पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ :
पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वीज वितरण समस्यांबाबत राज्यमंत्री ऊर्जा विभाग श्रीमती मेघनाताई बोर्डीकर यांनी आयोजित बैठकीस महापौर मंजुषा नागपुरे या उपस्थित राहिल्या. तसेच आमदार शंकर जगताप आमदार बापू पठारे आमदार अमित गोरखे आमदार योगेश टिळेकर उपस्थित होते.यावेळी त्यांनी संबंधित विद्युत विभागातील अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
बैठकीदरम्यान महावितरण कंपनीसमोरील विविध अडचणी, तांत्रिक अडथळे तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. महापौरांनी या सर्व बाबींची सखोल माहिती घेतली व समस्यांच्या मुळाशी जाऊन उपाययोजना करण्यावर भर दिला.तसेच, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि महानगरपालिका यांच्या समन्वयातून एकत्रित प्रयत्न करून वीज वितरण अधिक कार्यक्षम, सुरळीतविश्वासार्ह कसे करता येईल याविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व धोरणात्मक निर्णय घेण्यासंबंधी एक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.नागरिकांना अखंड व दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, हा यामागील मुख्य उद्देश असून प्रशासन सर्व स्तरावर समन्वय साधून या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

