Home Blog Page 1157

जैन महिलांनी निर्भयतेने समाजात व साहित्यात व्यक्त व्हावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नवी दिल्ली द्वारा आयोजित १५व्या अखिल भारतीय स्त्री साहित्य – कला संमेलनाचे उदघाटन महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते संपन्न

पुणे दि.१६: स्त्रीच्या साहित्यामधून स्त्रीने स्वतःला व्यक्त केलेला आहे ती कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे त्याच्याबरोबर काही प्रश्न स्त्रियांचे सारखे आहेत आणि काही प्रश्न त्यांच्या सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळे आहेत यामधला इतिहास पहिला तर असे दिसते की, जैन समाजामध्ये अनेक साध्वीनी अनेक वर्षापासून समाज प्रबोधन करत समाजात फार मोठ योगदान दिलेलं आहे. त्यांचे योगदान स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राहिले असल्याची भावना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. आजच्या काळातही जैन महिलांनी निर्भयतेने समाजात व साहित्यात व्यक्त व्हायला हवेअसे नीलमताई गोर्हे म्हणाल्या.

आज स्वानंद महिला संस्था श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नवी दिल्ली यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या १५व्या अखिल भारतीय स्त्री साहित्य – कला संमेलनाचे उदघाटन महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले.
तर
स्वागताध्यक्षा आशा लुंकड, विशेष अतिथी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांची प्रमुख उपस्थिती व संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका नीलम माणगावे यांच्या अध्यक्ष होत्या .
याप्रसंगी आ. उमा खापरे, प्रकाश धारिवाल, रमनलाल लुंकड, अविनाश चोरडिया, पारस मोदी, पुष्पा गोखरू, दिना धारिवाल, आशा कटारिया, अशोक पगरिया, लता पगारिया, सुरेखा कटारिया, कल्पना बंब, सीमा गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, स्त्रियांवर पूर्वीपासूनच अन्याय अत्याचार होत आले आहेत तिच्या स्वातंत्र्यावर गदा आणली गेली, आजही पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी आपल्याला समाजामध्ये घडताना दिसतात, या सगळ्या पार्श्वभूमीवर जैन समाजातल्या महिलांना एकत्र करून आपल्या निर्भीड विचारांनी सातत्याने सुरेखाताई कटारिया यांनी समाजाशी संवाद साधलेला असून त्यांनी लिहिलेल्या उत्कृष्ट वक्तृत्व कला च्या दुसऱ्या आवृत्ती चे प्रकाशन आज करण्यात आले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केले.
देशाच्या कोविड काळामध्ये व्यापाराचा बराचसा भाग महिलांनी उचलला असल्याचे निदर्शनास आले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

स्त्रियांनी राजकारणात सुद्धा प्रवेश करायला पाहिजे आणि राजकारणात प्रवेश करत असताना स्त्रिया का येत नाहीत याचे अनेक वर्ष राजकारणात असल्यामुळे जेव्हा निरीक्षण, अभ्यास केला तेव्हा प्रामुख्याने तीन कारणं समोर आली आहेत, एक म्हणजे चारित्र्य हननाची भीती तिच्याबद्दल वाईट बोलतील दुसरे म्हणजे समाजातील पुरुषप्रधानता आणि तिसरा म्हणजे हिंसाचार यामुळे स्त्रिया राजकारणापासून लांब राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
७३ व ७४ वी घटना दुरुस्ती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्त्रियांना आरक्षण मिळाले यामुळे स्त्रिया महापौर झाल्या, अनेक मोठी पदे भूषवली, त्या लिहायला, बोलायला लागल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच महिलांना संसदेत प्रतिनिधित्व मिळावे याकरिता स्त्रियांना राजकीय आरक्षण दिलेल आहे याचा जास्तीत जास्त स्त्रियांनी फायदा घेऊन निर्णय प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे, स्त्रियांनी राजकारणात आल्यास राजकारणाची परिभाषा बदलून शकते असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

महा एनजीओ फेडरेशनतर्फे महाराष्ट्रातील २५ कर्तृत्ववान महिलांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न 

पुण्यासह सोलापूर, नगर, सातारा, अकोला, वर्धा, नाशिक,बुलढाणा, भंडारा यांसह विविध शहर-जिल्ह्यांतील महिलांचा गौरव
पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सामाजिक, अनाथ, शिक्षण, आरोग्य, दिव्यांगांसह ज्येष्ठ आणि गोमातेसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील २५ कर्तृत्ववान महिलांना महा एनजीओ फेडरेशनतर्फे राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात आले. महा एनजीओ फेडरेशन अंतर्गत असलेल्या ७५० हून अधिक सामाजिक संस्था या स्वत:चे घर, चूल आणि मूल सांभाळून महिला चालवित असून, त्यांच्यातील निवडक महिलांचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला.

मॉडेल कॉलनीतील माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या सभागृहात राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२४ वितरण सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाच्या सेक्रेटरी सुशिला राठी, महाराष्ट्र गोसेवाआयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा,सौ स्वाती मुंदडा, फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे, गणेश बाकले, अमोल उंबरजे, योगेश बजाज, राहुल जगताप आदी उपस्थित होते.

सुशिला राठी म्हणाल्या, कोणतीही परिस्थिती आली तरी त्यासमोर महिला हार मानत नाहीत. सहनशीलतेने महिला कायम कार्यरत असतात. महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांमध्ये महिला मोठया प्रमाणात कार्यरत आहेत,हे कौतुकास्पद आहे. प्रत्येक महिलेमध्ये राजमाता जिजाऊंचे गुण यावे, अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली

स्वाती मुंदडा यांनी आपल्या मनोगत मध्ये महिलांचे कार्य जागतिक पातळीवर कसे चालू राहील आणि समाजामध्ये स्त्रीचे महत्व जास्त आहे याबाबत विश्लेषण केले.

