पुणे : मोहे पनघट पे नन्दलाल छेड़ गयो रे….ओ घटा साँवरी, थोड़ी-थोड़ी बावरी…नील गगन की छाँव में …गुमनाम है कोई बदनाम है कोई….यारा सिली सिली….परदेसिया ये सच है पिया अशी एकाहून एक सरस गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी सादर करीत स्वरसम्राज्ञी – एक अभिजात स्वरानुभूती ही सुरेल मैफल रंगली. आपल्या गायकीतून कलाकारांनी लता मंगेशकर पर्वाची अनुभूती प्रेक्षकांना दिली.
रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ कल्चरल कमिटीतर्फे आयोजित भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या अजरामर गीतांची सुरेल मैफल “स्वरसम्राज्ञी – एक अभिजात स्वरानुभूती” या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन कोथरूड मधील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात करण्यात आले होते. यावेळी रोटरी क्लबच्या प्रांतपाल मंजू फडके, प्रांतपाल इलेक्ट शितल शहा, क्लबच्या कल्चरल कमिटीच्या संचालिका अमृता देवगांवकर, सहसंचालिका स्नेहल भट, होस्ट क्लब अध्यक्ष जिग्नेश कारिया उपस्थित होते. आमदार चंद्रकांत पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
विशेष मुलांसाठी कार्यरत असलेल्या स्मित फाऊंडेशनला आर्थिक मदत देण्यात आली. रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर, रोटरी क्लब ऑफ पुणे बावधन एलिट, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण पुणे व रोटरी क्लब ऑफ आळेफाटा यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात सक्रिय सहभाग घेतला आहे.
माई री मैं कासे कहूँ या दस्तक चित्रपटातील गीतापासून स्वर मैफिलीची सुरुवात झाली. इक शहंशाह ने बनवा के हसीं ताज-महल…पानी पानी रे…रात ढलने लगी या गाण्याच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी दाद दिली. यावेळी लतादीदींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. ये दिल तुम बिन कही लगता नही हे मोहम्मद रफ़ी आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीताने संगीताच्या सुमधूर काळाची सफर प्रेक्षकांना घडवली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात झूठ बोले कौवा काटे…कहीदीप जले…जाना था हमसे दूर…रात भी है कुछ भिगी…जिंदगी उसकी है ही गीते सादर झाली. स्नेहल भट यांचे निवेदन बहारदार व समर्पक होते.
स्वरमैफलीत शीलू मेहता, स्वरदा गोडबोले, दीपक महाजन, केतन गोडबोले यांनी गायन केले. मुकेश देढिया, अभिजीत भदे, अमान सय्यद, विशाल गंड्रतवार, सचिन वाघमारे यांनी साथसंगत केली. अमृता ठाकूरदेसाई यांचे संगीत संयोजन होते. रोटरी क्लब ऑफ पुणे हेरिटेज, गांधीभवन, टिळक रोड, फिनिक्स, कोथरूड, कर्वेनगर, वारजे, विज्डम, साऊथ व सारसबाग या सदस्यांनी देखील सहभाग घेतला आहे. प्रांतपाल मंजू फडके यांच्या हस्ते कलाकारांचे सत्कार करण्यात आले. कल्चरल कमिटी अध्यक्षा अमृता देवगांवकर यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
इंडियन सिल्क गॅलरीतर्फे पुणेकरांसाठी २४ मार्चपर्यंत भव्य हॅन्डलूम प्रदर्शन
पुणे : “केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय, लघु व मध्यम उद्योग आणि खादी ग्रामोद्योग विभागाच्या माध्यमातून विणकर, हातमाग व्यावसायिक यांच्या प्रोत्साहनासाठी अनेक योजना आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अमृतकालामध्ये स्वदेशी, तसेच ‘लोकल फॉर ग्लोबल’ला प्रोत्साहन दिल्याने देशभरातील छोटे व्यावसायिक सक्षम होत आहेत,” असे प्रतिपादन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. देशभरातील विणकरांची कलाकुसर पाहण्याची, तसेच त्यांच्या कलेला दाद देण्याची संधी पुणेकरांना या प्रदर्शनामुळे उपलब्ध झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
केंद्र सरकारच्या अमृतकाल संकल्पनेअंतर्गत विणकर कामगारांना, हातमाग व्यावसायिकांना आणि हातमागावरील कपड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी इंडियन सिल्क गॅलरीतर्फे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय संचालित हातमाग विकास आयुक्तालयाच्या सहकार्याने आयोजित ‘माय प्राईड, माय हॅन्डलूम’ या भव्य हातमाग प्रदर्शनाचे (बिगेस्ट हॅन्डलूम एक्झिबिशन) उद्घाटन प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सेंट्रल सिल्क बोर्डाचे उपसंचालक (नि.) श्रीनिवास राव, कासट क्रिएशनचे मुकुंद कासट आदी उपस्थित होते. महाराष्ट्रासह अन्य १५ राज्यांतील ६० पेक्षा अधिक हातमाग व्यावसायिक व विणकरांनी यात सहभाग घेतला आहे. महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर पुणे येथे २४ मार्च २०२४ पर्यंत सकाळी ११ ते ८ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले आहे.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “देशाच्या विविध भागात असलेली विशेषता हातमाग, कॉटन, सिल्क, लिनन या कपड्यांच्या माध्यमातून पुणेकरांसमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. अतिशय सुंदर कलाकुसर, नक्षी आणि गुणवत्तापूर्ण कपडे उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन पुणेकर, विशेषतः महिलांसाठी ही एक अनोखी पर्वणी आहे. चोखंदळ व हौशी पुणेकर या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद देतील, अशी अपेक्षा वाटते.”
श्रीनिवास राव म्हणाले, “देशभरातील विणकर कामगारांनी केलेली कलाकुसर एकत्रितपणे पुणेकरांसमोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. महिला वर्गाच्या सौंदर्यात आणि आकर्षणात भर घालणारे पुण्यातील हे चौथे प्रदर्शन आहे. कुशल कारागिरांच्या हाताने विणलेल्या कपड्यावर सुंदर आणि मोहक नक्षीदार काम झाले आहे. रेशमी वस्त्रांची फारशी ओळख ग्राहकांना नसते. ग्राहकांना शुद्ध आणि हाताने विणकाम केलेल्या साड्या, ड्रेस मटेरियल्स व अन्य कपडे या प्रदर्शनात उपलब्ध करून दिले आहेत.”
पश्चिम बंगालच्या बुटीक साड्या, प्रिंटेड, चंदेरी, पैठणी, माहेश्वरी, बनारसी, गढवाल, कलमकरी, कांचीपुरम, करवथी अशा विविध राज्यांची ओळख असलेल्या असंख्य साड्या येथे पाहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत. महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, बिहार, कर्नाटक, गुजरात, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्यप्रदेश अशा विविध भागांतून साड्या, ड्रेस मटेरियल व अन्य साहित्याचे स्टॉल लागले आहेत, असे राव यांनी नमूद केले.
