वकीलाकडून महिला सेक्रेटरीची हत्या:मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापुर्वीच पोलिसांनी पकडले, कटात पत्नी अन् अल्पवयीन मुलीचाही सहभाग

Date:

पुणे-आपल्याच कार्यालयात काम करणाऱ्या विवाहित महिलेशी अनैतिक संबध ठेऊन तिचा आपल्या पत्नी आणि मुलीच्या सहाय्याने खून करणाऱ्या एका वकिलाला आणि त्याच्या पत्नी मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सहा तासात पोलिसांनी या वकिलाचा आणि त्याच्या कुटुंबियाचा मुखवटा फाडला

ही धक्कादायक घटना पुण्यातीत चंदननगर भागात घडली. पूनम दिनेश मुन (वय ३२, रा. गणेशनगर, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ‘या प्रकरणी वकील ॲड. संजय सावंत, त्यांची पत्नी स्वाती आणि मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पूनमचे पती दिनेश यांनी फिर्याद दिली आहे’, अशी माहिती चंदननगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश बडाख यांनी दिली.

ॲड. सावंत यांने पूनमशी प्रेमसंबंध निर्माण केले होते, ॲड. सावंत यांचे चंदननगर भागातील जुन्या मुंढवा रस्त्यावर कार्यालय आहे. पूनम गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. सावंत यांच्या कार्यालयात सहाय्यक म्हणून काम करत होती. गुरुवारी (१६ एप्रिल) सकाळी ती नेहमीप्रमाणे ॲड. सावंत यांच्या कार्यालयात गेले. त्यानंतर ॲड. सावंत, त्याची पत्नी स्वाती आणि मुलीने तिला बॅटने मारहाण केली. तिच्यावर शस्त्राने वार केले. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात ठेवण्यात आला.

रात्री आठपर्यंत पूनम घरी न परतल्याने तिच्या पतीने ॲड. सावंत यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा पूनम मैत्रिणीकडे गेल्याचे सांगण्यात आले. पतीने तिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, मोबाइल बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पूनमचे पती शुक्रवारी सकाळी ॲड. सावंत यांच्या कार्यालयात गेले. तेव्हा कार्यालयाचा दरवाजा उघडा होता. पूनम रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्यानंतर पूनमच्या पतीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

पूनमच्या पतीने माहिती दिल्यानंतर पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, गु्न्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, नूतन पवार, पोलिस निरीक्षक निलेश बडाख यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. चंदननगर पोलिसांनी ॲड. सावंत आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले, तसेच गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ॲड. सावंत यांची पत्नी स्वाती हिला ताब्यात घेतले.. पोलिस निरीक्षक बडाख, खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक राम राजमाने आणि पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हॉटेल कोरोनेट मधील उद्योजक अशोक जैन यांच्या मृत्यूचे गूढ उकलले: चौघांवर गुन्हा दाखल

पुणे : डेक्कन जिमखान्यावरील आपटे रोडवरील हॉटेल कोरेनेट येथे...

SBI ला नकली सोने देऊन सवाचार कोटीची फसवणूक मोक्ष जैन आणि चिराग हिम्मतलाल जैन यांच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल

पुणे-वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागी व्हॅल्युअर म्हणून काम करत असताना...

पुण्यात लिफ्टमध्ये अडकून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू; सिंहगड रोडवरील सोसायटीतील धक्कादायक घटना

पुणे : सिंहगड रोड परिसरातील निम्बजनगरमधील रिद्धी सिद्धी अपार्टमेंटमध्ये...