शेखर मुंदडा म्हणाले, समाजातील विविध क्षेत्रात काम करणा-या महिला आहेत, मात्र ठराविक महिलांनाच पुरस्कार दिले जातात. त्यामुळे तळागाळात काम करणा-या महिलांचा सन्मान महा एनजीओ फेडरेशन तर्फे करण्यात आला. समाजातील वंचित व गरजू घटकांसह गोमातेसाठी काम करणा-या महिलांच्या मागे आपण खंबीरपणे उभे रहायला हवे.

पुरस्काराला उत्तर देताना कै. सिंधुताई सपकाळ यांची कन्या ममता सपकाळ म्हणाल्या, राजमाता जिजाऊंनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले. कोणत्याही स्त्रीकडे पाहताना आईपणाची दृष्टी ठेवण्याची शिकवण जिजाऊंनी दिली. माय-लेकरु आणि गाय-वासरु यांच्यासाठी आपण काम करतो. माईंचे म्हणजे सिंधूताईंचे काम पुढे सुरू ठेवण्याचे काम समाजाच्या पाठिंब्याने सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राजक्ता बगाडे, अपूर्वा करवा, अक्षता जगदाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

नो इलेक्शन करण्याचा भाजपा डाव, लोकशाही व्यवस्था धोक्यातः जयराम रमेश.

इलोक्टोरल बाँडमधून खंडणी वसुली करणारी भारतीय जनता पार्टी आता बाँड जनता पार्टी.

२०१४ सारखीच मोदींची गॅरंटी फेकूगिरी व जुमलेबाजी, काँग्रेसची गॅरंटी मात्र वॉरंटीसहः नाना पटोले

मुंबई, दि. १६ मार्च
भाजपाची निती विधाजनकारी आहे, ते ध्रुवीकरणाचे राजकारण करतात, समाजात द्वेष पसवण्याची त्यांची निती आहे. काँग्रेसची लढाई आरएसएसच्या विचारधारे विरोधात तसेच राजकारणात भाजपाशी मुकाबला सुरु आहे. मोदींनी २०१६ मध्ये नोटबंदी केली आणि आता २०२४ काँग्रेसची बँक खातेबंदी केली. नरेंद्र मोदी वन नेशन,वन इलेक्शन करून वन नेशन आणि नो इलेक्शन करण्याचा डाव आहे. २०२४ मध्ये लोकशाही वाचेल का याची भिती आहे असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी केला आहे.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मीडिया प्रभारी जयराम रमेश, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली यावेळी ते बोलत होते. जयराम रमेश पुढे म्हणाले की, इलोक्टोरल बाँडच्या माध्यमातून भाजपाने कोट्यवधी रुपयांचे खंडणी गोळा केली. भाजपाने अजेंडा होता, चंदा दो, धंदा लो, हप्तावसुली, कंत्राट घ्या, लाच द्या, आणि खोट्या कंपनी बनवा व चंदा द्या. परंतु भाजपाची ही खंडणी वसुली उघड झाली आहे. इलोक्टोरल बाँडमधील आणखी माहिती बाहेर येणार आहे. हा सर्व प्रकार पाहता भारतीय जनता पार्टीची आता बाँड जनता पार्टी झाली आहे.

भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारी २०२४ रोजी मणिपूरच्या इम्फाळमधून सुरुवात झाली. १६ राज्य ११० जिल्हे व ६७०० किलोमीटरचे अंतर पार करुन मुंबईत यात्रेचा समारोप झाला. इलोक्टोरल बाँड मधून भाजपाला मिळालेल्या ६००० कोटी रुपयांची खंडणीविरोधात न्याय यात्रेच्या ६००० किमीचा सामना असे मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसेल. या यात्रेतून पाच न्याय गॅरंटी दिल्या आहेत. युवा न्याय, शेतकरी न्याय, महिला न्याय, कामगार न्याय व भागिदारी न्याय अशा पाच न्याय व २५ गॅरंटी दिल्या आहेत. काँग्रेसची गॅरंटी व्यक्तिची नाही तर पक्षाची आहे तर मोदींची गॅरंटी संविधानाला धोका, सर्वांना आर्थिकदृष्ट्या संपवून टाकण्याची गॅरंटी आहे असा टोलाही मारला.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारत जोडो न्याय यात्रेवर भाजपाच्या राज्यात हल्ले करण्यात आले. राहुल गांधींना मंदिरात जाऊ दिले नाही. धर्माचे ठेकेदार आपणच असल्याचा अविर्भाव भाजपाने दाखवला. पण यात्रा थाबंली नाही, महाराष्ट्रात न्याय यात्रेला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. या न्याय यात्रेतून २५ गॅरंटी दिल्या आहेत, फक्त गॅरंटी नाही तर वॉरंटी सहित आहेत. मोदींची २०१४ ची गॅरंटी खोटी होती,निवडणूक जुमला होता असे भाजपानेट जाहीर सांगून जनतेची फसवणूक केली. भाजपाची गॅरंटी फेकूगिरी व जुमलेबाजी असते पण काँग्रेस सत्तेत आल्यास या सर्व गॅरंटी पूर्ण केल्या जातील.

या पत्रकार परिषेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना खासदार राजन विचारे, खासदार कुमार केतकर, आमदार अमिन पटेल, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सप्रा, माजी आमदार मुझ्झफर हुसेन, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, मनोज शिंदेा आदी उपस्थित होते.

पुण्याच्या सिरम कंपनीकडून मोदींना कोट्यवधी रुपयांचा हप्ता,पूनावाला भाजपला पैसे देत असल्याचा राहुल गांधींंचा आरोप (व्हिडीओ)

शिवसेना फोडून मविआ सरकार पाडण्यासाठी भाजपाने वापरला ईलेक्टोरोल बाँडचा पैसा.