बारामती:राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता. 17) बारामतीत महायुतीच्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांची त्यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
बारामती लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील हे आता स्पष्ट होत असून आज चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याशी तब्बल पाऊण तास चर्चा केली. आजच्या भेटीत चंद्रकांत पाटील यांच्या समवेत आमदार राहुल कुल, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, संदीप खर्डेकर जय पवार, संभाजी होळकर, जय पाटील, आदी उपस्थित होते.
सकाळी सव्वा दहाच्या सुमारास चंद्रकांत पाटील यांचे बारामतीत आगमन झाल्यानंतर ते थेट सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी गेले. आतमध्ये यादीतील लोकांनाच प्रवेश दिला गेला. भेटीनंतर ते थेट पक्षकार्यालयात भेटीगाठींसाठी गेले.
जाण्यापूर्वी सर्वांनी विजयाची खूण करत फोटोसाठी पोझही दिली. या बैठकीत निवडणूकीच्या संदर्भात समन्वयाच्या दृष्टीने चर्चा झाल्याची माहिती असून महायुतीचा उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी करण्याबाबत व्यूहरचना आखण्याबाबतही विचारविनिमय झाला.
दरम्यान रविवारी दिवसभरात चंद्रकांत पाटील बारामतीतीलसमन्वय बैठकीस उपस्थित राहतील, माजी नगराध्यक्ष सुनील पोटे, भाजपचे सरचिटणीस अविनाश मोटे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र जेवरे, संजय वाघमारे, रंजन तावरे यांच्या घरी सदिच्छा भेटी गाठी घेणार आहेत.
पुणे- रस्त्यावरील जाहिरातीच्या शुल्क् वसुली साठी बड्या बड्या उद्योजकांकडे तगादा लावलेल्या, आणि त्यासाठी थकून बसून राहिलेल्या महापालिकेला आता निवडणूक आचारसंहिता लागल्यावर शहरात होणारी बेकायदा पोस्टर बाजी, फ्लेक्स आणि होर्डिंग्जवर कारवाईला प्रारंभ करावा लागतो आहे. अनेक ठिकाणी राजकीय , बिगर राजकीय लोकांनी बेकायदा पोस्टर बाजी करत फ्लेक्स लावून शहर विद्रूप करून ठेवले आहे. कुठे संकल्पना माझीच असे बोर्ड झळकत आहेत तर कुठे शिल्पकाराचे बोर्ड झळकत आहेत. या सर्वांसाठी आता स्वतःचा खर्च मनुष्यबळ लावून महापालिकेला हे बोर्ड काढावे लागत आहेत. अर्थात या साऱ्यांचे ओझे पुणेकरांच्या म्हणजेच महापालिकेच्या खांद्यावर च असणार आहे कारण आजवर असंख्य कोट्वायांधीच्या कोट्यावधींचे शुल्क वसुलीचे तगादे वाऱ्यावर विरलेले आहेत.
दरम्यान भाजपने शहरभर रंगवून ठेवलेल्या भिंती आता महापालिकेच्या कारवीच्या टप्प्यात येतील काय ? हे पाहावे लागणार आहे. गेली काही महीने शहरभर भाजपच्या विविध पदाधिकारी , माजी नगरसेवकांनी ठीक ठिकाणी सार्वजनिक भिंतीवर भाजपचा प्रचार करणाऱ्या जाहिराती बेकायदा पद्धतीने रंगविल्या आहेत . या विरोधात काहींनी आंदोलने केली पण त्यावर कारवाई करण्याची हिंमत महापालिकेने दाखविली नाही , आता आचारसंहिता लागल्यावर या भिंतींचा श्वास मोकळा होऊ शकणार आहे.
शनिवारी महापालिकेचे कामकाज बंद असल्याने हे कर्मचारी सुट्टीवर होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांची जबाबदारी असलेल्या भागात कारवाई सुरु केली आहे. यामध्ये सर्व पेठा, कोथरूड, बाणेर बालेवाडी, बालाजीनगर, कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, हडपसर, संपूर्ण नगर रस्ता आदी भागात कारवाई सुरु झाली आहे.’आचारसंहिता सुरु झाल्याने राजकीय पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांसह अन्य व्यक्ती, संस्थांचे फ्लेकस, बॅनर, बोर्ड काढून टाकण्यात सुरुवात झाली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत ही कारवाई पूर्ण होईल. आचारसंहितेच्या काळात आयोगाची परवानगी न घेता फ्लेक्स, बॅनर लावल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.’– संतोष वारुळे, उपायुक्त
पुणे- बालेवाडी ममता चौक ते वाकड पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यातील फेज २ चे लोकार्पण पुणे लोकसभा मतदार संघाचे भाजपा चे अधिकृत उमेद्वार मुरलीधर मोहोळ व पुणे शहर भाजपा अध्यक्ष धिरज घाटे यांच्या हस्ते संपन्न झाले. गेली अनेक वर्षांपासुन प्रलंबित असलेल्या व पुणे महानगरपालिकेने सन २०१५-१६ साली ४० कोटी रुपये खर्च करुन उभा असलेल्या बालेवाडी वाकड पुलाकडे जाणारा हा रस्ता आता पुर्णत्वास येत आहे. मागील अनेक वर्षांपासुन या रस्त्याकरीता निधी उपलब्ध व्हावा व तातडीने हा रस्ता पु्र्ण करुन बाणेर बालेवाडी येथील वाहतुक कोंडीची गंभिर समस्या सुटावी याकरीता माजी नगरसेवक अमोल बालवडकर व माजी नगरसेविका सौ.ज्योती कळमकर तसेच सौ.स्वप्नाली सायकर कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते . अलिकडच्या काळात चंद्रकांतदादा पाटील यांनी या रस्त्याकरीता भरघोस निधी उपलब्ध करुन दिला व या रस्त्यातील फेज २ चे लोकार्पण संपन्न झाले. सदर रस्त्यातील ७०% रस्त्याचे काम पुर्ण झाले आहे तरी उर्वरीत ३०% जागेच्या भुसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असुन लवकरच हा रस्ता देखिल पुर्ण करण्यात येईल तसेच संपुर्ण रस्ता बालेवाडी-वाकड पुलापर्यंत नागरीकांसाठी खुला करण्यात येईल. या नविन रस्त्याच्या उद्धाटनाच्या निमित्ताने अमोल बालवडकर फांऊंडेशच्या वतीने “हॅपी स्ट्रिट बालेवाडी २०२४” चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध खेळ, डान्स, झुंबा, लाईव्ह म्युजिक, बॅडमिंटन, टॅटु आर्टिस्ट, मर्दानी खेळ, बालजत्रा, कॅरम, जादुगार अशा विविध प्रकारच्या मनोरंजनाचे देखिल आयोजन करण्यात आले होते. या हॅपी स्ट्रिट कार्यक्रमात बाणेर-बालेवाडी-सुस-म्हाळुंगे-पाषाण-सोमेश्वरवाडी-सुतारवाडी भागातील शेकडो नागरीकांनी, चिमुकल्यांनी, महिलांनी व ज्येष्ठ नागरीकांनी आपल्या परिवारासह उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवला. तसेच यावेळी अमोल बालवडकर फाऊंडेशनच्या वतीने परिसरातील स्केटींग प्रेमिंकरीता विविध वयोगटातील स्केटींग स्पर्धेचे देखिल आयोजन केले गेले होते. यामधील विजयी स्पर्धकांना मेडल व पारितोषक देवुन सन्मानित केले गेले. यावेळी .