पुणे- वाकडेवाडी येथे मोक्याच्या ठिकाणी असलेली आरे डेअरीची तब्बल १६ एकर जमीन कवडीमोल किंमतीत विकण्याचा डाव तिघाडी सरकारने मांडला आहे. ही जागा फडणवीस, शिंदे, पवार यांच्या मालकीची नसून पुणेकरांच्या मालकीची आहे याचा विसर त्यांना पडला असा आरोप करत प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
या संदर्भात जगताप यांनी सांगितले कि,’महाराष्ट्राला लाभलेले द्रष्टे नेते स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करून सरकारी आस्थापनांची निर्मिती केली. या सरकारी आस्थापनांची मोक्याच्या अर्थात वाकडेवाडी या ठिकाणी असलेली जमीन कवडीमोल भावात विकण्याचं पाप हे तिघाडी सरकार ( शिंदे-पवार-फडनवीस ) करत आहे.
महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी, पुण्यासह महाराष्ट्रातील जनतेला सकस दुधाचा पुरवठा व्हावा यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी आरे डेअरीची स्थापना केली. पुढे राजकीय नेत्यांनीच स्वतःचे दूध संघ काढल्याने हा आरे दूध संघ डबघाईला आला. पुणे शहराच्या अगदी प्रवेशद्वारावर वाकडेवाडी येथे मोक्याच्या ठिकाणी असलेली आरे डेअरीची तब्बल १६ एकर जमीन विकण्याचा डाव आता या तिघाडी सरकारने मांडला आहे. ही जागा फडणवीस, शिंदे, पवार यांच्या मालकीची नसून पुणेकरांच्या मालकीची आहे याचा विसर त्यांना पडला असा आरोप करत प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने कोविडच्या काळात कोविड सेंटर उभारण्यासाठी सीओईपी संस्थेची जागा मागण्याची वेळ यापूर्वी पुणे महानगरपालिकेवर आली होती, हा भूतकाळ ताजा असतानाच भविष्यात अशी आपत्तिच येणार नाही असं गृहीत धरून एवढा मोठा भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचं कारण काय? १० हजार कोटी रुपयांची जमीन ४०० कोटीपेक्षा कमी किंमतीत विकण्यात कोणाचं हित आहे? असा सवाल प्रशांत जगताप यांनी केला. या जागेवर मोठे सरकारी हॉस्पिटल अथवा शाळा उभारून सामान्य पुणेकरांना दिलासा देण्याऐवजी हे सरकार फक्त बिल्डरांचे घर भरण्यात व्यस्त आहे, हा सरकारने सामान्य पुणेकर जनतेवर घातलेला दरोडा आहे असा आरोपही त्यांनी केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे माझ्यासह उदय महाले, गणेश नलावड़े, राजू साने, रमीज सैयद, रोहन पायगुड़े, प्रसाद गावड़े, आशाताई साने, किशोर कांबले, स्वप्निल जोशी, दिलशाद आतार, हेमंत बधे तथा शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरे डेअरीची तब्बल १६ एकर जमीन विकण्याचा तिघाडी सरकारचा डाव
इदेमित्सु होंडा रेसिंड इंडियाचे कविन क्विंतल यांनी २०२४ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या पहिल्या फेरीत टॉप १५ मध्ये मिळवले स्थान
एपी २५० क्लास रेस २ – इदेमित्सु होंडा रेसिंड इंडियाचे रायडर कविन क्विंतल यानी आज दुसरी रेस १३ व्या स्थानावर समाप्त करत टीमसाठी ३ पॉइंट्स मिळवले. त्यांचे सहकारी मोहसिन पी यांनी १६ वे स्थान मिळवले.
चँग इंटरनॅशनल सर्किंट (थायलंड), १७ मार्च २०२४ – या सीझनची सकारात्मक सुरुवात करत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करत इदेमित्सु होंडा रेसिंड इंडियाचे रायडर कविन क्विंतल आणि मोहसिन पी यांनी २०२४ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या पहिल्या फेरीची सांगता करत टीमसाठी मौल्यवान पॉइंट्स मिळवले.
