ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नवी दिल्ली द्वारा आयोजित १५व्या अखिल भारतीय स्त्री साहित्य – कला संमेलनाचे उदघाटन महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते संपन्न
पुणे दि.१६: स्त्रीच्या साहित्यामधून स्त्रीने स्वतःला व्यक्त केलेला आहे ती कोणत्या जातीची आहे, कोणत्या धर्माची आहे त्याच्याबरोबर काही प्रश्न स्त्रियांचे सारखे आहेत आणि काही प्रश्न त्यांच्या सामाजिक परिस्थितीनुसार वेगवेगळे आहेत यामधला इतिहास पहिला तर असे दिसते की, जैन समाजामध्ये अनेक साध्वीनी अनेक वर्षापासून समाज प्रबोधन करत समाजात फार मोठ योगदान दिलेलं आहे. त्यांचे योगदान स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे राहिले असल्याची भावना विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. आजच्या काळातही जैन महिलांनी निर्भयतेने समाजात व साहित्यात व्यक्त व्हायला हवेअसे नीलमताई गोर्हे म्हणाल्या.
आज स्वानंद महिला संस्था श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स महिला शाखा नवी दिल्ली यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या १५व्या अखिल भारतीय स्त्री साहित्य – कला संमेलनाचे उदघाटन महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले.
तर
स्वागताध्यक्षा आशा लुंकड, विशेष अतिथी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ श्रीपाल सबनीस यांची प्रमुख उपस्थिती व संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका नीलम माणगावे यांच्या अध्यक्ष होत्या .
याप्रसंगी आ. उमा खापरे, प्रकाश धारिवाल, रमनलाल लुंकड, अविनाश चोरडिया, पारस मोदी, पुष्पा गोखरू, दिना धारिवाल, आशा कटारिया, अशोक पगरिया, लता पगारिया, सुरेखा कटारिया, कल्पना बंब, सीमा गांधी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, स्त्रियांवर पूर्वीपासूनच अन्याय अत्याचार होत आले आहेत तिच्या स्वातंत्र्यावर गदा आणली गेली, आजही पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी आपल्याला समाजामध्ये घडताना दिसतात, या सगळ्या पार्श्वभूमीवर जैन समाजातल्या महिलांना एकत्र करून आपल्या निर्भीड विचारांनी सातत्याने सुरेखाताई कटारिया यांनी समाजाशी संवाद साधलेला असून त्यांनी लिहिलेल्या उत्कृष्ट वक्तृत्व कला च्या दुसऱ्या आवृत्ती चे प्रकाशन आज करण्यात आले असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी जाहीर केले.
देशाच्या कोविड काळामध्ये व्यापाराचा बराचसा भाग महिलांनी उचलला असल्याचे निदर्शनास आले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
स्त्रियांनी राजकारणात सुद्धा प्रवेश करायला पाहिजे आणि राजकारणात प्रवेश करत असताना स्त्रिया का येत नाहीत याचे अनेक वर्ष राजकारणात असल्यामुळे जेव्हा निरीक्षण, अभ्यास केला तेव्हा प्रामुख्याने तीन कारणं समोर आली आहेत, एक म्हणजे चारित्र्य हननाची भीती तिच्याबद्दल वाईट बोलतील दुसरे म्हणजे समाजातील पुरुषप्रधानता आणि तिसरा म्हणजे हिंसाचार यामुळे स्त्रिया राजकारणापासून लांब राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
७३ व ७४ वी घटना दुरुस्ती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्त्रियांना आरक्षण मिळाले यामुळे स्त्रिया महापौर झाल्या, अनेक मोठी पदे भूषवली, त्या लिहायला, बोलायला लागल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच महिलांना संसदेत प्रतिनिधित्व मिळावे याकरिता स्त्रियांना राजकीय आरक्षण दिलेल आहे याचा जास्तीत जास्त स्त्रियांनी फायदा घेऊन निर्णय प्रक्रियेत सहभागी झाले पाहिजे, स्त्रियांनी राजकारणात आल्यास राजकारणाची परिभाषा बदलून शकते असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.