मुरलीधर मोहोळ व धिरज घाटे,ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, हर्षाली माथवड, पुनित जोशी, सचिन पाषाणकर, डॅा.संदिप बुटाला, दत्ता गायकवाड, प्रकाश द. बालवडकर, प्रकाश कि. बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहुशेठ बालवडकर, नारायण चांदेरे, अनिलबाप्पु ससार, शशिकांत बालवडकर, ह.भ.प.संजयबाप्पु बालवडकर, आत्मारामतात्या बालवडकर, उमाताऊ गाडगीळ, काळुराम गायकवाड, दिनेशमाथवड, शरद भोते, नितीन रनवरे, संतोष बालवडकर, माऊलीतात्या बालवडकर, अस्मिता करंदिकर, शिवम बालवडकर, मोरेश्रर बालवडकर, सुभाष भोळ, रोहन कोकाटे, राजेंद्रपाडाळे, प्रमोद कांबळे, कल्याणी टोकेकर, विवेक मेथा, रीनाताई सोम्मैया, निलेश सायकर, मंदार राराविकर, वैशाली कमाजदार, यश ताम्हाणे, मिना पारगावकर, कविता साठे, मनोज दळवी, अनिल प्रधान, सुमित कांबळे, बाबाराव गित्ते, रोनक गोटे, भारतीय जनता पार्टी कोथरुड विधानसभेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच औंदुबर ग्रुप बालेवाडी, अष्टविनायक मित्र मंडळ बालेवाडी व अमोल बालवडकर फाऊंडेशचे सर्व सभासद तसेच असंख्य नागरीक उपस्थित होते.
मुंबई :- भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी (दिनांक १६ मार्च २०२४) पत्रकार परिषद घेऊन सार्वत्रिक लोकसभा निवडणूक – २०२४ ची घोषणा केली असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मुंबई शहर जिल्ह्यात ३०-मुंबई दक्षिण मध्य,व ३१- मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदारसंघ असून २४ लाख ४६ हजार ०८८ पात्र मतदार आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात दिनांक २० मे २०२४ (सोमवार) रोजी पाचव्या टप्य्यात मतदान होणार असून दिनांक ४ जून २०२४ (मंगळवार) रोजी मतमोजणी होणार आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
मुंबई शहर जिल्हा कार्यालय, नियोजन भवन, मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी माहिती दिली.
लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे :
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक २६ एप्रिल २०२४ (शुक्रवार)
नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक ३ मे २०२४ (शुक्रवार)
नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक ०४ मे २०२४ (शनिवार)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ०६ मे २०२४ (सोमवार)
मतदानाचा दिनांक २० मे २०२४ (सोमवार)
मतमोजणी दिनांक ०४ जून २०२४ (मंगळवार)
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक ६ जून २०२४ (गुरुवार)
आदर्श आचारसंहितेचे सर्व संबंधितांनी काटेकोरपणे पालन करावे
सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीची आदर्श संहिता सुरु आहे. या आदर्श आचारसंहितेचे सर्वसंबंधीत घटकांनी काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आणि मुंबई शहर जिल्ह्यातील मतदारांसाठी असलेल्या सोयी सुविधा, मतदान केंद्राची रचना तेथील सुविधा, संवेदनशिल मतदान केंद्रासंदर्भात विशेष उपायोजना याबाबत सविस्तर माहिती दिली.
मुंबई शहर जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी साडेबारा हजार कर्मचारी अधिकारी सज्ज
लोकसभा निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्हा अंतर्गत असलेल्या ३० मुंबई दक्षिण मध्ये ३१ मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी साडेबारा हजार अधिकारी कर्मचारी नियुक्त केले असून निवडणुका पारदर्शक नि:पक्षपाती व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती यावेळी श्री. संजय यादव यांनी दिली.
मुंबई शहर जिल्ह्याच्या निवडणूक अनुषंगाने माहिती
एकूण मतदार :- २४ लाख ४६ हजार ८८
एकूण पुरुषः- १३ लाख २१ हजार ७८२
एकूण स्त्री:- ११लाख २४ हजार ८४
एकूण तृतीय पंथीः- २२२ (दोनशे बावीस)
१८+ या वयोगटातील मतदार
एकूण मतदारः- १७हजार ७२६
एकूण पुरुषः ९ हजार ८७६
एकूण स्त्री:- ७ हजार ८५०
२०-२९ या वयोगटातील मतदार
एकूण मतदारः- २,लाख ९१ हजार ५०२
एकूण पुरुषः- १ लाख ६१ हजार ६९४
एकूण स्त्रीः- १लाख २९ हजार ७३७
दिव्यांग मतदार
एकूण मतदार :- ५०९३(पाच हजार त्र्यान्वय)
एकूण पुरुष:- ३०३२ (तीन हजार बत्तीस)
एकूण स्त्रीः-२०६१ (दोन हजार एकसष्ठ)
मतदान केंद्राची माहिती
एकूण मतदान केंद्रः- २५ हजार ९
एकूण सहाय्यकारी मतदान केंद्र:- ८
एकूण सखी महिला मतदान केंद्रः- ११
नवयुवकांनी चालविण्याचे मतदान केंद्रः-११
दिव्यांग यांनी चालविण्याचे मतदान केंद्र : ८ आहेत. अशी माहिती देऊन समाज माध्यमातून येणाऱ्या तक्रारी शंका त्यांचे करावयाचे निरसन याबाबतही यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी माहिती दिली.