आज तरुण रायडर कविन क्विंतल यांनी लक्षणीय कामगिरी करत एआरआरसीच्या एशिया प्रॉडक्शन २५० सीसी (एपी२५०सीसी) क्लासच्या दुसऱ्या रेसमध्ये टॉप १५ मध्ये स्थान मिळवले. १० रेसच्या या लॅपमध्ये १९ व्या स्थानावरून सुरुवात करत कविन यांनी पहिल्या लॅपपासूनच आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यांनी पुढेही आपले सर्वोत्तम कौशल्य दर्शवत सातत्य राखले. तोडीस तोड स्पर्धकांशी टक्कर देत आणि ट्रॅकवर झालेल्या काही अपघातांचा लाभ घेत ते पुढे जात राहिले आणि 19:09.553 ची वेळ नोंदवत १३ व्या स्थानावरून चेकर्ड लाइन पार केली. रेसदरम्यानचे सातत्य व स्थैर्याने त्यांना ३ पॉइंट्स मिळाले.
कविन यांचे सहकारी मोहसिन पी. यांनीही आजच्या रेसमध्ये दमदार कामगिरी केली. २१ व्या स्थानावरून रेसची सुरुवात करत मोहसिन यांनी आंतरराष्ट्रीय रायडर्सना टक्कर दिली. ट्रॅकवर त्यांनी सातत्य राखले आणि कोणतीही चूक न करता आजची रेस 19:30.033 वेळेत १६ व्या स्थानावर समाप्त केली. दुर्देवाने ते टीमसाठी पॉइंट्स मिळवू शकले नाही.
विशेष म्हणजे, २०२४ एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपच्या उद्घाटनपर फेरीत इदेमित्सु होंडा रेसिंग टीमने दोन्ही रेसेसमध्ये मिळून एकूण ५ पॉइंट्स मिळवले.
पहिल्या फेरीच्या सांगतेविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप ही सर्वात कठीण रेसेसपैकी एक मानली जाते आणि उद्घाटनपर फेरीमध्ये सहभागी झालेल्या आमच्या रायडर्सनी खऱ्या अर्थाने होंडाचा डीएनए दाखवून दिला. या फेरीदरम्यान आमच्या रायडर्सनी दमदार पाया घातला असून या सीझनमध्ये नवे विक्रम करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत. कविन आणि मोहसिन यांनी असामान्य चिकाटी दाखवत आपल्या मर्यादावर मात केली व टीमसाठी महत्त्वाचे पॉइंट्स मिळवले. आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. या फेरीने आमच्या टीमला असामान्य अनुभव दिला, जो आगामी फेऱ्यांमध्ये आमच्या रायडर्सना त्यांचे कौशल्य व डावपेच उंचावण्यासाठी उपयुक्त ठरेल.’
इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया रायडर कविन क्विंतल म्हणाले, ‘कालचा दिवस माझ्यासाठी निराशाजनक होता, कारण माझी कामगिरी खराब झाली. विशेषतः सीझनच्या पहिल्याच रेसमध्ये मी निष्प्रभ ठरलो. आज मी माझे कौशल्य आणि मशिन धोरणात्मक पद्धतीने वापरून टीमसाठी पॉइंट्स मिळवण्यावर लक्ष केंद्रत केलं. ट्रॅकवर विविध आव्हानं येऊनही मी शांत राहून सातत्य राखलं. त्यामुळे मला टॉप १५ मध्ये स्थान आणि टीमसाठी पॉइंट्स मिळवणं शक्य झालं.’
इदेमित्सु होंडा रेसिंग इंडिया रायडर मोहसिन परांबेन म्हणाले, ‘आजचा दिवस माझ्यासाठी अवघड होता, कारण मी २१ व्या स्थानावरून सुरुवात केली. स्थैर्य राखून कोणतीही चूक न करता पुढे जात राहाण्याचे ध्येय मी ठेवले होते. आंतरराष्ट्रीय रायडर्सना कडवी झुंड देत मी १६ व्या स्थानावर रेस समाप्त केली. कोणत्या बाबतीत सुधारणा करायची हे माझ्या लक्षात आले असून पुढच्या रेसपर्यंत त्यावर काम करण्याचे मी ठरवले आहे.
