मोदी सरकारला पहिला धक्का! महिला आरक्षण विधेयक नामंजूर; लोकसभेत गदारोळ

Date:

महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक 54 मतांनी पडले:बाजूने 298, विरोधात 230 मते

घटनादुरुस्ती विधेयक असल्यानं लोकसभेत याला मंजूर करण्यासाठी दोन तृतियांश मतं आवश्यक आहेत. म्हणजेच लोकसभेत सध्या 540 खासदार असल्यानं त्यापैकी 360 खासदारांची मतं घटनादुरुस्ती विधेयकासाठी आवश्यक आहेत.

महिला आरक्षण घटनादुरुस्तीवरील मतदान:इलेक्ट्रॉनिक मते: ४८९,एकूण मते (कागदी चिठ्ठ्यांसह): ५२८ (३९ खासदारांनी कागदी मतपत्रिकेवर मत नोंदविले )

हे होते इलेक्ट्रोनिक मतदान , विधेयकाच्या बाजूने 278 आणि विरोधात 211…..

नवी दिल्ली: मोदी सरकारसाठी महत्त्वाच्या असलेल्या महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत मतदान झालं आहे. लोकसभेच्या २९८ खासदारांनी विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. तर २३० खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे हे विधेयक लोकसभेत नामंजूर झालं. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबद्दलची घोषणा केली.विधेयकावरील मतदानानंतर सदनात मोठा गोंधळ झाला.आम्ही महिलांच्या हक्कांसाठी लढा देत राहू, संघर्ष करत राहू, असं केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी जोरजोरात म्हटलं. तेव्हा विरोधकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण तापलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र लोकसभेत हजर होते. लोकसभेत विधेयक मंजूर करण्यात सरकारला अपयश आलं आहे. मोदी सरकार साठी हा मोठा धक्का मानला जात आहे.आता राज्यसभेत उद्या मतदान होणार आहे.  528 चं दोन तृतियांश 352 होतं त्यामुळं घटनादुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी आवश्यक संख्याबळ सरकारकडे नसल्याचं स्पष्ट झालं. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी  संविधान 131 वी दुरुस्ती विधेयक, 2026 नामंजूर झाल्याचं जाहीर केलं. यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी इतर दोन विधेयकं पुढं न नेण्याचा निर्णय घेतला आहे.

पहिले: सीमांकन (Delimitation) घटनादुरुस्ती विधेयक, २०२६

दुसरे: केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती) विधेयक, २०२६

या विधेयकांवर स्वतंत्र मतदान घेण्यास सरकारने नकार दिला. ही विधेयके मुख्य विधेयकाशीच संलग्न असल्याने, त्यांच्यावर स्वतंत्र मतदानाची आवश्यकता नसल्याचे कारण सरकारने दिले.

आपल्या ११ वर्षांच्या कार्यकाळात, मोदी सरकारला सभागृहात एखादे विधेयक मंजूर करून घेण्यात अपयश येण्याची ही पहिलीच वेळ आहे. मतदानापूर्वी अमित शाह यांनी एक तासाचे भाषण दिले. या विधेयकांना मंजुरी मिळाली नाही, तर त्यासाठी विरोधी पक्षच जबाबदार असेल, असा दावा त्यांनी केला. देशातील महिला हे पाहत आहेत की, त्यांच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा निर्माण करण्याचे काम कोण करत आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

विधेयकाच्या पराभवानंतर विरोधी पक्षाची घोषणा: “आम्ही जिंकलो!”

राहुल गांधी म्हणाले: “संविधानावर होणारा हल्ला आम्ही परतवून लावला आहे. आम्ही हे स्पष्टपणे सांगितले होते की, हे विधेयक म्हणजे महिला आरक्षणाचे खरे विधेयक नसून, भारताची राजकीय रचना बदलण्याचा एक कुटिल डाव आहे.”