मुंबई-काँग्रेस नेते राहुल गांधी यांची आज मुंबईतील शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली आहे. या यात्रेचा समारोप आज शिवाजी पार्कवर होणार आहे. सायंकाळी 5 वाजता राहुल गांधींची ही सभा होणार आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधीही उपस्थित राहणार आहेत. प्रियांका गांधी या शनिवारीच मुंबईत दाखल झाल्या. त्यांनी राहुल गांधी यांच्यासह चैत्य भूमीला भेट देत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे जंगी स्वागतही करण्यात आले. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला, जेष्ठ नेत्या कल्पना सोरेन, आपचे नेते सौरभ भारद्वाज, दिपांकर भट्टाचार्य यांच्यासह इंडिया आघाडीचे 15 हून अधिक मित्र पक्षाचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर इंडिया आघाडीची ही पहिलीच सभा आहे.
दरम्यान, त्यापूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्वात मुंबईत सकाळी मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान ‘न्याय संकल्प’ पदयात्रा देखील काढण्यात आली आहे.या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह आमदार सतेज पाटील, वर्षा गायकवाड व सचिन सावंत यांनी शनिवारी शिवाजी पार्कला भेट देऊन सभेच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. मैदानात 13 एलईडी स्क्रीन उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
समाजात जनजागृती करण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रा: प्रियंका गांधी.
मुंबई, दि. १६ मार्च
मणिपूरपासून निघालेली राहुल गांधी यांची ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रा ६७०० किलोमीटरचे अंतर पार करून मुंबईतील चैत्यभूमीवर समाप्त झाली. यावेळी राहुल गांधी यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. याआधी सकाळी यात्रा भिवंडीतून सुरु झाली त्यानंतर कळवा, मुंब्रा, ठाणे, भांडूप, सायन, धारावीतून दादर येथील चैत्यभूमीवर आली. मुंबईत भारत जोडो यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. उद्या शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा होत असून या सभेतून इंडिया आघाडी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वेणुगोपाल, प्रियंका गांधी, मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेत सतेज बंटी पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर AICC चे सचिव आशिष दुवा, सोनल पटेल, बी.एम. संदीप, CWC सदस्य व खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार भाई जगताप, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सप्रा, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, संजय निरुपम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. राजू वाघमारे, सचिन सावंत, राजन भोसले, आदी उपस्थित होते
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी धारावीकरांना संबोधित केले, देशातील सर्व महत्वाच्या कंपन्या, संपत्ती फक्त अदानी व अंबानी यांनाच विकल्या जात आहेत. धारावी तुमची हक्काची जमीन आहे परंतु दलालाच्या माध्यमातून ही जमीनही बळकावली जात आहे. धारावीची जमीन बळाकणाऱ्या अदानीच्या मागे देशाचे पंतप्रधान ईडी, सीबीआय, आयकर विभाग घेऊन उभे आहेत. धारावी पुनर्वसन प्रकल्प अदानीला देऊन पोलीस बळाचा वापर करुन स्थानिक धारावीकरांना हुसकावले जात आहे, असा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. धारावी तुमची आहे व तुमचीच राहिली पाहिजे. धारावीत सर्व प्रकारचे छोट्या छोट्या वस्तुंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते, कौशल्याचे काम येथे होत आहे, या उद्योगाला पाठिंबा दिला पाहिजे, बँकांचे दरवाजे उघडे केले पाहिजेत. धारावी भारताचे उत्पादन हब बनवले पाहिजे कारण धारावीच खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’ आहे. देश तुमच्या सारख्यांच्या मेहनतीवर उभा राहतो, दलालांमुळे नाही परंतु आज मेहनत तुम्ही करता व पैसा अदानी घेऊन जातो. आज लढाई कौशल्य व दलाल यांच्यात आहे, आज लढाई धारावी व अदानी यांच्यात आहे. तुम्हाला लुटले जात आहे, जागे व्हा, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.
काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या की, सरकार जनतेपासून वस्तुस्थिती लपवत आहे. देशाची वस्तुस्थिती कळावी व जनतेला जागृत करण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काढली. मागील १० वर्षात महागाई, बेरोजगारी कमी झालेली नाही. मोठे इव्हेंट करून काम होत असल्याचे दाखवले जात आहे परंतु परिस्थिती तशी नाही. जीएसटी व नोटबंदीने देशातील जनतेचे प्रचंड हाल केले आहेत. अग्निवीरमध्ये भरती होण्यास तरुण तयार नाहीत. ४ वर्षांची लष्करी सेवा करुन काय करायचे अशी स्थिती या तरुणांची झालेली आहे. भाजपा सरकार गरिबांसाठी काम करत नाही ते फक्त धनदांडग्यांसाठी काम करते असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
पुणे- काल आनंद दवेंनीमाजी मंत्री विजय बाप्पू शिवतारेंची रुग्णालयात भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर या भेटीकडे पाहिले जाते आहे. कसबा विधानसभा निवडणुकीत दवे यांना अत्यल्पमते मिळाली होती मात्र भाजपच्या उमेदवाराचा पराभव होऊन भाजपचा बालेकिल्ला ढासळला. आता शिवतारेंना भेटून दवे यांनी केवळ बारामतीतच नाही तर कसब्याच्या निकालाची पुनुरावृत्ती पुणे लोकसभेच्या निवडणुकीसाठी होण्यास मेहनत घेणार असल्याचे म्हटले आहे.फसव्या लोकांना कसबा दाखवू यासाठी हिंदू महासंघाच्या वतीने शिवतारे यांनाही शुभेच्छा देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे
मुंबई – : लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाव्दारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात दि.19 एप्रिल ते 20 मे, 2024 या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे.या निवडणुकीचीआदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालय विधीमंडळ वार्ताहार संघ येथे लोकसभा निवडणूक 2024 बाबत माहिती देण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी सह सचिव व अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक(माहिती) डॉ.राहूल तिडके, उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.
यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, 18 व्या लोकसभेकरिता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधित एकूण सात टप्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्रातपाच टप्प्यात होणार मतदान
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 16 मार्च, 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 48लोकसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात विदर्भातील 05 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 19 एप्रिल,2024 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 20 मार्च,2024 पासून सुरु होईल. दुसऱ्या टप्प्यात विदर्भ व मराठवाड्यातील 08 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 26एप्रिल,2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 28 मार्च,2024 पासून सुरु होईल. तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणातील 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 07 मे,2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 12एप्रिल,2024 पासून सुरु होईल. चौथ्या टप्प्यात खान्देश, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 13 मे,2024 रोजी मतदान घेण्यात येणार असूनयासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 18एप्रिल,2024 पासून सुरु होईल.पाचव्या टप्प्यात खान्देश व कोकणातील 13 लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक 20 मे,2024 रोजी मतदान घेण्यात येणार असून यामध्ये मुंबई व ठाण्यातील मतदारसंघांचा सुध्दा समावेश आहे. यासाठीचे नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दिनांक 26 एप्रिल, 2024 पासून सुरु होईल. मतमोजणी दिनांक 04 जून, 2024 रोजी होणार आहे.