अयोध्यातील राम मंदिर उद्घाटनात धनदांडग्यांनाच प्रवेश, आदिवासी असल्याने राष्ट्रपतींनाही निमंत्रण नाकारले.

ठाणे, दि. १६ मार्च-
नरेंद्र मोदी भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करतात आणि तेच मोदी इलोक्टोरल बाँडच्या माध्यामातून जगातील सर्वात मोठे खंडणी वसुली रॅकटे चालवतात. कोविडमध्ये लाखो लोकांचा मृत्यू होत होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेला टाळ्या, थाळ्या वाजवण्यास सांगत होते आणि दुसरीकडे कोविडची लस बनवाणारी सिरम कंपनी कोट्यवधी रुपये इलोक्टोरल बाँडमधून मोदींना देत होती असा गंभीर आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ठाण्यात सभेत बोलताना खासदार राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला, ते पुढे म्हणाले की, इलोक्टोरल बाँड हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे मोठो खंडणी वसुली रॅकेट आहे. या रॅकेटमधून कार्पोरेट कंपन्यांवर दबाव टाकून पैसे उकळले जातात.याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्यास अमित शाह ईडी, सीबीआय, आयकर विभागाकडून त्यांचा आवाज दडपून टाकतात. शिवसेना पक्ष फोडून जे आमदार बाहेर पडले ते काय असेच मोफत गेले का ? महाराष्ट्र, गोवा राज्यातील सरकार पाडण्यात याच इलोक्टोरल बाँडमधून कमावलेल्या खंडणीच्या पैशाचा वापर केला गेला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन केले पण या सोहळ्याला आदिवासी, दलित, मागास, गरिब समाजातील कोणालाही बोलावले नाही. नरेंद्र मोदी, मोहन भागवत, फिल्मस्टार्स, क्रिकेटपटू, अंबानी, अदानी असे मोजक्या लोकांनाच निमंत्रित केले होते. देशाच्या राष्ट्रपती आदिवासी असल्याने त्यांनाही राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण दिले नाही, झारखंडचे मुख्यमंत्री आदिवासी असल्याने त्यांनाही राम मंदिर उग्घाटन सोहळ्याला बोलावले नाही. देशात ओबीसी, दलित, मागास, आदिवासी समाजाची ८८ टक्के लोकसंख्या आहे पण प्रशासनासह महत्वाच्या क्षेत्रात त्यांची भागिदारी अत्यंत कमी आहे असेही राहुल गांधी म्हणाले.

पुणे,मावळ ,शिरूरला १३ मेला तर बारामतीत ७मे रोजी मतदान … निकाल 4 जूनला

लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. लोकसभा मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर संधू, ज्ञानेश कुमार यांनी माहिती दिली. दरम्यान, देशभरात सात टप्प्यात हे मतदान होणार असून महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे. 

महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान
देशातील 543 लोकसभा जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभा मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल

  • पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
  • दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
  • तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
  • चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
  • पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
  • महाराष्ट्रात 26 एप्रिल ते 25 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. संपूर्ण लोकसभा निवडणूक निकाल 4 जून रोजी असेल.
  • १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक, ४ जूनला लागणार निकाल…
  • *४० वेळा भारतातले मतदार EVM विरोधात न्यायालयात गेले तरीही प्रत्येक वेळेस त्यांच्या विरोधात न्यायालयाने निकाल दिला आता कोणी न्यायालयात गेले तर कोर्ट त्यांना काही शुल्क आकारण्याच्या मनस्थितीत असल्याचे निवडणूक आयुक्त यांनी स्पष्ट केले*

भारतात यंदा ९६ कोटी ८० लाख मतदार आहेत. १९ कोटी ७४ लाख तरुण मतदार आहेत. या तरुणांच्या मतांचा खूप मोठा वाटा या निवडणुकीत असणार आहे. ८२ लाख मतदार असे आहेत जे आमचे प्राऊड मतदार आहेत अशीही घोषणा राजीव कुमार यांनी केली आहे.सगळ्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर आम्ही आता निवडणूक आयोग म्हणून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतो आहोत. मागच्या वर्षभरात ११ निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुका राज्यांच्या होत्या.८५ वर्षापेक्षा जास्त असेल, दिव्यांगांमध्ये ज्यांची श्रेणी ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि त्यांनी फॉर्म १२ डी च्या माध्यामातून नोंदणी केली तर घरी जाऊन त्यांचे मतदान घेतले जाईल असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.२ लाख उमेदवार असे आहेत ज्यांचे वय १०० जास्त आहेत. आमच्याकडे यादीत १८ हजार तृतीय पंथी आहेत. अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे. व्दिष्ट नागरिक जेव्हा लोकसभा निवडणुकीसाठी तेव्हा व्हिल चेलची आणि अटेंन्डची व्यवस्था असेल. आम्ही अशा नागरिकांची मतं चांगल्या स्थितीत घ्यायला तयार आहोत. मात्र जर या मतदान केंद्रावर असेल तर आम्ही तयारी केली आहे.कुठे पैसे किंवा भेटवस्तू वाटल्या जात आहेत याची तक्रार सी-व्हिजिल ॲपमध्ये कोणाला करायची असल्यास फक्त एक फोटो घ्या आणि आम्हाला पाठवा. तुम्ही कुठे उभे आहात ते आम्हाला कळेल. 100 मिनिटांत त्यांची टीम पाठवून तक्रारीचे निराकरण करेल.मतदाराला त्याच्या मोबाइल क्रमांकावरून माहिती मिळू शकते. Know your candidate द्वारे मतदार त्यांच्या उमेदवाराबद्दल देखील पाहू शकतात. गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या कोणालाही वर्तमानपत्र आणि टीव्हीवर 3 वेळा माहिती द्यावी लागेल. दुसरा उमेदवार का मिळाला नाही, याचा खुलासा राजकीय पक्षाला करावा लागेल.

