाच्या आर्थिक प्रगतीत योगदान देण्यासाठी त्याला एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि सहकाराच्या माध्यमातून त्याच्या जीवनाचा उद्धार करणे हीच ‘सहकारातून समृद्धी’ आहे. यासाठीच दोन वर्षापूर्वी केंद्रामध्ये सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली. नव्याने सुरू करण्यात आलेल्या पोर्टलमुळे १ हजार ५५५ बहुराज्य सहकारी संस्थांना याचा लाभ होईल. यातील सर्वाधिक ४२ टक्के संस्था केवळ महाराष्ट्रातील आहेत. या संस्थांची सर्व कामे पोर्टलद्वारे होतील.

पुढील टप्प्यात विविध राज्यातील ८ लाख सहकारी संस्थांचे संगणकीकरणही करण्यात येणार आहे. त्यामुळे कामकाजात गती येईल. पारदर्शकता, जबाबदारीचे तत्व आणि आधुनिकतेच्या आधारे सहकार चळवळ पुढे जाईल. पारदर्शकता वाढवून जबाबदारी निश्चित केल्यास समाजाच्या सर्व घटकांना सहकाराशी जोडता येईल. सहकारी संस्थांच्या क्षमतांचा उपयोग करून विकासाला गती देण्याचे कार्य करावे लागेल. बहुराज्य सहकारी संस्था कायद्यात सहकार क्षेत्राच्यादृष्टीने अनेक चांगल्या तरतूदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पारदर्शकतेसह संस्थांची कार्यक्षमताही वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. युवकांना सहकार चळवळीशी जोडल्यास सहकार क्षेत्राचा वेगाने विकास होईल, असेही ते म्हणाले.

सहकाराच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीला चालना

नैसर्गिक शेती करण्यासाठी अनेक शेतकरी पुढे येत आहे. त्यांना आपल्या उत्पादनाचे मूल्य मिळत नाही. त्यांच्यासाठी बहुराज्य सहकारी संस्था उभारण्यात येईल. ही संस्था नैसर्गिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सोबत घेण्यासोबत ‘भारत’ ब्रँण्डच्या माध्यमातून उत्पादनाचे मार्केटींग करून त्याचा फायदा शेतकऱ्याच्या खात्यात पाठविण्याचे काम होईल. शेतकरी आपल्या चांगल्या उत्पादनांना निर्यात करू शकतील. बहुराज्यीय निर्यात समिती शेतकऱ्यांकडून उत्पादन खरेदी करून त्याचे निर्यात करेल आणि त्याचा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात जाईल.

महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाश शिंदे म्हणाले, विशेषत: पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे योगदान मोठे आहे. राज्यात २ लाख २० हजार सहकारी संस्था असून ६०० पेक्षा अधिक बहुराज्य संस्था आणि सोसायट्या कार्यरत आहेत. केंद्र शासनाचे नवे पोर्टल सहकार क्षेत्राच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल.

ते पुढे म्हणाले, केंद्राच्या सहकार विभागाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकार सहकार क्षेत्राच्या विकासाकडे अत्यंत सकारात्मकतेने लक्ष देत आहे. नव्या पोर्टलमुळे नोंदणीची स्थिती, नोंदणी, आदेश, सोसायटीचे प्रमाणपत्र, विवरण सामान्य शेतकऱ्यांना उपलब्ध होतील.

राज्यात सहकारी संस्थांमध्ये ५ कोटी २८ लाख सदस्य आहेत. सहकारी बँकेमधील ठेवी २ लाख ३१ हजार कोटीपेक्षा जास्त आणि खेळते भांडवल साडेचार लाख कोटींपेक्षा जास्त आहेत. या चळवळींचा मोठा आधार प्राथमिक कृषी सहकारी संस्था (पॅक्स) आहेत. देशातील सर्वाधिक २१ हजार पॅक्स महाराष्ट्रात आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. या संस्थांना बळकटी देण्याचे कार्य केंद्राच्या सहकार मंत्रालयाने केले आहे.

शेतकऱ्यांला केंद्र बिंदू मानून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे कार्य केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून केले. सहकार क्षेत्र कठीण काळातून जात असतांना ‘सहकार से समृद्धी’ या उद्देशाने सहकार विभागात अनेक सकारात्मक बदल करण्यात येत आहेत. सहकार क्षेत्रात पारदर्शकता येत आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा १० हजार कोटी रुपयांचा आयकर माफ करण्याचा मोठा निर्णय घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे कार्य त्यांनी केले. यामुळे साखर उद्योगालाही नवसंजीवनी मिळाली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. पॅक्सच्या संगणकीकरणामुळे राज्यातील १२ हजार सहकारी संस्थांना याचा फायदा होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

देशात बहुउद्देशीय कृषी व्यवसाय संस्थेचे आदर्श प्रारूप महाराष्ट्रात तयार होईल- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, केंद्राच्या आणि राज्य शासनाच्या योजनांचे एकत्रिकरण करुन राज्यात सहकारी संस्थांच्या विकासाला चालना देण्यात येईल. महाराष्ट्राने जागतिक बँकेच्या सहकार्याने स्मार्ट प्रकल्प सुरू केला आहे. १० हजार गावात पॅक्सला कृषी व्यवसाय संस्थात परिवर्तीत करण्यात येत आहे. त्यांना प्रशिक्षण देऊन, वितरण साखळीचा भाग करून सक्षम करण्याचा प्रयत्न आहे. महात्मा गांधी तसेच संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामस्वराज्याचे स्वप्न यामुळे साकार होईल. या माध्यमातून देशात पहिले बहुउद्देशीय कृषी व्यवसाय संस्थेचे आदर्श प्रारूप महाराष्ट्रात तयार होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