30-अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक
महाराष्ट्र विधानसभेच्या 30-अकोला पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून सुध्दा दुस-या टप्प्यात पोट निवडणुक घेण्यात येणार आहेत. या पोट निवडणूकीचे मतदान दि.26 एप्रिल,2024रोजी होणार असून त्यासाठीची नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची प्रक्रिया दि.28 मार्च,2024 रोजी पासून सुरु होईल.
आदर्श आचारसंहिता
भारत निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला असल्यामुळे संपूर्ण राज्यात आजपासून तत्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. सदर आचार संहिता लोकसभेचे नवीन सभागृह गठित होण्याबाबतची संविधानिक अधिसूचना जारी होईपर्यंत लागू राहील. त्यामुळे उपरोक्त कालावधीत स्वेच्छाधीन निधीतून अनुदानाचे वाटप, मंत्र्यांचे दौरे व शासकीय वाहनांचा वापर, एकत्रित निधीतून शासकीय जाहिराती प्रसिध्द करणे, नवीन कामांची किंवा नवीन योजनांची घोषणा करणे, शासकीय सार्वजनिक/खासगी संपत्तीचे विद्रुपीकरण इत्यादीं बाबींवर निर्बंध लागू झाले आहेत.
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत निवडणूक खर्चावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याकरीता राज्यस्तरावर आणि जिल्हास्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उमेदवाराने नामनिर्देशन पत्र भरल्यापासून त्याच्या निवडणूक खर्चाची गणना सुरु करण्यात येईल. मात्र, नामनिर्देशन भरण्यापूर्वी निवडणूक प्रचारासाठीचे साहित्य खरेदी केलेले असल्यास व त्याचा वापर नामनिर्देशनानंतर केला गेल्यास त्या खर्चाचाही समावेश निवडणूक खर्चामध्ये करता येईल. लोकसभा निवडणुकीकरीता महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.95 लाख इतकी ठेवण्यात आलेली आहे.तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला खर्चाची मर्यादा रु.40 लाख इतकी आहे.
राजकीय पक्षांच्या व उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee) स्थापन करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे या समितीकडून पेड न्यूज संदर्भातही प्राप्त होणा-या तक्रारींवर कार्यवाही करण्यात येते.
सर्व राजकीय पक्ष, प्रसिध्दी माध्यमे आणि शासकीय विभाग प्रमुख यांच्याबरोबर बैठका घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत राज्य व जिल्हास्तरावर माहिती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी तसेच मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्र/मतमोजणी केंद्रावर प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश मिळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकार पत्रे सुध्दा निर्गमित करण्यात येणार आहे. मात्र त्या साठीच्या शिफारशी माहिती व जनसंपर्क संचालनालया मार्फत विहित मुदतीत व प्रपत्रात सादर करावयाच्या आहेत.
तसेच आदर्श आचारसंहितेच्या काळात राजकीय पक्षांनी व उमेदवारांनी “काय करावे किंवा करु नये”(“DOs & DON’Ts) ची प्रत मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या https://ceo.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. तसेच, या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मॅन्युअल/हस्तपुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याशिवाय भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ https://eci.gov.inवर निवडणुकी संदर्भातील सर्व सूचनांचा तपशील उपलब्ध आहे. तसेच उमेदवारांनी दाखल केलेली शपथपत्रे व खर्चाचे तपशील वेळोवेळी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे https://ceo.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
मतदारांची संख्या
सन 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी असलेले मतदार व सद्यस्थितीत अद्ययावत मतदार यादीप्रमाणे असलेले मतदार यांचा तुलनात्मक तक्ता खालीलप्रमाणे आहे:-
अ.क्र.
तपशील
सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीचे मतदार
दि.23.01.2024 रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीतील मतदार
दि.15.03.2024 रोजी अद्यावत मतदारांची संख्या
1
पुरुष
4,63,15,251
4,74,72,379
4,78,50,789
2
महिला
4,22,46,878
4,37,66,808
4,41,74,722
3
तृतीयपंथी
2,406
5,492
5,559
एकूण
8,85,61,535
9,12,44,679
9,20,31,070
निरंतर मतदार नोंदणीचा अद्याप कार्यक्रम सुरु
निरंतर मतदार नोंदणीचा अद्याप कार्यक्रम सुरुआहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची अद्यापपर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून त्या त्या टप्प्यातील उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या 10 दिवस अगोदरपर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र.6 मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील.
मतदार यादी अद्यावत व शुद्ध करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. या अंतर्गत करण्यात आलेले प्रयत्न थोडक्यात पुढीलप्रमाणे आहेत :-
मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांची घरोघरी भेट
जुलै-ऑगस्ट 2023 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देऊन मतदारांकडून अर्ज प्राप्त करुन घेतले तसेच भावी मतदारांची माहिती घेण्यात आली.
विशेष संक्षिप्त पुनरिक्षण-2024
ऑक्टोबर-डिसेंबर 2023 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाची माहिती जनतेला यासाठी व्यापक प्रचार व प्रसिद्धी करण्यात आली. सुट्टयांच्या दिवशी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सहकारी गृह निर्माण संस्थांच्या पदाधिकारांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये अधिकाधिक मतदार जोडण्यात आले आहेत.
स्वीप
या कार्यक्रमांतर्गत मतदार जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आले. इतर शासकीय विभाग, अशासकीय संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये व इतर यांच्या सहभागाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत संदेश पोहचविण्यात आला.
दिव्यांग मतदारांसाठी (PwDs) सक्षम ॲप
भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने “सक्षम” हे ॲप उपलब्ध करुन दिलेले आहे.त्या माध्यमातुन तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कालावधीत दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे राबवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. आजमितीस 5,99,166 इतक्या मतदारांची नावे त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत.
फोटो साधर्म्य समान नोंदी (PSE) व भौगोलिक साधर्म्य समान नोंदी (DSE) तसेच मयत झालेल्या मतदारांची वगळणी – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फोटो साधर्म्य समान नोंदी (PSE) व भौगोलिक साधर्म्य समान नोंदी (DSE) तसेच मयत मतदारांच्या संदर्भात विशेष मोहीम राबवून मतदार यादीचे जास्तीत जास्त शुध्दीकरण करण्यात आलेले आहेत.
वरील सर्व प्रक्रिया करताना वेळोवेळी राज्य व जिल्हा स्तरावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या बैठका घेण्यात आलेल्या आहेत. तसेच, पत्रकार परिषदा घेऊन इत्यंभूत माहिती देण्यात आलेली आहे. तसेच, राजकीय पक्षांच्या बैठकांचे इतिवृत्त जतन करण्यात आलेले आहेत.
दि.23.01.2024 रोजी अंतिमरित्या प्रसिध्द करण्यात आलेल्या मतदार याद्या मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
या सर्व प्रयत्नांमुळे मतदार यादी मध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. मतदार यादी संदर्भातील ठळक बाबी पुढील प्रमाणे आहेत :-
सन 2019 सालच्या तुलनेत मतदारांच्या एकूण संख्येमध्ये अद्याप पर्यंत 34,69,535 इतकी वाढ झाली आहे.
सन 2011 च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषांमागे 929 महिला (Gender Ratio) असे प्रमाण आहे. त्या तुलनेत सन 2019 साली मतदार यादीतील महिलांचे प्रमाणे 911 इतके होते. याकरिता महिलांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या व त्यामुळे 2024 मध्ये या प्रमाणात 923 अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.
18-29 वर्षे वयोगटामधील नव मतदारांची संख्या 1,78,84,862 एवढ्या नवीन मतदारांची नोंदणी सध्याच्या मतदार यादीत झालेली आहेत.
याशिवाय 1,18,199 इतक्या सेनादलातील (Service Voters) मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे.
या वर्षी मतदार यादीमध्ये एकूण 5,99,166 इतके दिव्यांग मतदार चिन्हांकित आहेत. त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण 40% पेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल.
अद्ययावत मतदार यादीमध्ये 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या 13,15,166 इतकी आहे. यापैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. मतदार यादीतील अद्यावत आकडेवाडी नुसार त्यापैकी 52,908 मतदार 100 वर्षावरील आहेत.
मतदानाची टक्केवारी
सन 2014 व सन 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या मतांची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे.
लोकसभा निवडणूक
पुरुष % मतदान
महिला % मतदान
एकूण मतदान
सन 2014
62.24
57.97
60.32
सन 2019
62.43
58.82
61.02
मतदान केंद्र :-
सन 2019 च्या तुलनेमध्ये मतदान केंद्रांच्या संख्येमध्ये पुढील प्रमाणे वाढ झाली आहे.
तपशील
लोकसभा -2019
लोकसभा-2024
एकूण मतदान केंद्रे
95,473
97,325
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी 1500 इतकी कमाल मतदार संख्या निर्धारित करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकांच्या पूर्वी मतदारांच्या संख्येत झालेली वाढ विचारात घेऊन सहाय्यकारी मतदान केंद्रे तयार करण्यात येतात. आजमितीस भारत निवडणूक आयोगाकडे 778 सहाय्यकारी मतदान केंद्रांचे प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहे. आयोगाच्या मान्यतेनंतर ही अतिरिक्त सहाय्यकारी मतदान केंद्रे स्थापित करण्यात येतील. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या 98,100 वर जाण्याची शक्यता आहे.
आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, दिव्यांगांसाठी रॅम्पची व्यवस्था, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा व फर्निचर इ. किमान सुविधा (Assured Minimum Facilities), प्रसाधन सुविधा, इ. पुरविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व मतदान केंद्र तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत.
शहरी भागातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी राज्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, इ. शहरांमध्ये एकूण 150 मतदान केंद्रे अतिउंच इमारती/सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुले यामध्ये उभारण्यात आलेली आहेत.
निवडणुकीसाठी कर्मचारीवृंद
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी सुमारे 6.00 लाख इतका कर्मचारीवृंद नेमण्यात येणार आहे. तसेच पुरेसा पोलिस कर्मचारीवृंद तैनात करण्यात येणार आहेत.
प्रशिक्षण
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, समन्वय अधिकारी, सहायक खर्च निरीक्षक, क्षेत्रिय अधिकारी, पोलिस क्षेत्रिय अधिकारी, पोलिस अधिकारी/कर्मचारी, भरारी पथके, स्थायी पथके, व्हिडीओग्राफर/फोटोग्राफर, इ. चे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहेत. तसेच, प्रत्यक्ष मतदानाकरिता नेमण्यात येणा-या मतदान अधिकारी/कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
ईव्हीएम- व्हीव्हीपॅट (EVM–VVPAT)
राज्यामध्ये सर्व लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम- व्हीव्हीपॅट (EVM-VVPAT) चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात एकूण 2.47 लाख बॅलेट युनिट (Bus), एकूण 1.45 लाख कन्ट्रोल युनिट(CUs)आणि एकूण 1.53 लाख व्हीव्हीपॅट(VVPATs)यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. या सर्व यंत्रांची प्रथम स्तरीय तपासणी (First Level Checking) पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक मतदान यंत्रांच्या संदर्भात मतदारांमध्ये जागृती आणि विश्वासार्हता निर्माण व्हावी या हेतूने मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम दि.29.12.2023 ते दि.29.02.2024 या कालावधीत राबविण्यात आला. सर्व जिल्ह्यांमध्ये गाव पातळीवर मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदान यंत्रांवर कसे मतदान करता येते तसेच ही प्रक्रिया कशी सुरक्षित आहे याची जनतेला माहिती देण्यात आली. या जनजागृतीचा कार्यक्रम यशस्वी ठरला असून जनतेने या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सक्रिय सहभाग घेतला आहे.
महत्त्वाचे आयटी ॲप्लिकेशन्स (IT Applications)
यंदाच्या निवडणुकीमध्ये विविध विषयांची प्रभावी अंमलबजावणी करता यावी व त्यावर नियंत्रण ठेवता यावे या हेतूने आयोगाने काहीआयटी ॲप्लिकेशन्स(IT Applications) विकसित केले आहेत. ते थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
सी व्हीजिल (cVigil)
आदर्श आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणा-या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने cVigilहे मोबाईल ॲप विकसित केले आहे. यामध्ये दक्ष नागरिकाला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे सदर ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे व त्यावर जिल्हा प्रशासन तसेच मुख्य निवडणूक कार्यालयाकडून तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.
सक्षमॲप
पात्र दिव्यांगांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हील चेअरची मागणी नोंदविणे इ. सोयी उपलब्ध करुन घेण्यासाठी हे आयटी ॲप्लिकेशन्स उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
केवायसी Know Your Candidate App
मतदारांना त्यांच्या उमेदवाराबाबतचा तपशील त्यामध्ये त्यांच्या नावे असलेले गुन्ह्यांचा तपशील, उमेदवाराची माहिती, इ. माहिती पाहता येऊ शकते.
ईएसएमएस ॲप ESMS App/
निवडणूक अधिक मुक्त व निष्पक्ष वातावरणामध्ये व्हावी यासाठी आचारसंहितेच्या कालावधीत राज्यातील विविध केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या अंमलबजावणी यंत्रणांकडून बेकायदेशीर पैसा, दारु, अंमली पदार्थ व भेटवस्तू, मौल्यवान धातू, इ. गोष्टी जप्त करण्यात येणार आहे. या जप्तीची माहिती भारत निवडणूक आयोगास दरदिवशी ESMS App/ Portal वरुन कळविण्यात येत आहे.