गोरगरीब रुग्णांना लुटणाऱ्या रुग्णालयांची चौकशी करावी

  • रोहन सुरवसे पाटील यांची मागणी; शासकीय योजनेचा लाभ न देता पैशांची लूट सुरु असल्याचा आरोप

पुणे : खेड्यापाड्यांतून उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची लूट सुरु आहे. शासकीय योजनांचा लाभ स्वतःच्या खिशात घालून शासनाचा व रुग्णांचा पैसा लुटणाऱ्या या रुग्णालयांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली. या मागणीचे निवेदन सुरवसे यांनी जिल्हाधिकारी, राज्याचे सचिव, आरोग्य मंत्री व मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे दिले आहे.

रोहन सुरवसे पाटील म्हणाले, “महात्मा फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान जनआरोग्य योजना व अन्य शासकीय योजना शहरातील अनेक खासगी व धर्मादाय रुग्णालयात आहेत. मात्र, रुग्णांना या योजनांचा लाभ ओळख असल्याशिवाय मिळत नाही, ही वस्तूस्थिती आहे. बिल भरण्यासाठी रुग्णालय प्रशासनाकडून, डॉक्टरांकडून रुग्णांची अडवणूक केली जाते. रुग्णालयात पेशंट आल्यावर पहिल्यांदा ५० हजारांची आगाऊ रक्कम भरून घेतली जाते. पैसे भरल्याशिवाय उपचार सुरु केले जात नाहीत. योजनांचा लाभ देण्यास टाळाटाळ केली जाते.”

“या आरोग्य सुविधांचा लाभ मिळण्यासाठी रुग्णांकडून अनेकदा कागदपत्रे घेतली जातात. योजनेअंतर्गत उपचार केले जातात. मात्र, रुग्णाला योजनेत बसत नाही, असे सांगून लुबाडले जात आहे. उलट बिल कमी करून देण्याच्या नावाखाली रुग्णांकडून पैसे वसूल केले जाते. अनेक रुग्णालये शासनाच्या योजनेचे, तसेच रुग्णांकडून असे दुहेरी पैसे घेतात. हे मोठे रॅकेट असून, दुहेरी लूटमार सुरु आहे. एखाद्याने धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार केली, तर त्या रुग्णावर योग्य उपचार केले जात नाहीत. रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना डॉक्टर, रुग्णालय प्रशासन व कर्मचाऱ्यांकडून उर्मट व चुकीची भाषा वापरली जाते. उपचार थांबवले जातात. धर्मादाय आयुक्तालयातूनही याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही, ही दुर्दैवाची बाब आहे.”

“सर्वसामान्य जनतेची लूट होत असलेला हा सगळा प्रकार अतिशय गंभीर आहे. आज रुग्णालय प्रसाशन, व्यवस्थापन, डॉक्टरांच्या करोडोंच्या मालमत्ता तयार होत आहेत. या सगळ्यामध्ये रुग्णांना लुटून उभारलेला पैसा, शासकीय योजनेतील हडप केलेला पैसा आहे. याची शासनाने गंभीर दखल घेऊन वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशी केली पाहिजे. ईडी अथवा सीबीआय मार्फत चौकशी करावी, इतका हा मोठा व गंभीर विषय आहे. त्यामुळे यावर त्वरित निर्णय घेऊन चौकशी करावी, तसेच दोषींवर कारवाई करावी, अन्यथा युवक काँग्रेसच्या माध्यमातून रुग्णालये, धर्मादाय आयुक्तालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही सुरवसे पाटील यांनी दिला.


धर्मादाय रुग्णालये किंवा शासकीय योजना असलेल्या खासगी रुग्णालयांतून सर्वसामान्य, गोरगरीब जनतेची होणारी लूट संतापजनक आहे. अतिशय संकटात सापडलेल्या अवस्थेत, त्या परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्या या लोकांकडे माणुसकी राहिलेली नाही. रुग्णांचा व शासनाचा पैसा ही मंडळी लुटत आहेत. यांच्यावर वेळीच अंकुश लावण्याची गरज आहे.

  • रोहन सुरवसे पाटील, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

भक्ती वेदांत संशोधन केंद्र आणि पीव्हीजी महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार 

हस्तलिखितांचे संवर्धन, संशोधन आणि प्रशिक्षण साठी  करार उपयुक्त

पुणे : भक्ती वेदांत संशोधन केंद्र आणि पीव्हीजीचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय आणि जी.के. पाटे (वाणी) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. हस्तलिखितांचे संवर्धन, संशोधन आणि प्रशिक्षण साठी हा करार उपयुक्त ठरणार आहे. 
पुण्यातील इस्कॉन मंदिराच्या प्रांगणात असणाऱ्या भक्तिवेदांत संशोधन केंद्रात हा सामंजस्य करार करण्यात आला.  यावेळी भक्ती वेदांत संशोधन केंद्राचे संचालक डॉ. के. एन. धुमाळ, शैक्षणिक विभागाचे अधिष्ठाता डॉ.जनार्दन चितोडे, संचालक संजय भोसले, सचिव भूषण चौधरी, इस्कॉन मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, पुणे विद्यार्थी गृह (पी व्ही जी) महाविद्यालयाचे संचालक एस. पी. रेडेकर, प्रा. आर.जी. कडुस्कर, डॉ. एम.आर. तारंबळे, डॉ. के.जे. कुलकर्णी, डॉ. एस.टी गायकवाड यावेळी उपस्थित होते.   

नवीन शैक्षणिक धोरण आणि भारतीय ज्ञान प्रणालीच्या अनुषंगाने  विद्यार्थ्यांचा अध्यात्माकडे कल वाढविणे, विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी  विद्याशाखांचे सक्षमीकरण करणे. याशिवाय विद्यार्थी प्रशिक्षण कार्यक्रम, विद्यार्थी इंटर्नशिप अंतर्गत विद्यार्थ्यांना  भक्तिवेदांत संस्थेच्या विविध उपक्रमांवर  काम करता यावे यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे.