श्री.फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि त्यानंतर देशात. सर्वाधिक ग्रामपातळीपर्यंत सहकार महाराष्ट्रात पोहोचला. सहकारातून समृद्धी येऊ शकते अशी व्यवस्था महाराष्ट्राने उभी केली. त्यातून मोठे सहकारक्षेत्र महाराष्ट्रात निर्माण झाले. याचमुळे केंद्राने सहकार क्षेत्रासाठी नवा कायदा केला आणि कायद्याच्या अंतर्गत गावपातळीवर सहकार नेण्यासाठी व्यवस्था उभी केली. ही व्यवस्था डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून सुलभतेने सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक, सुलभ पोर्टल तयार केले. या पोर्टलचे उद्घाटन सहकार पंढरी असलेल्या महाराष्ट्रात होत आहे.

केंद्रात सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना जास्त पैसे दिले म्हणून साखर कारखान्यांना आयकर लावण्याचे धोरण मंत्री अमित शाह यांनी बदलले आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले. स्वत: सहकार क्षेत्रात चांगले काम केले असल्याने या क्षेत्राविषयी त्यांना तंतोतंत माहिती असल्याने वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न त्यांनी सोडविला. एनसीडीसीच्या माध्यमातून साखर कारखान्यांना मदत करण्याचे आणि साखर उद्योगाच्या संदर्भातील चांगले निर्णय घेतले. सहकार विभागाची संवेदनशीलता यानिमित्ताने बघायला मिळाली, असेही ते म्हणाले.

सहकारी संस्थेला मजबूत करण्याचा कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतला आहे.नवीन कायद्याच्या माध्यमातून बहुराज्य सहकारी संस्थांना पारदर्शक कारभाराला मदत होणार आहे. सामान्य माणसाचा पैसा बुडणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. गावापर्यंत समृद्धी पोहोचण्यासाठी सहकार क्षेत्र मजबूत होणे आवश्यक आहे, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

आयकराचा प्रश्न सोडविल्याने सहकारी साखर कारखान्यांना मोठा दिलासा- उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, साखर उद्योग आयकर संदर्भातील समस्येचा गेल्या २२ वर्षात सामना करत होते. यामुळे सहकारी साखर कारखाने बंद होण्याची शक्यता होती. राज्यातील कारखान्यांना वारंवार आयकर विभागाच्या नोटीसा येत होत्या. केंद्र सरकारने सहकार क्षेत्राला पुढे नेण्यासाठी सहकार विभागाची स्थापना केल्यानंतर ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना समस्येपासून सोडविण्यासाठी अमित शाह यांनी आयकराचा हा प्रश्न सोडविल्याने साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘सहकारातून समृद्धी’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या उद्दीष्टांच्या पूर्ततेसाठी सहकार मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रात अनेक चांगले बदल होत आहेत. सहकार क्षेत्रातील सदस्यांच्या सहमतीने देशाचे व्यापक हीत लक्षात घेऊन हे बदल करण्यात येत आहेत. देशाच्या सहकाराचा १२० वर्षाचा इतिहास आहे. या कालावधीत सहकार ग्रामीण भागातील घराघरात पोहोचला आहे.

सहकाराने ग्रामीण भागाच्या विकासात योगदान दिले आहे. प्रथमच केंद्र स्तरावर सहकार मंत्रालयाची स्थापना करण्याचा निर्णय होणे स्वागतार्ह आहे. सहकार मंत्रालयाच्या प्रत्येक प्रयत्नांना राज्याची साथ राहील. सहकाराच्या क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातची चांगली कामगिरी झाली आहे. बहुराज्य सहकारी संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टल उपयुक्त ठरेल आणि सहकार क्षेत्रातील समस्या दूर होण्यास मदत होईल. सहकार क्षेत्र विश्वासाने पुढे जाईल आणि नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विशेष सचिव श्री. विजय कुमार प्रास्ताविक भाषणात म्हणाले, बहुराज्य सहकारी संस्थांसाठी आजचा कार्यक्रम महत्वाचा आहे. बऱ्याच दिवसापासून प्रलंबित बहुराज्य सहकारी संस्था कायदा (एमएससीएस ॲक्ट) हा २ ऑगस्टपासून लागू झाला आहे. या अधिनियमाशी निगडीत नियम ४ ऑगस्टपासून लागू करण्यात आले असून आज त्याविषयीच्या पोर्टलचे उद्घाटन करण्यात येत आहे. यामुळे बहुराज्यीय सहकारी संस्थांचे कामकाज अधिक सुरळीत होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रीय साखर महासंघाच्या वतीने सहकार मंत्री अमित शाह यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच या डिजिटल पोर्टल साठी योगदान दिलेल्या विद्यार्थ्यांनाही मंत्रिमहोदयांच्या हस्ते विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000

अमित शहा यांना भेटल्याचे वृत्त खोटे;मी पवारांसोबत होतो आहे आणि पुढेही राहणार – जयंत पाटील