प्रियांका गांधी म्हणाल्या: “हा आपल्या लोकशाहीचा आणि आपल्या देशाच्या एकतेचा एक मोठा विजय आहे. मी सभागृहात म्हटल्याप्रमाणे, हा संविधानावर केलेला हल्लाच होता; आणि आम्ही तो यशस्वीपणे रोखला आहे—जी एक अत्यंत सकारात्मक बाब आहे.”

शशी थरूर यांनी असे निरीक्षण नोंदवले की, “आम्ही सातत्याने हीच भूमिका मांडली आहे की, आम्ही महिला आरक्षणाचे पूर्णपणे समर्थन करतो आणि आजही त्याच्या बाजूने मतदान करण्यास आम्ही तत्पर आहोत. तथापि, या आरक्षणाला सीमांकन प्रक्रियेशी अविभाज्यपणे जोडले जाऊ नये.”

सत्ताधाऱ्यांचा 2029 पासून महिला आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न
केंद्र सरकारकडून महिला आरक्षण लोकसभेत आणि विधानसभेत संविधान 131 वी दुरुस्ती विधेयकात लोकसभेच्या जागा वाढवण्याचं प्रस्तावित केलं आहे. 2029 च्या निवडणुकीत लोकसभेच्या सध्याच्या 543 जागांमध्ये वाढ करुन राज्यातील लोकसभेच्या जागा 815 आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जागा 35 जागा मिळून 850 जागा करण्याचा प्रस्ताव विधेयकात होता. सरकारचा महिला आरक्षणातील दुरुस्ती विधेयकासोबत लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेचं विधेयक मांडलं होतं. विरोधी पक्षांकडून नेमका याच मुद्याला आक्षेप होता.

अमित शाह यांनी विरोधी पक्षांवर टीका करताना म्हटलं की 2023 मध्ये विरोधी पक्ष महिलांना आरक्षण देण्याचा शब्द दिलं होतं आता द्यायचा विषय आलेला असताना मागं हटत आहेत. महिला आरक्षण लटकवत आहात, तुम्ही निवडणुकीत जिथं जिथं जात असाल तिथं तुम्हाला या देशातील महिलांचा आक्रोश सहन करावा लागेल, असं अमित शाह म्हणाले.

विरोधकांचा आक्षेप का?
विरोधी पक्षांकडून महिला आरक्षण विधेयक 2023 मध्ये मंजूर करण्यात आल्याची भूमिका मांडण्यात आली. केंद्र सरकारचा महिला आरक्षण विधेयकासोबत परिसीमन विधेयक आणल्यानं विरोधी पक्षांनी सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सरकारनं आणलेल्या विधेयकावर बोलताना यापूर्वी महिला आरक्षण विधेयकाला सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी विरोध केल्याचं म्हटलं होतं. केंद्र सरकारला महिला आरक्षण लोकसभा आणि विधानसभेत लागू करायचं असेल तर 543 जागांमध्येच अंमलबजावणी करावी, अशी भूमिका प्रियांका गांधी यांनी मांडली. केंद्र सरकारचा लोकसभेची सदस्यसंख्या 850 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न वरवर पाहता यात आपत्ती वाटत नाही मात्र सखोलपणे विचार केल्यास यातील राजकीय हेतू लक्षात येतो, असं प्रियांका गांधी म्हणाल्या होत्या.

घटनादुरुस्ती विधेयक असल्यानं लोकसभेत याला मंजूर करण्यासाठी दोन तृतियांश मतं आवश्यक आहेत. म्हणजेच लोकसभेत सध्या 540 खासदार असल्यानं त्यापैकी 360 खासदारांची मतं घटनादुरुस्ती विधेयकासाठी आवश्यक आहेत.

या आरक्षणासोबतच घटनादुरस्ती करून लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये ३० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला. ज्यामुळे लोकसभेची सदस्य संख्या ५४३ वरून ८१६ इतकी होणार होती. पण विरोधकांनी सरकारच्या या भूमिकेला कडाडून विरोध केला. महिला आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, पण परिसीमन करण्यास विरोधकांनी कडाडून विरोध केला.