1950 क्रमांकाची हेल्पलाईन
राज्यस्तरावर (State Contact Centre) तसेच जिल्हास्तरावर (District Contact Centre) स्थापन करण्यात आले आहेत. मतदारांना सर्व प्रकारची माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर 1950 या टोलफ्री क्रमांकाची सुविधा सुरु करण्यात येईल.
मतदानाची सज्जता
प्रत्यक्ष निवडणुकीच्या दृष्टीने लागणारी साधनसामुग्री आणि मतदान केंद्रावर पुरवावयाच्या सोयी सुविधांकरिता योग्य ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.
तरी निवडणुकीसंदर्भात निवडणूक यंत्रणेस सर्व प्रकारचे सहकार्य करावे. तसेच सर्व मतदारांनी निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेऊन मतदान करावे, असे आवाहन श्री.चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.
इंदापूर-इंदापूर शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आलाय. अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये (दि.16) रात्री ही घटना घडली. अविनाश धनवे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील आळंदी परिसरातील राहिवासी आहे.
पिंपरी-चिंचवड येथील तरुण हा आपल्या मित्रांसोबत जेवण करण्यासाठी इंदापूर येथे हॉटेल जगदंब येथे थांबला असता, काही अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागून येत खुर्चीत बसलेल्या तरुणाच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून आणि कोयत्याने वार करत हत्या केली. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून ही घटना शनिवारी रात्री घडली. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवना केले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
शनिवारी 16 मार्चला सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास हा गोळीबाराचा प्रकार घडला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल जगदंबा या ठिकाणी मयत धनवे इतर काही सहकार्यांसोबत जेवण करण्यासाठी बसला होता. यावेळी चार चाकी मधून आलेल्या सहा ते सात अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केला. यामध्ये धनवे नामक युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश धनवे याच्या डोक्यातही गोळी लागली.गोळीबार कोणी केला, हे अद्याप समजू शकले नसून हा गोळीबार पूर्व वैमानसातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव अविनाश धनवे असल्याचे सांगितले जात असून तो पुण्याकडील आळंदी परिसरातील राहणार असल्याचे समजते.
हल्ल्याच्या, गोळीबाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये दहशत वाढत आहे. कोणी कधीही कुठे येऊन गोळीबार, कोयत्याने हल्ला करुन जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षितेता प्रश्न ऐरणीवर आहे. राहुल पाटील गोळीबार प्रकरण ताजे असताना पुण्यात आणखी एक गोळीबार झाल्याची घटना समोर आलीय. या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला.
पुणे,दि.१६:- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे टोल फ्री संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू झाली आहे.नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करावयाच्या असल्यास त्यांनी १८००२३३०१०२ आणि १९५० टोल फ्री क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
या कक्षाद्वारे तातडीने तक्रारीची दखल घेण्यात येईल. हा कक्ष २४ तास सुरू राहणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाला आलेल्या तक्रारीनुसार भरारी पथके आवश्यक कारवाई करतील, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. ००००
निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करा-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे
पुणे, दि. १६: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या परिसरात निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिले.
आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.
डॉ.दिवसे म्हणाले, निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाली असून ६ जूनपर्यंत ती लागू राहणार आहे. जिल्ह्यात दोन टप्प्यात मतदान होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासकीय-निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले भित्तीपत्रक, झेंडे, कटआऊट्स, संदेश काढून त्याचा अहवाल २४ तासात सादर करावा. भिंतीवरील रंगविलेल्या जाहिरातीदेखील काढण्यात याव्यात.
शासकीय मैदाने, रस्ते, उद्याने, विद्युत खांब, खाजगी मालमत्तेवर परवानगी न घेता लावलेले भित्तीपत्रक किंवा संदेशही ४८ तासात काढण्यात यावेत. परवानगी न घेता खाजगी मालमत्तेवर जाहिरात केली असल्यास गुन्हे दाखल करण्यात यावेत. सर्वांनी काटेकोरपणे निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करावी. ‘सी-व्हिजील’ ॲपवर आलेल्या तक्रारींसंदर्भात तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
महानगरपालिका क्षेत्रात जाहिरात फलकावर राजकीय जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सर्वांना समान संधी असावी व त्याबाबतचा करार झालेला असावा, त्याची खर्चात नोंद होणे आवश्यक आहे. निश्चित केलेली सभा ठिकाणी सर्व राजकीय पक्षांना सभा घेण्याची समान संधी देण्याबाबत संबंधित यंत्रणेमार्फत कार्यवाही करण्यात यावी. पक्षांनी परवानगी घेतलेल्या खाजगी वाहनाशिवाय इतर वाहनांवर जाहिरात करता येणार नाही. अशी वाहने आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी सांगितले.
निवडणूक यंत्रणेने गेल्या तीन महिन्यात मतदार नोंदणी आणि जनजागृतीसाठी चांगले परिश्रम घेतले आहेत. यापुढेही चांगली कामगिरी करून निवडणुका पारदर्शक आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, आदर्श आचारसंहिता समन्वयक अधिकारी उपस्थित होते. ००००
सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वास कायम ठेवला, निवडणुकीत बॅलेट पेपर वापरण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला
सुप्रीम कोर्टाने 19 लाख गहाळ ईव्हीएमवर तथ्यहीन आरोपांना फटकारले
भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमवरील विश्वासाला पुन्हा प्रतिसाद देत, आज 19 लाखांहून अधिक ईव्हीएम गहाळ झाल्याची शंका आणि निवडणुका घेण्यासाठी बॅलेट पेपरचा वापर करण्याबाबत अशा दोन रिट याचिका फेटाळून लावल्या. 19 लाख गहाळ ईव्हीएम याचिकेप्रकरणी निर्णय देताना, माननीय न्यायालयाने अशा शंका आणि आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे व हे प्रकरण भारत निवडणूक आयोगाच्या बाजूने निकाली काढले आहे. याचिकाकर्ता- INCP ने अशी भीती व्यक्त केली की, 2016-19 दरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या कोठडीतून गहाळ झालेल्या 19 लाख ईव्हीएमचा वापर आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक, 2024 मध्ये फेरफार करण्यासाठी केला गेला असता.