मुंबई-मी काल शरद पवारांसोबत होतो आणि पुढेही राहणार माझ्याकडून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मी अमित शहांना भेटलो या बद्दल तुम्ही संशोधन करा, घरी बसून बातम्या केल्या गेल्याचा टोलाही शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.दरम्यान जयंत पाटील पुढे बासेलताना म्हणाले की, माझी अमित शहा यांच्यासोबत काहीच चर्चा झाली नाही. मी केवळ शरद पवारांशी चर्चा करत माझ्याघरी येत आहे. अजित पवार गट बातम्या पेरतो असे मी म्हटणार नाही, बातम्या पेरणारे तुम्ही असा टोला मिडीयाला लगावला आहे. असा गैरसमज पसरवणे चुकीचे आहे, बातमी देणाऱ्यांनी अभ्यास करुन बातमी द्यायला हवी, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, मी काल संध्याकाळी शरद पवार यांच्या घरी होतो. त्यानंतर मी आणि काही सहकारी माझ्या निवासस्थानी रात्री दीड वाजेपर्यंत चर्चा करत बसलो होतो. यानंतर मी सकाळी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली. यात मी मुंबईहून कधी पुन्यात गेलो असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईहून पुण्यात जाणे आणि तिथून इथपर्यंत येणे केवळ अलाउद्दीनच्या चिरागच शक्य आहे. मी शरद पवार यांच्यासोबत आहे. लोकांमध्ये माझ्याबद्दल संभ्रम पसरवला जात आहे, पण महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे की मी काय आहे?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांची भेट घेतली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अमित शहांची भेट घेण्यापूर्वी अजित पवार यांनी जयंत पाटील यांना फोन केला होता. यावेळी त्यांना अमित शहांच्या भेटीसाठी अजित पवारांनी बोलावले होते. त्यानंतर जयंत पाटील व अमित शहा यांची भेट झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, जयंत पाटील व अमित शहा यांच्या भेटीबाबत अद्याप कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 4 विद्यमान आमदार अजित पवार गटासोबत येणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. तसेच, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या आगेमागे हा मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार होईल. त्यामध्ये 6 भाजपला, 4 शिंदेसे

आंतरराष्ट्रीय डिजिटल पत्रकारिता चळवळीचे नेतृत्व महाराष्ट्राने करावे: पत्रकारांचा सूर.

दिल्लीत प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे
“दि इंडिपेंडंट व्हाइस”चा शुभारंभ!

नवी दिल्ली,दि.६:-नव्या जमान्याचा डिजिटल पत्रकारिता आदर्श,मूल्य, कायदा आणि गतिमानता या तत्त्वांवर उभी रहावी यासाठी महाराष्ट्रातून सुरु झालेली डिजिटल पत्रकारिता संघटन चळवळीला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्यासाठी महाराष्ट्राने नेतृत्व करावे असा सूर येथे पत्रकारांतून उमटला. एडव्होकेट अमोल पाटील यांच्या “दि इंडिपेंडंट व्हाइस”या आंतरराष्ट्रीय विषयांना वाहिलेल्या इंग्रजी न्यूज पोर्टलचा शुभारंभ प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या सभागृहात झाला.यावेळी पत्रकारांनी भावना व्यक्त केल्या.
www.the independentvoice.in या न्यूज वेब पोर्टलचे यशस्वी उद्घाटन झाले.यावेळी मुख्य संपादक अमोल पाटील यांनी पत्रकारिता आणि डिजिटल बातम्यांना युगाच्या गतिमान अत्याधुनिक तंत्राला पत्रकारिता मूल्यांची जोड देण्याचा निर्धार व्यक्त केला.“दि इंडिपेन्डस व्हाईस” वाचकांच्या विविध आवडी आणि माहितीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. आमचे अनुभवी पत्रकार आणि तंत्रज्ञान-जाणकार सामग्री निर्मात्यांची टीम जगभरातून अचूक, संबंधित आणि अद्ययावत बातम्या देण्यासाठी वचनबद्ध आहे,असेही ते म्हणाले.
प्रेस क्लब ऑफ इंडिया, नवी दिल्ली येथे उद्घाटन प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार व डिजिटल मीडिया एडिटर अँड जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा माने आणि कुमार पंकज नवी दिल्ली तसेच दि इंडिपेंडेंटचे मुख्य संपादक अॅड अमोल आर पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कुमार पंकज यांनी आपल्या भाषणात वेब न्यूज पोर्टलच्या विषयाची गुणवत्ता आणि विशिष्टतेचे महत्त्व यावर लक्ष केंद्रित केले.
राजा माने यांनी कोविड नंतरच्या पत्रकारितेच्या युगात डिजिटल बातम्यांचे महत्त्व पटवून दिले. दि इंडिपेन्डस व्हाईस या अधिकृत लॉन्चद्वारे त्यांनी त्यांच्या डिजिटल मीडिया पोर्टल असोसिएशनला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा
मानस व्यक्त केला.
प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अधिकारी, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचे पत्रकार आणि त्यांच्या अतुलनीय समर्थनासाठी आणि उत्साही भागीदारांचे आम्ही मनापासून आभार मानतो. विकसित होत असलेल्या बातम्यांच्या गरजा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी आम्ही [दि इंडिपेन्डस व्हाईस ] सतत वर्धित आणि विस्तारित करण्याचे वचन देतो.

पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह चंद्रकांत पाटील यांची माहिती

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न पावसाळी अधिवेशनात करण्यात आला. अधिवेशनात 41 हजार 243 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

पुरवणी मागण्यांद्वारे प्राप्त निधी शेतकऱ्यांसाठी नमो सन्मान योजना, नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना अशा सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या विविध योजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

विधानभवनात पावसाळी अधिवेशनाच्या समारोपानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2023 चे पावसाळी अधिवेशन विधेयकांची माहिती

पूर्वीची प्रलंबित विधेयके : 02

नवीन सादर विधेयके: 27

एकूण : 29

दोन्ही सभागृहात संमत : 18

संयुक्त समितीकडे पाठविलेली विधेयके: 07

विधान परिषदेत प्रलंबित: 01

विधानसभेत प्रलंबित: 02

मागे घेण्यात आलेली विधेयके : 01

एकूण : 29

दोन्ही सभागृहात संमत

(1) महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (सुधारणा) विधेयक,

(ग्राम विकास विभाग) (जातवैधता प्रमाणपत्र दाखल करण्यास मुदत देणे)

(2) महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक, (वित्त विभाग)

(3) महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना (सुधारणा) विधेयक, (नगर विकास विभाग) (नियोजन प्राधिकरणाने राज्य शासनाकडे विकास योजनेचा मसूदा सादर करण्याचा कालावधी वाढविण्याची तरतूद करणे)

(4) महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन विधेयक, (वित्त विभाग)

(5) एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, पुणे, विधेयक, (स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(6) डीईएस पुणे विद्यापीठ, पुणे, विधेयक, (स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठ) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(7) महाराष्ट्र (ग्रामपंचायतींच्या, जिल्हा परिषदांच्या व पंचायत समित्यांच्या विवक्षित निवडणुकांकरिता) वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत तात्पुरती वाढविणे विधेयक, (ग्राम विकास विभाग)

(8) महाराष्ट्र पशु व मत्स्य व्यवसाय विज्ञान विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, (कृषि व पदुम विभाग)

(9) महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मुलन व पुनर्विकास) (सुधारणा, शिखर व इतर तक्रार निवारण समित्यांच्या नियमांचे व अधिसूचनेचे पुनर्अधिनियमितीकरण व विधिग्राह्यीकरण)

(10) महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक सुविधा विधेयक, (उद्योग उर्जा व कामगार विभाग) (महाराष्ट्र राज्यात औद्योगिकीकरणाला चालना देण्याची गरज लक्षात घेता, राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तसेच राज्यमध्ये व्यवसाय सुलभीकरण करण्यासाठी उद्योजकांना आवश्यक असलेले परवाने, संमती विहित वेळेत मिळवण्यासाठी तसेच त्याद्वारे उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी एक खिडकी योजनेला वैधानिक दर्जा मिळवण्याची तरतूद)

(11) महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान याकरिता नुकसानभरपाई प्रदान करणे विधेयक, (वन विभाग)

(12) महाराष्ट्र दिवाणी न्यायालय (सुधारणा) विधेयक, (विधी व न्याय विभाग)

(13) महाराष्ट्र पुणे शहर महानगरपालिका कराधान (भूतलक्षी प्रभावाने कराधान नियमांचे अधिनियमन व सुधारणा आणि विधिग्राह्यीकरण) विधेयक, (नगर विकास विभाग)

(14) महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) विधेयक, (पर्यावरण व वातवरणीय बदल विभाग)

(15) नोंदणी (सुधारणा) विधेयक, (दस्त नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे विहित करण्याची व विवक्षित दस्तऐवजांची नोंदणी नाकारण्याची तरतूद करणे) (महसूल विभाग)

(16) महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, (विद्यापीठाकडून शासनास अहवाल सादर करण्याचा कालावधी निश्चित करण्याकरीता मुख्य अधिनियमाच्या कलम 35 व कलम 37 यांमध्ये योग्य त्या सुधारणा करण्याकरीता) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(17) लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान (एलआटी) विद्यापीठ, नागपूर विधेयक, 2023 (विद्यापीठ स्थापन करणे व विधि संस्थापित करणे) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

(18) महाराष्ट्र सहकारी संस्था (तिसरी सुधारणा) विधेयक, 2023 (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग) (अध्या. क्र. 2 चे रुपांतरीत विधेयक) (सदस्यांच्या सक्रिय सहभागाची सुनिश्चिती करण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठीची तरतूद करणे)

संयुक्त समितीकडे प्रलंबित

(1) महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग)

(2) महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजिवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) व महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) (सुधारणा) विधेयक, 2023 (उद्योग उर्जा व कामगार विभाग)

(3) महाराष्ट्र (भेसळयुक्त, अप्रमाणित किंवा गैर छापाची बियाणे, खते किंवा किटकनाशके यांच्या विक्रीमुळे व वापरामुळे झालेल्या नुकसानीकरिता) शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी विधेयक, 2023

(4) किटकनाशके (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(5) बि-बियाणे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(6) अत्यावश्यक वस्तू (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2023

(7) महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) विधेयक, 2023

विधान परिषदेत प्रलंबित

(1) स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

विधानसभेत प्रलंबित विधेयके

(1) महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारणा) विधेयक, 2023. (लॉकिंग पिरेड कमी करणे) (गृहनिर्माण विभाग)

(2) महाराष्ट्र सहकारी संस्था (दूसरी सुधारणा) विधेयक, 2023 (सहकार, वस्त्रौद्योग व पणन विभाग)