विशेष म्हणजे, एनडीएककडे संख्याबळ हे २९३ जागांचं आहे. पण, महिला आरक्षणासाठी २९८ मतं पडली. एनडीएमध्ये २९३ खासदारांपैकी २४० भाजपची आहेत. तर १६ टीडीपी, १२ जेडीयू, ७ शिवसेना, ५ एलजेपी (राम विलास), २ जनसेना पक्ष, २ जनता दल (सेक्युलर), २ आरएलडी, १ एजीपी, १ राष्ट्रवादी काँग्रेस, १ एसकेएम, १ आजसूच, १ अपना दल, १ यूपीपीएलच आणि १ इतर
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने २९३ जागा जिंकल्या आहेत. भाजपाकडे स्वतःचे २४० खासदार आहेत. दोन-तृतीयांश बहुमतासाठी त्यांना ६७ जागा कमी होत्या. पण, २३० सदस्यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याने लोकसभेत विधेयकाचा निभाव लागला नाही.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

घोष पथकाच्या वादनातून झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना मानवंदना

पुणे, दि. 18 जून : स्वातंत्र्यलढ्यातील अद्वितीय शौर्य आणि...

पाणी साठवा, पण झाकून ठेवा; डेंग्यू-मलेरिया रोखण्यासाठी महापालिकेचे आवाहन

पुणे, दि. १८ : उन्हाळ्यात आणि ‘एक दिवसाआड पाणीपुरवठा’...

जगभरातील सैन्य दलांसाठी वैशिष्ट्यपूर्ण माउंटेड आर्टिलरी गन प्रणाली उपलब्ध करण्याचा करार

