पुणे:बारामती लोकसभा मतदारसंघाची महायुतीची समन्वय बैठक दि.17 मार्च रविवारी , सकाळी 11 वाजता, मोरोपंत नाट्यगृह, नवीन कचेरी रस्ता, समर्थ नगर, बारामती येथे आयोजित करण्यात आली आहे.
शिरूर, बारामती, पुणे लोकसभा क्लस्टर चे प्रमुख ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडेल. बैठकीसाठी शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय माशिलकर,आ. राहुल कुल, आ. दत्तात्रेय भरणे, राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,भाजपा चे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, भाजपा चे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे,राष्ट्रवादी चे नेते रमेशअप्पा थोरात, पी डी सी सी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, कात्रज दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, बाळासाहेब चांदेरे, गीतांजली ढोणे, भारतीताई पांढरे,जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे,महेशजी पासलकर,आर पी आय चे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर,विक्रम शेलार, सूर्यकांतजी वाघमारे,तसेच महायुतीतील सहयोगी पक्ष लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम पक्ष,रयत क्रांती संघटना, भीमसेना, पी जे पी, स्वाभिमान, जे. एस. एस, आर एस पी, ब. वि. आ,पी जे पी, राष्ट्रीय स्वराज्य सेना, महाराष्ट्र क्रांती सेना,
लहुजी सेना च्या पदाधिकाऱ्यांसह सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी सांगितले..
ह्या बैठकीत लोकसभेच्या प्रचाराचे नियोजन करण्यात येईल असे महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची रणनीती उद्या ठरणार, समन्वय समितीची बारामतीत बैठक
Date: