इलोक्टोरल बाँडमधून खंडणी वसुली करणारी भारतीय जनता पार्टी आता बाँड जनता पार्टी.
२०१४ सारखीच मोदींची गॅरंटी फेकूगिरी व जुमलेबाजी, काँग्रेसची गॅरंटी मात्र वॉरंटीसहः नाना पटोले
मुंबई, दि. १६ मार्च
भाजपाची निती विधाजनकारी आहे, ते ध्रुवीकरणाचे राजकारण करतात, समाजात द्वेष पसवण्याची त्यांची निती आहे. काँग्रेसची लढाई आरएसएसच्या विचारधारे विरोधात तसेच राजकारणात भाजपाशी मुकाबला सुरु आहे. मोदींनी २०१६ मध्ये नोटबंदी केली आणि आता २०२४ काँग्रेसची बँक खातेबंदी केली. नरेंद्र मोदी वन नेशन,वन इलेक्शन करून वन नेशन आणि नो इलेक्शन करण्याचा डाव आहे. २०२४ मध्ये लोकशाही वाचेल का याची भिती आहे असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश यांनी केला आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मीडिया प्रभारी जयराम रमेश, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली यावेळी ते बोलत होते. जयराम रमेश पुढे म्हणाले की, इलोक्टोरल बाँडच्या माध्यमातून भाजपाने कोट्यवधी रुपयांचे खंडणी गोळा केली. भाजपाने अजेंडा होता, चंदा दो, धंदा लो, हप्तावसुली, कंत्राट घ्या, लाच द्या, आणि खोट्या कंपनी बनवा व चंदा द्या. परंतु भाजपाची ही खंडणी वसुली उघड झाली आहे. इलोक्टोरल बाँडमधील आणखी माहिती बाहेर येणार आहे. हा सर्व प्रकार पाहता भारतीय जनता पार्टीची आता बाँड जनता पार्टी झाली आहे.
भारत जोडो न्याय यात्रा १४ जानेवारी २०२४ रोजी मणिपूरच्या इम्फाळमधून सुरुवात झाली. १६ राज्य ११० जिल्हे व ६७०० किलोमीटरचे अंतर पार करुन मुंबईत यात्रेचा समारोप झाला. इलोक्टोरल बाँड मधून भाजपाला मिळालेल्या ६००० कोटी रुपयांची खंडणीविरोधात न्याय यात्रेच्या ६००० किमीचा सामना असे मुद्दा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिसेल. या यात्रेतून पाच न्याय गॅरंटी दिल्या आहेत. युवा न्याय, शेतकरी न्याय, महिला न्याय, कामगार न्याय व भागिदारी न्याय अशा पाच न्याय व २५ गॅरंटी दिल्या आहेत. काँग्रेसची गॅरंटी व्यक्तिची नाही तर पक्षाची आहे तर मोदींची गॅरंटी संविधानाला धोका, सर्वांना आर्थिकदृष्ट्या संपवून टाकण्याची गॅरंटी आहे असा टोलाही मारला.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारत जोडो न्याय यात्रेवर भाजपाच्या राज्यात हल्ले करण्यात आले. राहुल गांधींना मंदिरात जाऊ दिले नाही. धर्माचे ठेकेदार आपणच असल्याचा अविर्भाव भाजपाने दाखवला. पण यात्रा थाबंली नाही, महाराष्ट्रात न्याय यात्रेला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. या न्याय यात्रेतून २५ गॅरंटी दिल्या आहेत, फक्त गॅरंटी नाही तर वॉरंटी सहित आहेत. मोदींची २०१४ ची गॅरंटी खोटी होती,निवडणूक जुमला होता असे भाजपानेट जाहीर सांगून जनतेची फसवणूक केली. भाजपाची गॅरंटी फेकूगिरी व जुमलेबाजी असते पण काँग्रेस सत्तेत आल्यास या सर्व गॅरंटी पूर्ण केल्या जातील.
या पत्रकार परिषेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना खासदार राजन विचारे, खासदार कुमार केतकर, आमदार अमिन पटेल, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सप्रा, माजी आमदार मुझ्झफर हुसेन, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण, मनोज शिंदेा आदी उपस्थित होते.