पॅरिस, फ्रान्स, १८ जून २०२६ : भारत फोर्ज लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची संरक्षण क्षेत्रातील उपकंपनी असलेल्या ‘कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेड’ने (केएसएसएल) लष्करी वाहनाधारित संरक्षण प्रणाली विकसित करणारी आघाडीची कंपनी एएम जनरल हिच्यासोबत युरोसॅटरी संरक्षण प्रदर्शनात आज धोरणात्मक भागीदारी करार केला. बदलत्या युद्धपरिस्थितीत जगभरातील आधुनिक सैन्य दलांच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने केएसएसएल आणि एएम जनरल यांच्यात ही धोरणात्मक भागीदारी करण्यात आली आहे. या भागीदारीद्वारे सैन्य दलांना आकाराने कॉम्पॅक्ट, हलक्या वजनाचा, टिकाऊ, कठीण परिस्थितीतही प्रभावीपणे कार्य करणारा तसेच सर्व हवामानात आणि सर्व प्रकारच्या भूभागांवर सहज वापरता येणारा अत्याधुनिक ‘माउंटेड आर्टिलरी गन प्लॅटफॉर्म’ उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे सैन्य दलांना विशेष स्पर्धात्मक लाभ मिळू शकतो. या क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. त्या दृष्टीने ही भागीदारी मित्रदेशांमधील व्यापक वितरणाला चालना देण्यासाठी करण्यात आली आहे. आधुनिक, गतिमान आणि युद्धपरिस्थितीत टिकून राहू शकणाऱ्या १५५ मिमी तोफखान्याची क्षमता विकसित करू इच्छिणाऱ्या भागीदार देशांसाठी हे व्यासपीठ विस्तारक्षम आणि निर्यातीसाठी योग्य उपाय म्हणून सादर केले जाणार आहे. या धोरणात्मक भागीदारीचा लाभ घेत ‘एएम जनरल’ने अमेरिकी लष्कराच्या ‘मोबाईल टॅक्टिकल कॅनन’ (एमटीसी) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीही प्रस्ताव सादर केला आहे. अमेरिकी सरकारला सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावामध्ये केएसएसएलच्या माउंटेड आर्टिलरी गन प्लॅटफॉर्मच्या युद्धपरिस्थितीत उपयुक्त ठरलेल्या आणि सिद्ध झालेल्या रचनेवर आधारित १५५ मिमी एमटीसी प्रणाली विकसित करून पुरविण्याचा समावेश आहे. या प्रस्तावाची निवड झाल्यास, या प्रणालीचे वितरण २०२७मध्ये करण्याचे नियोजन आहे. विशेष विकसित करण्यात आलेल्या पॉवरपॅक आणि सस्पेन्शन प्रणालीसह कमी वजनाच्या या वाहनामुळे एमएआरजी प्रणाली लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी तसेच रणांगणावरील जलद हालचालींसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या प्रणालीमध्ये ५२ कॅलिबर १५५ मिमी तोफ, पेटंटप्राप्त सॉफ्ट रीकॉइल टेक्नॉलॉजी (एसआरटी) आधारित रीकॉइल नियंत्रण प्रणाली, स्वयंचलित लोड-सहाय्य यंत्रणा आणि सर्व हवामानात कार्य करणारी प्रगत फायर कंट्रोल प्रणाली देण्यात आली आहे. त्यामुळे त्यातून अप्रत्यक्ष तसेच प्रत्यक्ष मारा करणे शक्य होते. ही प्रणाली प्रमाणित उच्च-स्फोटक प्रक्षेपास्त्र ४० किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत डागू शकते. तसेच या वाहनामध्ये २० हून अधिक प्रक्षेपास्त्रे आणि प्रोपेलंट चार्जेस साठवता येतात. पारंपरिक तोफखाना प्रणालींच्या तुलनेत ‘एमएआरजी’मधील एसआरटी प्रणाली ही रीकॉइलमधून निर्माण होणारा अधिकचा जोर शोषून घेते. त्यामुळे वाहन आणि टॉवरचे वजन कमी ठेवणे शक्य होते. तसेच संपूर्ण शस्त्र प्रणालीवर तिच्या वापराच्या कालावधीत कमी ताण येतो. ‘केएसएसएल’ची मूळ कंपनी असलेल्या ‘भारत फोर्ज लिमिटेड’चे उपाध्यक्ष आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक अमित कल्याणी म्हणाले, "आमच्या प्रगत तोफखान्याच्या क्षमतांवर एएम जनरलने विश्वास दाखवला आहे. आधुनिक युद्धाच्या गरजा पूर्ण करणारी अत्याधुनिक आणि युद्धपरिस्थितीत सिद्ध झालेली उत्पादने देण्याच्या आमच्या कटिबद्धतेतून ही भागीदारी साकार झाली आहे." ‘एएम जनरल’चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन चॅडबोर्न म्हणाले, "केएसएसएल’सोबतची ही भागीदारी आमच्या मित्रदेशांना आणि रणांगणावरील सैनिकांना सहाय्य करण्याच्या आमच्या सामायिक बांधिलकीचे प्रतीक आहे. त्यांच्या अत्याधुनिक आणि सिद्ध झालेल्या प्लॅटफॉर्ममध्ये पेटंटप्राप्त ‘सॉफ्ट रीकॉइल टेक्नॉलॉजी’चा समावेश करून आम्ही खऱ्या अर्थाने नवी क्षमता उपलब्ध करून देत आहोत. रणांगणावरील बदलत्या परिस्थितीत यामुळे लष्करी दलांना महत्त्वाचा फायदा मिळू शकतो." केएसएसएल भारतात विकसित करण्यात आलेल्या आणि जागतिक दर्जाच्या निकषांशी सुसंगत संरक्षण प्रणाली तयार करते. भारतासह जगभरातील देशांना प्रगत संरक्षण क्षमता उपलब्ध करून देणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

पंकज त्रिपाठी आणि आशी यांच्यासह डी बिअर्स ग्रुपकडून वडील आणि मुलीच्या स्वाभाविक नात्याचा उत्सव

- यंदाच्या फादर्स डे निमित्त 50 स्टोअर्समध्ये ग्राहकांसाठी एक अनोखा उपक्रम – पुणे-18 जून 2026: डी बिअर्स ग्रुप यंदाचा फादर्स डे आपल्या ‘लव्ह, फ्रॉम डॅड’ या मोहिमेत एक अत्यंत भावनिक आणि वैयक्तिक भर घालून साजरा करत आहे. या मोहिमेअंतर्गत ख्यातनाम अभिनेते पंकज त्रिपाठी आणि त्यांची कन्या आशी यांच्यासोबत तयार करण्यात आलेल्या एका विशेष फिल्मद्वारे वडील आणि मुलगी यांच्यातील काळानुरूप विकसित होत जाणारे नाते अधोरेखित करण्यात आले आहे. विश्वास, प्रोत्साहन आणि निःस्वार्थ, निरपेक्ष पाठिंबा या मूल्यांवर उभ्या असलेल्या या नात्याचा हृदयस्पर्शी प्रवास या फिल्ममध्ये मांडण्यात आला आहे. स्वतःची अभिव्यक्ती आणि वाढत्या स्वातंत्र्याचे अर्थपूर्ण प्रतीक ठरलेल्या दुसऱ्यांदा कान टोचून घेण्याच्या निर्णयाभोवती केंद्रित असलेली ही फिल्म वडील-मुलीच्या नात्यातील सर्वात प्रामाणिक आणि भावनिक क्षणांना जिवंत करते. समुद्रकिनाऱ्याच्या निवांत आणि निसर्गरम्य पार्श्वभूमीवर उलगडणाऱ्या या कथेत वाळूत उमटलेली पावले काळाच्या प्रवाहाचे आणि अधिक दृढ होत गेलेल्या नात्याचे प्रतीक बनतात. ही चित्रफीत प्रत्येक वडिलांना जवळची वाटणारी एक जाणीव टिपते. एकेकाळी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारी मुलगी आता आत्मविश्वासाने स्वतःचा मार्ग निवडत पुढे जात आहे. अभिमानाने भरलेल्या या शांत क्षणी नैसर्गिक हिरा हा केवळ एक भेटवस्तू राहत नाही; तो वडिलांकडून मुलीला दिलेला “मी तुला बघत आहे, समजून घेत आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि तू जशी घडत आहेस त्याचा मला अभिमान आहे,”  असा एक संदेश ठरतो. ही कथा भारतभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी डी बिअर्स ग्रुपने देशभरातील 50 निवडक रिटेल स्टोअर्समध्ये व्यापक उपक्रम सुरू केला आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, पुणे, लखनऊ आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये वडील आणि मुलींना एका अनोख्या, आठवणींना उजाळा देणाऱ्या रिटेल अनुभवात सहभागी होता येणार आहे. या उपक्रमाद्वारे प्रत्येक ग्राहक आपल्या नात्याची एक गोड आणि कायमस्वरूपी आठवण सोबत घेऊन जाईल. फादर्स डे सप्ताहाच्या अखेरीस (20 - 21 जून, 2026) या निवडक स्टोअर्समध्ये नामांकित छायाचित्रकारांकडून वडील आणि मुली विशेष छायाचित्रे काढून हा क्षण संस्मरणीय बनवू शकतील. पहिल्यांदा कान टोचण्याचा कार्यक्रम हा परंपरेनुसार होत असतो. पण दुसऱ्यांदा कान टोचणे हा एका तरुणीचा स्वतःचा वैयक्तिक निर्णय असतो. तो तिच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा, स्वातंत्र्याचा आणि स्वतःची अभिव्यक्ती व्यक्त करण्याच्या क्षमतेचा महत्त्वपूर्ण टप्पा दर्शवतो. ‘लव्ह, फ्रॉम डॅड’ या मोहिमेद्वारे डी बिअर्स नैसर्गिक हिऱ्याला या