महाविद्यालयाचे इच्छुक विद्यार्थी भक्तिवेदांत संशोधन केंद्रासोबत  सामाजिक जबाबदारी म्हणून काम करू शकतात. दोन्ही संस्था एकत्रितपणे प्रादेशिक भाषेत भगवत गीतेची व्याख्याने घेणार आहेत.  विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्स, उच्चशिक्षण  आणि नोकरी साठी मार्गदर्शन करण्यासाठी सहयोग देखील या सामंजस्य कराराच्या माध्यमातून होणार आहे. 
भारताचा समृद्ध इतिहास, तत्त्वज्ञान आणि सांस्कृतिक वारसा जतन, संशोधन आणि प्रसार करण्यासाठी पुण्यातील इस्कॉन मंदिराच्या आवारात भक्तिवेदांत संशोधन केंद्राची  स्थापना करण्यात आली आहे. हे संशोधन केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. भक्तिवेदांत संशोधन केंद्र अनेक संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होऊन अनेक आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आणि प्रतिष्ठीत विद्यापीठांच्या संशोधकांशी  जागतिक स्तरावर जोडलेले आहे. पीव्हीजीचे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय आणि जी.के. पाटे (वाणी) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध शैक्षणिक आणि धर्मादाय संस्था आहे.

शिरसोडी तालुका इंदापूर व कुगाव तालुका करमाळा यांना जोडणाऱ्या उजनी धरण बॅक वॉटरमध्ये लांब पुलाचे बांधकाम करण्यास मान्यता

केबल सपोर्टेड पुलाचे बांधकाम, पोच मार्गाचे बांधकाम आणि इतर कामांसाठी 396 कोटी रुपयांच्या बांधकामास प्रशासकीय मंजुरी

–उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर शासन निर्णय जारी

मुंबई, दि. 16 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशांनंतर कौठळी पोंदकूलवाडी इंदापूर शहर, कालठण नंबर 2 ते शिरसोडी रस्ता प्रजिमा 191 येथील शिरसोडी तालुका इंदापूर व कुगाव तालुका करमाळा यांना जोडणाऱ्या उजनी धरण बॅक वॉटरमध्ये लांब पुलाचे बांधकाम करण्यासाठी 395 कोटी 97 लक्ष 32 हजार अंदाजित खर्चाच्या बांधकामास राज्यसरकारकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून यामुळे इंदापूर व करमाळा तालुका आणि परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे.

इंदापूर व करमाळा तालुक्यातील नागरिकांची  गैरसोय लक्षात घेऊन इंदापूर तालुक्यातील कौठळी पोंदकुलवाडी  ते करमाळा तालुक्यातील कुगावला जोडणाऱ्या उजनी धरण बॅक वॉटरमध्ये पुलाचे बांधकाम, पोच मार्गाचे बांधकाम आणि इतर अनुषंगिक कामांबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.  त्यानुसार कार्यवाही तातडीने पूर्ण करुन या कामांना प्रशासकीय मान्यता राज्यसरकारकडून देण्यात आली असून त्याचा शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे.

राज्य सरकारने दिलेल्या प्रशासकीय मंजुरीमध्ये कौठळी पोंदकूलवाडी इंदापूर शहर, कालठण नंबर 2 ते शिरसोडी रस्ता प्रजिमा 191 येथील शिरसोडी तालुका इंदापूर व कुगाव तालुका करमाळा यांना जोडणाऱ्या उजनी धरण बॅक वॉटरमध्ये लांब पुलाचे बांधकाम या कामांचा समावेश आहे.

सोमेश्वरनगर येथे 100 खाटांच्याआरोग्य पथकासाठी 77 कोटी 79 लाखांचा निधी मंजूर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर
अवघ्या तीन दिवसांमध्ये शासन निर्णय जारी

मुंबई, दि. 16 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशांनंतर अवघ्या तीन दिवसात बारामती तालुक्यातील मौजे सोमेश्वरनगर (वाघळवाडी) येथे, बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त शंभर खाटांचे आरोग्य पथक (आरोग्य प्रशिक्षण केंद्र) स्थापन करण्यास तसेच त्यासाठी 77 कोटी 79 लाख रुपयांच्या खर्चास राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या आरोग्य प्रशिक्षण केंद्रासाठी बांधकाम, पदनिर्मिती व यंत्रसामग्री खरेदीसही मान्यता देण्यात आली आहे. यामुळे मौजे सोमेश्वरनगरसह बारामती तालुका आणि परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

बारामती तालुक्यातील मौजे सोमेश्वर (वाघळवाडी) येथे, बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिनस्त शंभर खाटांचे आरोग्य पथक स्थापन करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन दिवसांपूर्वी बैठक घेऊन यासंदर्भातील आवश्यक कार्यवाही तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानंतर अवघ्या तीन दिवसात कार्यवाही पूर्ण करुन शंभर खाटांच्या आरोग्य पथकास (आरोग्य प्रशिक्षण केंद्रास) मान्यता देण्यात आली आहे. उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेस अधिन राहून 77 कोटी 79 लाख रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. आरोग्य केंद्राचे बांधकाम, पदनिर्मिती, यंत्रणा व साधनसामग्रीसंदर्भात प्रचलित नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.

‘पीएम-सूर्य घरः मोफत वीज योजना’ या योजनेसाठी एक कोटींहून जास्त कुटुंबांची नोंदणी झाल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

‘पीएम-सूर्य घरः मुफ्त बिजली योजना’ या योजनेसाठी एक कोटींहून जास्त कुटुंबांची नोंदणी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आनंद व्यक्त केला.

पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केलेः

अतिशय आऩंदाची बातमी!