मागे घेण्यात आलेली विधेयके

(1) महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) (सुधारणा, शिखर तक्रार निवारण समितीच्या नियमांचे व अधिसूचनेचे पुनर्अधिनियमितीकरण व विधिग्राह्यीकरण) विधेयक, 2023कलम 35-3 ची तक्रार निवारण समिती स्थापन करणे (गृहनिर्माण विभाग)

‘दादा, बऱ्याच काळाने तुम्ही योग्य जागी बसलात’; अमित शाह यांचं वक्तव्य

पुणे- सहकार विभागाच्या कार्यक्रमासाठी अमित शाह पुण्यात आले आहेत. यावेळी बोलताना अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री झाल्याबाबत अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या. ‘दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यादा पुण्यात आलो आहे. मी पहिल्यांदा त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसलो आहे. मी पवार यांना सांगू इच्छीतो की खूप काळानंतर तुम्ही योग्य ठिकाणी बसला आहात. तुमच्यासाठी हीच जागा योग्य होती, पण तुम्ही उशिर केलात,’ असं अमित शहा म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

सहकार विभागाच्या ‘डिजिटल पोर्टल’ चा शुभारंभ अमित शाहांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अमित शहा कार्यक्रमात बोलताना सुरुवातीलाच त्यांनी अजित पवारांबाबत भाष्य केलं. ते म्हणाले की, ‘दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच पुण्यात आलोय आणि पहिल्यांदाच व्यासपीठावर एकत्र आहोत. दादा आता योग्य जागी बसले आहेत. पण, त्यांनी खूप उशिर केला.’ अमित शहा यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी नमस्कार करत प्रतिसाद दिला. अमित शाह पुण्यात येणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

सहकार विभागाचे संपूर्ण पोर्टल आपण आणत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारातून समृद्धीकडेचा संकल्प घेतला आहे. मोदी यांनी 9 वर्षात देशातील 60 कोटी गरीब लोकांना सहकार क्षेत्रातून मदत केली आहे. गरीबांच्या प्राथमिक गरजा असतात. त्यांच्या इच्छा गेल्या 70 वर्षात पूर्ण झाल्या नव्हत्या. पण, पंतप्रधान मोदी यांनी फक्त 9 वर्षात सगळं काम एकाच क्षणात करुन टाकलं आहे. गरिबांसाठी घर, वीज, शौचालय, बँक खाते अशा सर्व गरजा मोदींनी पूर्ण केल्या आहेत, असं अमित शाह म्हणाले.

गुजरात मधील 36 लाख महिला 100 रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक करुन 60 हजार कोटीचा फायदा ‘अमुल’च्या माध्यमातून कमावत आहेत. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून गरिबाला एक व्यासपीठ मिळावं यासाठी सहकार खातं निर्माण केलं गेलंय. विशेष म्हणजे एकट्या महाराष्ट्रात 42 टक्के सहकारी संस्था आहेत. एकीकडे देश तर एकीकडे महाराष्ट्र असं चित्र आहे, असं म्हणत शाह यांनी राज्याचं कौतुक केलं. सहकार विभागाचं काम संगणीकृत केलं जाणार आहे. त्यासाठीच डिजिटल पोर्टल आणलं जात आहे. सहकार क्षेत्रात पारदर्शकता आवश्यक आहे, त्यासाठीच हा प्रयत्न असल्यातं शाह म्हणाले.

मोहिनीअट्टम नृत्य कला तरुणाई पर्यंत पोहोचली पाहिजे-ज्येष्ठ मोहिनीअट्टम नृत्यगुरु डॉ. दीप्ती भल्ला

: भारतीय विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स तर्फे मोहिनीअट्टम नृत्य कलेवर कार्यशाळा
पुणे: काळाबरोबर कलेमध्ये बदल होत असतात. त्याचप्रमाणे मोहिनीअट्टम या कलेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बदल घडले आहेत. ही कला प्रामुख्याने दरबारी कला म्हणून ओळखली जात होती. तामिळनाडू आणि केरळ मधील अनेक मंदिरांमध्ये आजही मोहिनीअट्टम कलेच्या परंपरा दिसून येतात. मोहिनीअट्टम ही कला केवळ दक्षिणात्य लोकांसाठीच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये या कलेचा प्रचार आणि प्रसार व्हायला हवा. ही कला अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे त्यासाठी या कलेमध्ये अधिक संशोधन झाले पाहिजे,असे मत ज्येष्ठ मोहिनीअट्टम नृत्यगुरु डॉ. दीप्ती भल्ला यांनी व्यक्त केले. 
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे डॉ. दीप्ती भल्ला यांच्या मोहिनीअट्टम नृत्य कलेवर आधारित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मोहिनीअट्टम या कलेचा प्रवास उलगडून सांगितला. स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स चे संचालक डॉ.शारंगधर साठे, भारती विद्यापीठ निवृत्त उपकुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील, ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता चापेकर, डाॅ. देविका बोरठाकूर आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. दीप्ती भल्ला यांनी मोहिनीअट्टम नृत्य शैलीतले बारकावे उपस्थितांना सांगितले.
डॉ. दीप्ती भल्ला म्हणाल्या, नृत्य, नाट्य, संगीत या केवळ कला नाही तर जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. कला ही माणसाचे जीवन अधिक सुंदर करते. मोहिनीअट्टम अशाच प्रकारची एक कला आहे या कलेवर अधिकाधिक संशोधन करून ती कला तरुणांपर्यंत पोहोचविली पाहिजे.
डॉ. सुचेता चापेकर म्हणाल्या, नृत्य हे एक प्रकारे संगीताचे दृश्य माध्यम आहे. मोहिनीअट्टम ही कला इतर दाक्षिणात्य नृत्याच्या तुलनेत लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. ही कला विविध माध्यमातून लोकांपर्यंत आणि विशेषतः तरुण कलाकारांपर्यंत पोहोचली पाहिजे. 
डॉ. शारंगधर साठे म्हणाले, दिग्गज कलाकारांचा विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलेतील वाटचाल  योग्य दिशेने करता येते. इतर दाक्षिणात्य नृत्यकलेप्रमाणेच मोहिनीअट्टम नृत्य प्रकारावर आधारित अभ्यासक्रम संस्थेमध्ये लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
डॉ.एस.एफ. पाटील म्हणाले, कोणतीही कला ही केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यामुळे कलाकारांना वैयक्तिक आयुष्यातही अतिशय मदत होते. नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये कलेला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे तरुण कलाकार घडतील आणि त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकेल, यासाठी भारतीय विद्यापीठ अनेक वर्षांपासून कटिबद्ध आहे.