विशेष क्षणाचा गौरव करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग म्हणून सादर करत आहे. नैसर्गिक हिऱ्याची दुर्मिळता, टिकाऊपणा आणि चिरस्थायित्व हे गुण वडील मुलीच्या नात्याच्या अढळ आणि दृढ बंधाशी जोडले गेले आहेत. डी बिअर्स इंडियाच्या कॅटेगरी मार्केटिंगच्या कंट्री हेड तोरांज मेहता म्हणाल्या, “नैसर्गिक हिरे हे नेहमीच आयुष्यातील अत्यंत दुर्मिळ आणि विशेष क्षणांचे साक्षीदार राहिले आहेत. यंदाच्या फादर्स डे निमित्त आम्ही दुसऱ्यांदा कान टोचण्याचा निर्णय घेणे या गोष्टीचा मुलीच्या स्वातंत्र्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड म्हणून गौरव करत आहोत. पंकज त्रिपाठी आणि आशी यांच्यासोबत सहयोग करताना आम्ही प्रामाणिकपणा आणि दुर्मिळतेवर आधारित एका सुंदर नात्याचा उत्सव साजरा करत आहोत. भारतभरातील 50 हून अधिक स्टोअर्समध्ये परस्परसंवादी उपक्रमांद्वारे ही कथा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास आम्ही उत्सुक आहोत. यामुळे कुटुंबांना मोहिमेशी जवळून जोडले जाण्याची, नैसर्गिक हिऱ्यांच्या दागिन्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची आणि स्वतःसाठी एक अविस्मरणीय आठवण जपण्याची संधी मिळेल.” पंकज त्रिपाठी यांच्यासाठीही हा सहयोग अत्यंत वैयक्तिक स्वरूपाचा होता. आपल्या साधेपणासाठी ओळखले जाणारे पंकज त्रिपाठी म्हणाले, “वडील म्हणून काही क्षण अत्यंत भावनिक असतात. त्यापैकी एक म्हणजे आपले मूल स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत आहे आणि स्वतःचे निर्णय घेत आहे याची जाणीव होण्याचा क्षण. दुसऱ्यांदा कान टोचणे हा अशाच आत्मविश्वासाच्या क्षणाचे प्रतीक आहे. या कथेत मला सर्वाधिक भावलेली गोष्ट म्हणजे एक साधी, छोटी कृती  आयुष्यभर जपली जाणारी आठवण बनू शकते. माझी मुलगी आशीसोबत हा अनुभव शेअर करणे माझ्यासाठी खूपच विशेष ठरले. नैसर्गिक हिरा हा वडिलांच्या प्रेमाप्रमाणेच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तितकाच अढळ आणि कायमस्वरूपी सोबत राहतो.” फादर्स डे निमित्त तयार करण्यात आलेली ही व्हिडिओ मालिका डी बिअर्स ग्रुपच्या डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर प्रसारित केली जाणार असून भारतभरातील कुटुंबांना क्षणिक ट्रेंड्सच्या पलीकडे टिकून राहणाऱ्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्प्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी आमंत्रित करत आहे. या सहयोगाद्वारे डी बिअर्स जीवनातील सर्वात अर्थपूर्ण नातेसंबंधांच्या केंद्रस्थानी नैसर्गिक हिऱ्यांना स्थान देण्याची आपली परंपरा पुढे नेत आहे. रील पाहण्यासाठी @heerahaisadakeliye ला भेट द्या आणि नैसर्गिक हिऱ्यांविषयी अधिक माहितीसाठी www.adiamondisforever.com ला भेट द्या. यंदाच्या फादर्स डे निमित्त आपल्या खास छायाचित्रांद्वारे एक सुंदर आठवण जपण्यासाठी https://withlovefromdad.netlify.app/  ला भेट द्या.