“ही योजना सुरू केल्यापासून सुमारे महिनाभरात एक कोटींहून जास्त कुटुंबांनी स्वतःची ‘पीएम-सूर्य घरः मुफ्त बिजली योजना’ या योजनेसाठी आधीच नोंदणी केली आहे.

देशाच्या सर्व भागातून नोंदणीचा ओघ सुरू झाला आहे.

आसाम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओदिशा, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश मध्ये पाच लाखांपेक्षा जास्त नोंदणी झाली आहे.

ज्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली नाही, त्यांनी सुद्धा लवकरात लवकर नोंदणी करावी.

pmsuryaghar.gov.in

“या उपक्रमामुळे ऊर्जा उत्पादनासह घरांच्या विजेच्या खर्चात लक्षणीय कपात होण्याची हमी मिळत आहे. यामुळे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायर्नमेंट (लाईफ) या जीवनशैलीला प्रोत्साहन मिळेल आणि ही पृथ्वी अधिक चांगली बनवण्यात योगदान मिळेल.”

लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांचे देशवासीयांना पत्र

नवी दिल्ली-लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखा शनिवारी 16 मार्च रोजी जाहीर होणार आहेत. याआधी, शुक्रवारी, 15 मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला पत्र लिहिले. पीएम मोदींनी त्यात लिहिले आहे की, तुमची आणि आमची एकजूट एक दशक पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर आहे. 140 कोटी भारतीयांचा विश्वास आणि पाठिंबा मला प्रेरणा देतो.

“तुमच्या आणि माझ्या आपल्या दोघांच्या सोबतीला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. माझ्या 140 कोटी कुटुंबीयांसोबतच हे विश्वासाच, सहकार्याच आणि समर्थनाच नात माझ्यासाठी किती विशेष आहे, हे मी शब्दात नाही सांगू शकतं” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलं आहे. “माझ्या कुटुंबीयांच्या आयुष्यातील सकारात्मक बदल हेच मागच्या 10 वर्षातील आमच्या सरकारच यश आहे. आम्ही प्रत्येक धोरण, निर्णय या माध्यमातून गरीब, शेतकरी, युवक आणि महिलांच्या जीवनाचा स्तर उंचावण्याचा, त्यांना अजून सशक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याचे परिणाम आपल्यासमोर आहेत” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

“प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत सर्वांना पक्की घरे, सर्वांना वीज, पाणी, गॅस, आयुष्मान भारत योजनेद्वारे उपचाराची व्यवस्था, शेतकरी भाऊ-बहिणींना मदत, मातृ वंदना योजनेच्या माध्यमातून माता-भगिनींना सहाय्यता हे सर्व प्रयत्न फक्त तुमच्या विश्वासाची साथ असल्यामुळे शक्य झालं” असं मोदी म्हणाले. “विकास आणि वारसा सोबत पुढे घेऊन जाणाऱ्या भारताने मागच्या एक दशकात पायाभूत सुविधांच अभूतपूर्व निर्माण पाहिलं. समृद्ध संस्कृती आणि परंपरेसोबत पुढे जाणाऱ्या देशाचा आज प्रत्येक देशवासियाला अभिमान आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

“जीएसटी लागू करण, अनुच्छेद 370 संपवणं, तीन तलाकवर नवीन कायदा, संसदेत महिलांसाठी नारी शक्ति वंदन अधिनियम, नवीन संसद भवनाची निर्मिती, दहशतवाद-नक्षलवादावर कठोर प्रहार यासारखे ऐतिहासिक आणि मोठे निर्णय तुमच्या विश्वासामुळे घेऊ शकलो” असं मोदी यांनी म्हटलय.

“जनभागीदारी आणि जनसहयोग लोकशाहीच सौंदर्य आहे. तुमचा विश्वास आणि सहकार्यामुळे देशहितसाठी मोठे निर्णय, मोठ्या योजना लागू करण्यासाठी शक्ती आणि ऊर्जा मला मिळाली. विकसित भारताच्या निर्माणाचा संकल्प घेऊन आपण पुढे जातोय. त्यासाठी मला तुमचे विचार, सूचना आणि सहकार्याची आवश्यकता आहे. तुमचा आशीर्वाद आणि समर्थन मला मिळत राहील. राष्ट्रनिर्माणसाठी प्रयत्न न थकता सुरु राहतील. ही मोदींची गारंटी आहे” असं मोदींनी पत्रात लिहिलय.

मैं मोदी का परिवार हूं:भाजपचे निवडणूक गीत

भाजपने आज आपल्या निवडणूक प्रचाराचे थीम साँग ‘मैं मोदी का परिवार हूं’ लाँच केले आहे. 

मैं मोदी का परिवार हूं…मेरे दिल के घर में वो रहता मेरी फिक्र हमेशा करता है… दुख दर्द मेरा समझे वो, मेरी खुशी में शामिल रहता है… वो नहीं अकेला खड़ा यहां, मैं उसका संसार हूं… मैं मोदी का परिवार हूं…

पक्षाने 10 दिवसांपूर्वी (6 मार्च) ही मोहीम सुरू केली होती. खरे तर, 3 मार्च रोजी पाटणा येथे महाआघाडीच्या मेळाव्यात लालू यादव म्हणाले होते की पंतप्रधान परिवारवादावर हल्ला करतात, परंतु त्यांचे स्वतःचे कुटुंब नाही.

याला प्रत्युत्तर म्हणून भाजप नेत्यांनी त्यांच्या एक्स प्रोफाईलवर त्यांच्या नावापुढे ‘मोदींचे कुटुंब’ लिहिण्यास सुरुवात केली.

ED समन्स प्रकरणात CM केजरीवाल यांना अटकपूर्व जामीन

नवी दिल्ली- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात जामीन मिळाला. 15,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.मात्र, अद्याप सुनावणी सुरू आहे. कोर्टाने केजरीवाल यांना कोर्ट रूममधून बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. हे प्रकरण ईडीच्या याचिकेशी संबंधित आहे. ज्यावर त्यांना ७ मार्च रोजी न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते.ईडीने केजरीवाल यांना आतापर्यंत 8 समन्स बजावले आहेत. केजरीवाल एजन्सीसमोर एकदाही हजर झाले नाहीत. यानंतर तपास यंत्रणेने केजरीवाल यांच्याविरोधात न्यायालयात दोन तक्रारी दाखल केल्या.

