मुंबई-मी काल शरद पवारांसोबत होतो आणि पुढेही राहणार माझ्याकडून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मी अमित शहांना भेटलो या बद्दल तुम्ही संशोधन करा, घरी बसून बातम्या केल्या गेल्याचा टोलाही शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे.दरम्यान जयंत पाटील पुढे बासेलताना म्हणाले की, माझी अमित शहा यांच्यासोबत काहीच चर्चा झाली नाही. मी केवळ शरद पवारांशी चर्चा करत माझ्याघरी येत आहे. अजित पवार गट बातम्या पेरतो असे मी म्हटणार नाही, बातम्या पेरणारे तुम्ही असा टोला मिडीयाला लगावला आहे. असा गैरसमज पसरवणे चुकीचे आहे, बातमी देणाऱ्यांनी अभ्यास करुन बातमी द्यायला हवी, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
जयंत पाटील म्हणाले की, मी काल संध्याकाळी शरद पवार यांच्या घरी होतो. त्यानंतर मी आणि काही सहकारी माझ्या निवासस्थानी रात्री दीड वाजेपर्यंत चर्चा करत बसलो होतो. यानंतर मी सकाळी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली. यात मी मुंबईहून कधी पुन्यात गेलो असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईहून पुण्यात जाणे आणि तिथून इथपर्यंत येणे केवळ अलाउद्दीनच्या चिरागच शक्य आहे. मी शरद पवार यांच्यासोबत आहे. लोकांमध्ये माझ्याबद्दल संभ्रम पसरवला जात आहे, पण महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे की मी काय आहे?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांची भेट घेतली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी अमित शहांची भेट घेण्यापूर्वी अजित पवार यांनी जयंत पाटील यांना फोन केला होता. यावेळी त्यांना अमित शहांच्या भेटीसाठी अजित पवारांनी बोलावले होते. त्यानंतर जयंत पाटील व अमित शहा यांची भेट झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, जयंत पाटील व अमित शहा यांच्या भेटीबाबत अद्याप कुणीही अधिकृत दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 4 विद्यमान आमदार अजित पवार गटासोबत येणार असल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. तसेच, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनाच्या आगेमागे हा मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार होईल. त्यामध्ये 6 भाजपला, 4 शिंदेसे