जयंत पाटील अमित शहांना भेटल्याची चर्चा, लवकरच सत्तेत सहभागी होण्याची शक्यता

जलसंपदा मंत्रिपद मिळणार

पुणे-शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी आज पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे जयंत पाटीलही लवकरच अजित पवार गटात सामील होऊन सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लवकरच आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बडा नेता शरद पवार यांची साथ सोडणार आहे. हा बडा नेता म्हणजे जयंत पाटीलच असल्याचे बोलले जात आहे. या नेत्यासोबत राष्ट्रवादीचे जालना, अहमदनगर आणि सांगली जिल्ह्यातील प्रत्येकी एक असे तीन आमदार असतील. शरद पवार गटाचे हे चार आमदार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर प्रवेश करतील. मंत्रिमंडळ विस्तारात यातील एका बड्या नेत्यास कॅबिनेट मंत्रिपद दिले जाऊ शकते. जलसंपदा मंत्रिपद हवे, अशी अट या मंत्र्यांने घातली असून ती मान्य झाल्याचे सांगण्यात येते.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांची भेट घेतली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अमित शहांची भेट घेण्यापूर्वी अजित पवार यांनी जयंत पाटील यांना फोन केला होता. यावेळी त्यांना अमित शहांच्या भेटीसाठी अजित पवारांनी बोलावले होते. त्यानंतर जयंत पाटील व अमित शहा यांची भेट झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, जयंत पाटील व अमित शहा यांच्या भेटीबाबत अद्याप कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 4 विद्यमान आमदार अजित पवार गटासोबत येणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. तसेच, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या आगेमागे हा मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार होईल. त्यामध्ये 6 भाजपला, 4 शिंदेसेनेला आणि 4 राष्ट्रवादीला मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

राज्यातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.6:  महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून निर्णयाचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार आहे, असे मत श्री.पवार यांनी यावेळी व्यक्त केले.

स्व. आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुरेश नवले, अर्जुन खोतकर, आमदार प्रसाद लाड, सिद्धार्थ शिरोळे, सनी निम्हण, आरोग्य संचालक डॉ.अजय चंदनवाले आणि राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, कोविड काळाने आरोग्यसेवा सर्वात जास्त महत्त्वाची असल्याचे दाखवून दिले. राज्य शासनानेदेखील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.  आरोग्यसेवेसाठी पुरवणी मागण्यांमध्ये 210 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात 700 ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 2 हजार 418 संस्थांमध्ये नि:शुल्क उपचार होणार आहेत. राज्यात ॲडेनो व्हायरसमुळे डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून पुण्यात साथीचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

पावसाळ्याचे दिवस असल्याने आरोग्य विभागामार्फत साथजन्य आजारांपासून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. साथीच्या आजारावर नियंत्रण करण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून प्राथमिक टप्प्यातच अशा आजाराचे निदान झाल्यास रुग्णांचा त्रास कमी होतो. मात्र उपचारासोबत आजार होऊ नये यासाठी दररोज व्यायाम करणे, व्यसनापासून दूर राहणे, सकस आहार घेणे, वेळेवर आरोग्य तपासण्या करणे, तणावमुक्त जीवन जगणे गरजेचे आहे. प्रकृतीची काळजी घेताना जीवनशैलीत बदल आणायला हवा. आरोग्य शिबिरात मोफत वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. स्व. विनायक निम्हण यांनी सामाजिक कार्य करताना चांगल्या प्रकारची मैत्री जोपासली असेही श्री.पवार म्हणाले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.भुजबळ म्हणाले, महाआरोग्य शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर्स सहकार्य करण्यासाठी येतात हे कौतुकास्पद आहे. या माध्यमातून अनेक गोरगरिबांना आरोग्यसेवा मिळणार आहे. ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले’ ही संतांची शिकवण आहे. अशा पद्धतीने विविध व्याधीने त्रस्त असलेल्या नागरिकांवर शिबिराच्या माध्यमातून विनामूल्य उपचार करण्यात येणार आहे. म्हणून या शिबिराला विशेष महत्त्व आहे, असे त्यांनी सांगितले. स्व. आमदार विनायक निम्हण यांनी सर्वसामान्य जनतेसाठी कार्य केले, असेही श्री.भुजबळ म्हणाले.

पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले,  कोविडच्या निमित्ताने आरोग्यसेवेचे महत्त्व लक्षात आले.   आरोग्याच्या अनेक समस्या समोर येत असताना उपचाराला बऱ्याचदा मर्यादा येतात. अशावेळी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून चांगली सेवा घडते आणि नागरिकांना फायदाही होतो, असे त्यांनी सांगितले. स्व. आमदार विनायक निम्हण यांनी जात, धर्मापलीकडे नाती जपली असेही श्री.पाटील म्हणाले.

श्री.वडेट्टीवार म्हणाले, माणसात आणि सेवेत देव आहे असे समजून या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे कार्य करत असल्याने त्यांची सेवा महत्त्वाची आहे. शिबिराचे सूक्ष्म नियोजन करण्यात आल्याने त्याचा अनेकांना लाभ होईल, असे त्यांनी सांगितले.

आमदार सिद्धार्थ शिरोळे, निरामय फाऊंडेशनचे रामेश्वर नाईक, सनी निम्हण यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.  प्रारंभी उपमुख्यमंत्री श्री. पवार आणि पालकमंत्री श्री. पाटील यांनी शिबिरांची पाहणी केली. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिबिरासाठी आलेल्या राज्यातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. मंत्री श्री.महाजन यांनीदेखील शिबिराला भेट देऊन नियोजनाची माहिती घेतली व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

महाआरोग्य शिबिरात विविध प्रकारच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले होते. तपासणीनंतर मोफत औषध देण्याची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. तपासणीनंतर आवश्यकता असल्यास गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रियेची व्यवस्था करण्यात येणार आहे.

अमित शहा यांच्या सर्व बैठका रद्द, तातडीने दिल्लीला जाणार; शिंदे-फडणवीस-अजितदादांसोबत चर्चा

डब्ल्यू मेरियट हॉटेलला बैठका

पुणे-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यासाठी शनिवारी संध्याकाळी पुणे शहरात दाखल झाले होते. त्यानुसार आज दुपारी एका शासकीय कार्यक्रमानंतर अमित शहा दिवसभर काही महत्त्वाच्या भेटीगाठी घेणार होते. मात्र, त्यांच्या या दौऱ्यात अचानक बदल करण्यात आला असून अमित शहा यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या आहेत.पूर्वीच्या नियोजनुसार रविवारी पूर्ण दिवस अमित शाह यांचा मुक्काम पुणे शहरात होता. दोन दिवसांच्या त्यांच्या या दौऱ्यात फक्त सहकार विभागाकडून आयोजित एक कार्यक्रम होता. हा कार्यक्रम आज रविवारी दुपारी होणार आहे. त्यानंतर त्यांचा इतर सर्व वेळ राखीव ठेवला होता. परंतु आता त्यांच्या या दौऱ्यात अचानक बदल केला गेला आहे. आता अमित शाह कार्यक्रमानंतर तातडीने दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज दुपारी सहकार विभागाचा कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी ‘ पोर्टलचे उद्घाटन होणार आहे. पिंपरी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे मल्टीपर्पज हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांचा वेळ राखीव होता. कार्यक्रमानंतर अमित शाह थांबलेल्या हॉटेलमध्ये परत जाणार होते. त्याठिकाणी बैठका होणार होत्या. त्या बैठका अमित शह यांनी रद्द केल्या आहेत. आता अमित शहा 3 वाजता पुणे विमानतळावरून थेट दिल्लीला रवाना होणार आहे.

दरम्यान, अमित शहा यांच्या आज दुपारनंतर होणाऱ्या नियोजित बैठका अचानक रद्द झाल्याने या बैठका आज सकाळपासूनच सुरू झाल्याची माहिती आहे. पूर्वी नियोजनानुसार, सहकार विभागाचा कार्यक्रम संपवून अमित शहा डब्ल्यू मेरियट हॉटेलला येणार होते. त्या ठिकाणी बैठकांचे आयोजन केले होते. परंतु कार्यक्रम झाल्यानंतर अमित शहा तातडीने दिल्लीला जाणार आहे. यामुळे या बैठका सकाळी 11 वाजताच सुरु झाल्या आहेत. अमित शहा यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार डब्ल्यू मेरियट हॉटेलला दाखल झाले आहेत. या चारही नेत्यांमध्ये बैठक झाली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा

अमित शहांसोबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार या नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे. यात मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. मात्र, याला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून त्याविषयीच बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.

‘इंडिया’च्या बैठकीच्या तयारीसाठी तिन्ही पक्षांतील प्रत्येकी ५ नेत्यांचा गट.

मुंबई-

काँग्रेस पक्षासह देशातील महत्वाच्या पक्षांनी स्थापन केलेल्या ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत होत आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत ही बैठक होत असून राहुलजी गांधी यांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर होत असल्याने या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. बैठकीच्या तयारीसाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील प्रत्येकी ५ नेत्यांचा गट तयार करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हा गट काम करणार असून मुंबईतील बैठक यशस्वी करण्यासाठी तिन्ही पक्ष जोमाने काम करत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

वरळीच्या नेहरू सेंटर येथे यासंदर्भात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना नेते व माजी मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत, अनिल देसाई आदी उपस्थित होते.

बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मुंबईत होणारी इंडियाची ही तिसरी बैठक आहे. मुंबईतील बैठक चांगली व्हावी यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. मुंबईतील बैठकीत विविध विषयांवर चर्चा होईल. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, संसदीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुलजी गांधी यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, यांच्यासह महत्वाच्या व्यक्ती या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारला माहिती देण्यात येईल, सरकारी व्यवस्थेसंदर्भात विरोधी पक्षनेते सरकारशी संवाद साधतील. देशात मागील ९ वर्षांपासून सुरु असलेल्या हुकूमशाही व्यवस्थेविरोधात इंडिया आघाडी स्थापन झालेली आहे. पाटणा व बंगळुरूतील बैठक यशस्वी पार पडल्यानंतर मुंबईतील बैठक यशस्वी करण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज आहे.

मुंबईतील इंडिया आघाडीची बैठक यशस्वी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार असून या समितीत तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी पाच नेत्यांचा समावेश असेल. काँग्रेस पक्षाकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा माजी मंत्री वर्षाताई गायकवाड, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, माजी खा. संजय निरूपम हे या समितीचे सदस्य असणार आहेत.

पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, दुसऱ्यांना भ्रष्ट्चारी म्हणणाऱ्या भाजपाचा भ्रष्ट चेहरा आम्ही उघड करणार आहोत. शिंदे सरकारमध्ये भाजपाचे अनेक मंत्री भ्रष्टचारी आहेत, त्यांच्या भ्रष्टाचाराची माहिती आमच्याकडे आहे, लवकरच त्यांचा पर्दाफाश केला जाईल. जलसंपदा विभागात ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा आरोप देशाचे पंतप्रधान करतात व दोन दिवसातच त्या पक्षाला सत्तेत सहभागी करुन घेता, हे कसे काय ? भाजपाकडे आले की पवित्र होतात का ? असा संतप्त सवाल पटोले यांनी विचारला.

‘जीएसटी’मुळे राज्यांची, देशाची आर्थिक स्थिती सुधारली -सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

‘आयसीएआय’तर्फे ‘जीएसटी’वरील राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
पुणे : “वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) संकलनात महाराष्ट्राचा वाटा जवळपास २० टक्के आहे. दरवर्षी दोन लाख १७ हजार कोटी इतका जीएसटी महाराष्ट्रातून भरला जातो. त्यामुळे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेसाठी सनदी लेखापालांचे योगदान मोलाचे असून, जास्तीस्त जास्त जीएसटी संकलित करण्यासाठी पुढाकार घेऊन सनदी लेखापाल भारतीय अर्थव्यवस्थेला सक्षम करण्याची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडत आहेत,” असे प्रतिपादन राज्याचे वने, मत्स्योत्पादन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) जीएसटी अँड इनडायरेक्ट टॅक्सेस कमिटी आणि ‘आयसीएआय पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वस्तू व सेवा कर (जीएसटी)’ वर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी मुनगंटीवार बोलत होते. जवळपास ४५० सीए सभासद या परिषदेत सहभागी झाले आहेत.
यावेळी ‘आयसीएआय’च्या जीएसटी अँड इनडायरेक्ट टॅक्स कमिटीचे व्हाईस चेअरमन सीए उमेश शर्मा, केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य सीए ऋता चितळे, सीए यशवंत कासार, आयसीएआय पुणेचे चेअरमन सीए राजेश अग्रवाल, व्हाईस चेअरमन सीए अमृता कुलकर्णी, सचिव सीए अजिंक्य रणदिवे, सीए प्रणव आपटे, सीए मौशमी शहा, सीए सचिन मिणियार, सीए काशिनाथ पठारे आदी उपस्थित होते.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “कर व्यवस्थेत सुलभता, सहजता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ‘एक देश एक कर’ अंतर्गत जुलै २०१७ पासून जीएसटी कायदा लागू करण्यात आला. या कायद्याच्या अंमलबजावणीत, तसेच त्यात सुसूत्रता आणण्यात सनदी लेखापालांनी सुरुवातीपासून महत्त्वाचे योगदान दिले. जीएसटी कौन्सिलच्या गेल्या ५० बैठकांतून अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. जीएसटीनंतर प्रत्येक राज्याचे उत्पन्न वाढले असून, वाढीचा दर १४ टक्क्यांवर गेला आहे. राज्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे. पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे.”
“करदाते, सनदी लेखापाल आणि सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नातून देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे. ब्रिटनला आपण मागे टाकले असून, लवकरच तिसऱ्या क्रमांकांची अर्थव्यवस्था होण्याचे आपले स्वप्न पूर्ण होईल. देशासाठी योगदान देणारा आणि आर्थिक विकासात भर घालणारा सनदी लेखापाल भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले कौतुक केलेले आहे. तेव्हा आपण कर व्यवस्था अधिकाधिक सहज व सोपी करण्यात आणि कर संकलनात असेच योगदान देत राहावे,”  असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.
जीएसटी कायद्यातील नवे बदल’ याविषयी सीए उमेश शर्मा यांच्यासह इतर अनेक विषयांवर मार्गदर्शन सत्र झाले. सीए राजेश अग्रवाल यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. सीए चंद्रशेखर चितळे यांनी वस्तू व सेवा करावरील परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. सीए मौशमी शहा यांनी सूत्रसंचालन केले. सीए यशवंत कासार यांनी आभार मानले.