लोकप्रतिनिधी कायदा, 1951 चे कलम 61A बाजूला सारुन बॅलेट पेपर वापरून निवडणुका घेण्यासंदर्भातील आणखी एका याचिकेवर सुनावणी करण्यास नकार देताना मा. न्यायमूर्ती खन्ना यांनी निरीक्षण नोंदविले की ईव्हीएमच्या कामकाजाशी संबंधित विविध मुद्द्यांवर 10 हून अधिक प्रकरणे तपासण्यात आली आहेत. मा.न्यायालयाने वेळोवेळी याचिका फेटाळताना ईव्हीएमच्या कार्यपद्धतीवर नेहमीच विश्वास दर्शविला आहे.
गेल्या दशकात आणि सुमारे 40 निकालांमध्ये, मा.सर्वोच्च न्यायालयाने भारत निवडणूक आयोग EVM आणि या संबंधांतील पारदर्शक प्रक्रिया आणि कठोर प्रशासकीय कार्यप्रणालीवर त्यांची श्रध्दा आणि विश्वास कायम ठेवला आहे, त्यामुळे भारतात EVM च्या बाजूने मिळत असलेल्या न्यायाला प्रचंड मूल्य आणि सामर्थ्य मिळाले आहे.
मा.सर्वोच्च न्यायालयाचे नवीनतम निर्णय, मा. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या आदेशांच्या मजबूत आणि वाढत्या प्रतिमेमध्ये आणखीच भर घालतात, ज्यांनी विविध ईव्हीएम प्रकरणांची तपासणी केली आहे आणि भारत निवडणूक आयोगाच्या बाजूने निर्णय दिला आहे. तसेच हेही लक्षात घ्यावे की अलीकडील एका प्रकरणात (मध्य प्रदेश जन विकास पक्ष विरुद्ध भारतीय निवडणूक आयोग, विशेष रजा याचिका (सिव्हिल) 16870/ 2022, सप्टेंबर, 2022), माननीय सर्वोच्च न्यायालयाने अर्जदारास 50,000 रुपये एवढा दंड ठोठावला आहे. याचिकाकर्त्याने असे निरीक्षण नोंदवले की, देशात अनेक दशकांपासून ईव्हीएमचा वापर केला जात आहे, परंतु वेळोवेळी उपस्थित केलेले मुद्दे खोडण्यात आले आहेत. माननीय दिल्ली उच्च न्यायालयाने देखील अशाच एका याचिकेवर (सी. आर. जया सुकीन विरुद्ध भारतीय निवडणूक आयोग आणि इतर, रिट याचिका (सिव्हिल) 6635/2021, ऑगस्ट 2021) रु.10,000 चा दंड ठोठावला होता. ज्यामध्ये ईव्हीएमचा वापर थांबवण्यास सांगून आगामी सर्व निवडणुकांमध्ये ईव्हीएम आणि त्याऐवजी बॅलेट पेपर वापरण्याचे अर्जदाराने नमूद केले होते. तत्पूर्वी, दिल्लीच्या माननीय उच्च न्यायालयाने, दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीने आगामी लोकसभा निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटसाठी सुरू असलेली प्रथमस्तरीय तपासणी (एफएलसी) प्रक्रिया संपुष्टात आणण्याची विनंती करणारी याचिका फेटाळून लावली होती.
एनसीआर न्यायालयाने, आपल्या निकालात, विद्यमान कार्यपद्धतीच्या मजबूती आणि पारदर्शकतेवर जोर दिला आणि याचिकाकर्त्यांचे दावे खोडून काढले. ईव्हीएम मॅन्युअल, स्टेटस पेपर, ईव्हीएम प्रेझेंटेशन, ईव्हीएमच्या 40 वर्षांच्या प्रवासावरील प्रगतीपुस्तक, ईव्हीएमचा कायदेशीर इतिहास यासारख्या प्रकाशनांच्या स्वरूपात ईव्हीएमशी संबंधित प्रक्रिया आणि सुरक्षा उपायांची माहिती सार्वजनिक माध्यमांवर उपलब्ध करून देण्यात आणि सतत अद्ययावत केलेले EVM प्रश्नावलीबाबत भारत निवडणूक आयोग नेहमीच आघाडीवर आहे. 000
राज्य सरकारची घोषणा; काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या लढ्याला यश
पुणे : महाराष्ट्रातील रिक्षा चालक, टॅक्सी चालक व मालक यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, या काँग्रेसचे आमदार श्री. रवींद्र धंगेकर यांच्या मागणीला यश आले असून याबाबतची अधिकृत घोषणा राज्य सरकारने केली आहे. यामुळे पुणे शहरासह राज्यभरातील असंख्य रिक्षाचालक व मालकानी प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीद्वारे आमदार श्री. रवींद्र धंगेकर यांचे आभार मानले.
महाराष्ट्रातील रिक्षा चालक, टॅक्सी चालक व मालक यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन यासाठी आमदार श्री. रवींद्र धंगेकर हे सातत्याने प्रयत्नशील होते. अखेर मंत्री मंडळाच्या शनिवारी (ता. 16) झालेल्या बैठकीत कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे सरकारची १० वर्षांपूर्वीची घोषणा आमदार श्री. रवींद्र धंगेकर यांची प्रयत्नांमुळे पूर्णत्वास आली आहे.
रिक्षा चालकांच्या रखडलेल्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर रवींद्र धंगेकर हे आमदार झाल्यापासून सातत्याने आवाज उठवत आहेत. ३ ऑगस्ट २०२३ रोजी पावसाळी अशी अधिवेशनात त्यांनी हा विषय मांडून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर १८ डिसेंबर २०२३ रोजी हिवाळी अधिवेशनात त्यांनी पुन्हा एकदा हा विषय उचलून धरला. याच पार्श्वभूमीवर, अधिवेशनप्रसंगी त्यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची भेट घेवून त्यांना ‘महाराष्ट्रातील रिक्षा चालक, टॅक्सी चालक व मालक यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे’, असे पत्र दिले. या पत्राची त्यांनी तातडीने दखल घेतली व ‘या पत्रावर त्वरित प्रस्ताव सादर करा’, अशा सूचना आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या.
तरतूद तुटपुंजी; संघर्ष कायम राहील
रवींद्र धंगेकर यांच्या या सततच्या प्रयत्नांतून व पाठपुराव्यातून कल्याणकारी मंडळ स्थापन झाल्याची घोषणा सरकारने आज केली. मात्र, यासाठी केवळ ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ती पुरेशी नाही. ही तरतूद आणखी वाढवावी, रिक्षा चालक, टॅक्सी चालक व मालक यांच्यासाठी आरोग्य शिबीर व्हावेत, त्यांचा आरोग्य विमा काढला जावा, त्यांना पेन्शन मिळावी, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळावी, योग्यता प्रमाणपत्राचे शुल्क माफ व्हावे… या प्रश्नांसाठी माझा संघर्ष सुरूच राहील, असे रवींद्र धंगेकर यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.