२०२४ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) विषयी – एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीपची २७ वी आवृत्ती आशियातील सर्वात स्पर्धात्मक रोड रेसिंग चॅम्पियनशीप असून १९९६ पासून तिचे आयोजन केले जात आहे. २०२४ सीझनमध्ये एकूण सहा फेऱ्यांचा समावेश असून त्यासाठी अधिकृत चाचणी व सीझन ओपनरचे १५-१७ मार्च २०२४ दरम्यान चँग इंटरनॅशनल सर्किट (थायलंड) येथे आयोजन केले जाते. एप्रिल २०२४ मध्ये झुहाई इंटरनॅशनल सर्क्टि, चीन येथे दुसऱ्या टप्प्याचे आयोजन केले जाईल. तिसरी फेरी २०२४ च्या जूनमध्ये मोबिलिटी रिसॉर्ट मोतेगी, जपान येथे होईल. चौथी, पाचवी आणि सहावी फेरी जुलै, सप्टेंबर आणि डिसेंबरमध्ये अनुक्रमे इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंड येथे होईल.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थविभावरी आपटे-जोशी यांना ‘दीदी पुरस्कार’
विश्वमोहिनी दीदी’ सांगीतिक मैफल बुधवारी; हृदयनाथ मंगेशकर, राहुल देशपांडे यांचे सादरीकरण
पुणे : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने संगीत क्षेत्रातील सेवेबद्दल दिला जाणारा ‘दीदी पुरस्कार’ वितरण व भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या सादरीकरणातून होणाऱ्या ‘विश्वमोहिनी लता दीदी’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यंदाचा ‘दीदी पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका विभावरी आपटे-जोशी यांना प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती संयोजन समिती सदस्य व गायिका मनीषा निश्चल यांनी पत्रकार परिषदेत दिली. कार्यक्रमाची व्यवस्था पाहणारे निश्चल लताड, सत्यजित धांडेकर यावेळी उपस्थित होते.
मनीषा निश्चल म्हणाल्या, “संगीत क्षेत्रामध्ये सातत्याने भरीव, उत्तुंग व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने लतादीदी मंगेशकर यांच्या नावाचा दीदी हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार विभावरी आपटे-जोशी यांना जाहीर झाला असून, येत्या बुधवारी (दि. २०) सायंकाळी ५ ते रात्री १२ या वेळेत कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दोन सत्रांत होणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या सादरीकरणातून होणाऱ्या ‘विश्वमोहिनी लता दीदी’ या सांगीतिक कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे हे विशेष अतिथी म्हणून सहभागी होतील.”
“या कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे राहुल देशपांडे एका वेगळ्या स्वरूपात ऐकता येणार आहेत. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या रचना व मंगेशकर आणि देशपांडे कुटुंबियातील जुन्या आठवणी श्रोत्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. तसेच लतादीदींनी काही गाणी व त्यातील बारकावे राहुल देशपांडे यांच्याकडून ऐकता येतील. लतादीदींनी गायलेल्या अजरामर मराठी व हिंदी गाण्यांचे सादरीकरण ‘विश्वमोहिनी लता दीदी’ या सांगीतिक मैफलीतून होणार असून, यामध्ये विभावरी आपटे-जोशी, प्राची देवल, श्रेयस बेडेकर, मनीषा निश्चल सादरीकरण करणार आहेत. रवींद्र खरे यांचे ओघवते निवेदन, विवेक परांजपे, राजेंद्र दूरकर, प्रसाद गोंदकर, अमृता ठाकूरदेसाई, ऋतुराज कोरे, विशाल थेलकर, विशाल गन्द्रतवार, निलेश देशपांडे यांची वाद्यांवर साथसंगत असणार आहे. हा कार्यक्रम पूर्णतः विनामूल्य आहे,” असे मनीषा निश्चल यांनी सांगितले.
सत्यजित धांडेकर म्हणाले, “अखंड विश्वाला सुरेल आवाजाने मोहिनी घालणाऱ्या लतादीदींची प्रेरणा घेत मनीषा निश्चल गेली तीन दशके आपल्या सुमधुर गायनाने संगीतसेवा करीत आहेत. मंगेशकर कुटुंबियांशी त्यांचा स्नेह अतूट आहे. लतादीदींच्या स्मरणार्थ होत असलेल्या या कार्यक्रमाच्या संयोजनाची जबाबदारी मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने मनीषा निश्चल पार पाडत आहेत. आपल्या महक संस्थेच्या माध्यमातून लतादीदींची गाणी गात राहण्याची इच्छा बाळगून त्या मेहनतीने व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कार्यरत आहेत.”