शुक्रवारी (15 मार्च) राऊस ॲव्हेन्यू कोर्टात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने केजरीवाल यांना हजर राहण्यास सांगितले. वास्तविक, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिकरित्या हजर राहण्यापासून सूट मागितली होती.

न्यायालयीन युक्तिवाद…

कोर्ट- आरोपी हजर आहेत का?

गुप्ता- होय, ते कोर्टात आहे आणि तुम्ही जामीन बॉण्ड मागवू शकता. यानंतर केजरीवाल जाऊन उलटतपासणी सुरू ठेवू शकतात.

न्यायालय- 15,000 रुपयांच्या जामीन जातमुचलक्यावर जामीन मंजूर करते. केजरीवाल न्यायालयातून जाऊ शकतात. तरीही वकिलांनी न्यायालयात हजर राहावे.

ईडी – या प्रकरणातील कलमे एकदा पाहा.

कोर्ट- आरोप जामीनपात्र असून आरोपीने जामीन मागितला आहे.

केजरीवालांचे वकील म्हणाले- मुख्यमंत्र्यांनी ईडीच्या प्रत्येक समन्सला उत्तर दिले
विशेष न्यायाधीश (CBI) राकेश सायल यांच्या एकल खंडपीठासमोर १५ मार्च रोजी एएसजी एसव्ही राजू ईडीच्या वतीने न्यायालयात हजर झाले. तर केजरीवाल यांचे वकील ज्येष्ठ वकील रमेश गुप्ता आणि अधिवक्ता राजीव मोहन होते. केजरीवाल यांच्या वकिलांनी सांगितले की, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ईडीच्या प्रत्येक समन्सला उत्तर दिले आहे. मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीमुळे ते ईडीसमोर हजर राहू शकले नाहीत. ईडीने कोर्टात तक्रार करण्यापूर्वी केजरीवाल यांना कारणे दाखवा नोटीसही दिली नाही.

2 फेब्रुवारी रोजी 5 व्या समन्सनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री चौकशीसाठी आले नाहीत तेव्हा ईडीने राऊस ॲव्हेन्यू कोर्टात याचिका दाखल केली होती. दिल्ली विधानसभेतील विश्वासदर्शक ठराव आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या चर्चेमुळे केजरीवाल 14 फेब्रुवारी रोजी न्यायालयात व्हर्चुअल हजर झाले होते. यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी 16 मार्च निश्चित केली होती.

ईडीने केजरीवाल यांना 8 समन्स पाठवले आहेत
मद्य धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने आतापर्यंत अरविंद केजरीवार यांना आठ समन्स पाठवले आहेत. केजरीवाल यांना 27 फेब्रुवारी, 26 फेब्रुवारी, 22 फेब्रुवारी, 2 फेब्रुवारी, 17 जानेवारी, 3 जानेवारी, 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबरला समन्स पाठवण्यात आले होते. मात्र, ते एकदाही चौकशीसाठी हजर झालेले नाहीत.

ईडीला अटक करण्याचा अधिकार आहे
सीएम केजरीवाल वारंवार हजर न झाल्यास ईडी त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करू शकते. त्यानंतरही ते हजर न झाल्यास कलम ४५ अन्वये अजामीनपात्र वॉरंट जारी केले जाऊ शकते.

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हजर न होण्यामागे ठोस कारण दिले गेले तर ईडी वेळ देऊ शकते. नंतर पुन्हा नोटीस जारी करा. पीएमएलए अंतर्गत नोटीसकडे वारंवार दुर्लक्ष केल्यास अटक होऊ शकते.

सीएम केजरीवाल पुढे हजर न झाल्यास तपास अधिकारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करू शकतात. ठोस पुरावे असल्यास किंवा प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास त्यांना अटक केली जाऊ शकते.

त्याचवेळी वॉरंट जारी झाल्यानंतर केजरीवाल न्यायालयात जाऊन त्यांच्या वकिलाच्या उपस्थितीत तपासात सहकार्य करण्याचे आश्वासन देऊ शकतात. त्यावर कोर्ट ईडीला त्याला अटक न करण्याचे निर्देश देऊ शकते.

इलोक्टोरल बाँड हप्तावसुलीचाच प्रकार, भाजपा सरकारचे स्पष्ट धोरण ‘चंदा दो, धंदा लो’ :- जयराम रमेश

भारत जोडो न्याय यात्रेतून ५ साल, ५ न्याय आणि २५ गॅरंटी

वाडा,पालघर, दि. १५ मार्च.
इलेक्टोरल बाँड संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्वपूर्ण आहे. भारतीय जनता पक्षाला इलेक्टोरल बाँडमधून ६ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. ज्या कंपन्यांवर ईडी, आयकर, सीबीआयची कारवाई झाली त्या कंपन्यांनी कारवायानंतर इलेक्टोरल बँड घेतले आहेत त्याचा फायदा कोणत्या पक्षाला झाला हे स्पष्ट आहे. तसेच ज्या कंपन्यांना मोठ्या कामाची कंत्राटे मिळाली त्या कंपन्यांनीही हे बाँड खरेदी केले आहेत. इलेक्टोरल बाँड हा सरळ सरळ हप्तावसुलीचा प्रकार आहे. भाजपाचे धोरण स्पष्ट आहे, ‘चंदा दो, धंदा लो’, असा घणाघाती हल्ला अखिल भारतीय काँग्रेसच्या मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी केला.

पालघर जिल्ह्यातील वाडा येथील पत्रकार परिषदेला जयराम रमेश संबोधित करत होते. ते पुढे म्हणाले की, इलेक्टोरल बाँड हा स्वतंत्र भारतातील सर्वात मोठा घोटाळा आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून धमकी देऊन हप्ता वसूली केल्याचा हा प्रकार आहे. इलेक्टोरल बाँड खरेदीमध्ये शेल कंपन्यांचा वापरही मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. ज्या कंपन्यांना रस्ते, भुयार, यासारखी मोठ्या किमतीची कंत्राटे मिळाली त्या कंपन्यांनी हे बाँड घेतले आहेत. कामाच्या बदल्यात इलेक्टोरल बाँड हे स्पष्ट झाले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही यादी जाहीर केली असली तरी त्यात आणखी माहिती प्रकाशित होण्याची गरज आहे. सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निर्देशानंतर जी माहिती बाहेर येईल त्यातून कोणत्या कंपनीकडून कोणत्या पक्षाला किती पैशाचा लाभ झाला हेही स्पष्ट होईल.

ईव्हीएम संदर्भात इंडिया आघाडी मागील १० महिन्यापासून निवडणूक आयोगाकडे भेटण्यास वेळ मागत आहे पण आयोग वेळ देत नाही. ईव्हीएमबरोबर व्हिव्हिपॅटचा उपयोग करावा ही इंडिया आघाडीची मागणी आहे. आयोगाला भेटून एक निवदेन देण्याचा प्रयत्न आहे परंतु निवडणूक आयोग भेटतच नाही. निवडणूक आयोगावर कोणाचा दबाव आहे का? असा सवाल करत हे लोकशाहीला धोकादायक आहे, असेही जयराम रमेश म्हणाले.

भारत जोडो न्याय यात्रा मणिपूरच्या इम्फाळपासून मुंबईपर्यंतची ६७०० किमीची यात्रा देशाच्या भवितव्यासाठी परिवर्तनकारी ठरेल. ही वैचारिक यात्रा आहे आणि अशाच पद्धतीच्या यात्रा राज्याराज्यात तसेच जिल्हा स्तरावर होत राहतील. विचारधारेत स्पष्टता येण्यासाठी तसेच जनतेशी संवाद साधण्यासाठी यात्रा महत्वाची आहे. यात्रा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह व ऊर्जा निर्माण करण्यासाठी मोलाची ठरली आहे. नफरत परवणाऱ्या विचारधारेला ५ साल, ५ न्याय आणि २५ गॅरंटी मधून उत्तर दिले आहे. महाराष्ट्रात नंदूरबारपासून सुरु झालेली यात्रा उद्या मुंबईत चैत्यभूमीवर समाप्त होईल असे जयराम रमेश म्हणाले.

हिंदुस्थानच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात.

इलोक्टोरल बाँड हे पंतप्रधान मोदींनी चालवलेले जगातील सर्वात मोठे वसुली रॅकेट: राहुल गांधी

सीबीआय, ईडी, आयकर विभागाकडून दबाव टाकून कार्पोरेट्सकडून वसुली.

सर्व सरकारी यंत्रणा मोदींनी वसुलीच्या कामाला जुंपल्या, ईडी सीबीआय भाजपा आरएसएसचे शस्त्र.

भिवंडी, दि. १५ मार्च
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय अर्थकारण साफ करण्याची भाषा करून इलेक्टोरल बाँड पद्धत आणली पण या बाँडची खरी बाजू आज देशाला समजली आहे. इलोक्टोरोल बाँड हे जगातील सर्वात मोठे हप्तावसुली रॅकेट आहे आणि सीबीआय, ईडी, आयकर विभागाला यासाठी गुंतवून वसुली केली आहे. हिंदुस्थानच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे, असा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संध्याकाळी भिवंडी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी या घोटाळ्यावरून भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर हल्ला केला. ते पुढे म्हणाले की, सीबीआय, ईडी, आयकर विभागाकडून कार्पोरेट कंपन्यांवर दबाव टाकून ही वसुली करण्यात आलेली आहे. एखाद्या कंपनीवर सीबीआय ईडी किंवा आयकर विभागाची कारवाई होते त्यानंतर ती कंपनी बाँड खरेदी करते हे उघड झाले आहे. काही कंपन्यांना काम देऊन त्यातील हिस्सा या बाँडच्या माध्यमातून वसूल केला आहे. काही कंपन्यांना राष्ट्रीय महामार्ग, रस्ते, टनेलचे कंत्राट दिले त्या कंपन्यांकडूम मोठी वसुली केली आहे. हा गंभीर गुन्हेगारीचा प्रकार असून राष्ट्रद्रोह आहे. या घोटाळ्यात नितीन गडकरींचा सहभाग नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच हात आहे. ईडी, सीबीआय, आयकर, निवडणूक आयोग या संस्थांना मोदींनी वसुलीच्या कामाला जुंपले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात शेल कंपन्यांचा वापर केला आहे. सर्वच्या सर्व यंत्रणाच वसुलीच्या कामाला जुंपल्या आहेत. या संस्था भाजपा व आरएसएसच्या शस्त्र बनवल्या आहेत. परंतु भाजपाची कधीतरी सत्ता जाईल आणि त्यावेळी जी चौकशी होईल ती अत्यंत कठोर कारवाई असेल.
काँग्रेससह विरोधी पक्षांनाही या बाँडचे पैसे मिळाले आहेत या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, यातील सर्वात जास्त पैसा भाजपाला मिळालेला आहे. १०-२० टक्के पैसा विरोधी पक्षांना मिळाला असेल परंतु काँग्रेसकडे हायवे किंवा इतर कंत्राट देण्याचे अधिकार नाहीत. सीबीआय, ईडी, आयकर विभाग यांच्यावर विरोधी पक्षांचे नियंत्रण नाही ते या सर्व संस्था पंतप्रधानांच्या नियंत्रणात आहेत असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.