अजित पवार नालायक माणूस:श्रीनिवास पवारांच्या वक्तव्यानंतर पवार कुटुंबातील सर्वच मैदानात,
बारामती- अजित पवार नालायक माणूस आहे, वडीलधाऱ्या व्यक्तींचा मान त्यांना ठेवता आला नाही, अशी खरमरीत टीका अजित पवार यांची सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी केली आहे. श्रीनिवास पवार यांच्या या वक्तव्यामुळे पवार कुटुंबातील वाद आता चांगलाच टीकेला पोहोचला असल्याचे दिसून येत आहे. श्रीनिवास पवार यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी शर्मिला पवार आणि पुतणे रोहित पवार यांनी देखील पवार कुटुंबीयांच्या या वादावर आपले मत व्यक्त केले, त्यामुळे पवार कुटुंबातील वादाची चांगलीच चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात दिसून येत आहे.
अजित पवार यांच्या विरोधात त्यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आता राजकारणाच्या मैदानात उतरले आहेत. श्रीनिवास पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी बैठक घेत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचे नाही. आपण औषध विकत आणतो तेव्हा त्यावर एक्सपायरी डेट असते, तशी नात्यांना देखील एक्सपायरी डेट असते. आता वाईट वाईट वाटून घ्यायचे नाही. मला दाबून जगायचे नाही तर स्वाभिमानाने जगायचे असल्याचे मत श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केले. ज्यांना पदे मिळाली आहेत ती शरद पवार यांच्यामुळेच मिळाली आहे. त्याच साहेबांना आता तुम्ही घरी बसा, कीर्तन करा, असे म्हणत आहात. हे माझ्या मनाला पटणार नाही असे देखील श्रीनिवास पवार यांनी म्हटले आहे.
श्रीनिवास पवार यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी देखील अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या घरात वडीलधारी माणसे आहेत. आपली ओळख शरद पवार यांच्यामुळेच आहे. साहेबांनी आपल्यासाठी काय केले? हा प्रश्न विचारणे म्हणजे आई-वडिलांनी माझ्यासाठी काय केले? असे विचारण्यासारखे असल्याचे शर्मिला पवार यांनी म्हटले आहे. शेवटी कुटुंब हे वडीलधारी लोकांपासूनच सुरू होते. साहेबांनी इतक्या वर्षात माती खाल्ली का? आपण त्याला कारणीभूत होऊयात का? आपण त्याला गालबोट लावायचे का? असा प्रश्न शर्मिला पवार यांनी उपस्थित केला. कोणाला यश मिळेल हा मुद्दा नसून केवळ साहेबांना विजयी करायचा आहे, हा मुद्दा असल्याचे शर्मिला पवार यांनी म्हटले आहे.
श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्या विरोधात थेट भूमिका घेतल्यामुळे पवार कुटुंबातील वाद टीकेला गेला असल्याचे बोलले जात आहे. श्रीनिवास पवार यांची भूमिका ही सर्वसामान्य नागरिकांची भूमिका असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात उतरलेल्या सुनेत्रा पवार यांना घरातूनच मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यात आमदार रोहित पवार हे आधीपासूनच शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे यांची साथ देत आहेत. त्यात आता श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार यांचा देखील समावेश झाला आहे.
आमदार रोहित पवार यांची आई सुनंदा पवार आणि बहीण सई पवार यांनी देखील सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर येथे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना सुनंदा पवार आणि सई पवार या देखील सक्रिय असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अख्खे पवार कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले असल्याचे बोलले जात आहे.
बारामती मध्ये झालेल्या एका सभेदरम्यान अजित पवार यांनी आधीच या सर्व प्रकरणाबद्दल खंत व्यक्त केली होती. पवार कुटुंबातील एकही व्यक्ती आपल्या सोबत नसेल, सर्व माझ्या विरोधात प्रचाराला उतरतील, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. अजित पवार यांचे हे वक्तव्य खरे होताना दिसत आहे. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात प्रचारासाठी आता संपूर्ण पवार कुटुंब असल्याचे चित्र बारामतीत पाहायला मिळत आहे.
पवार कुटुंबातील सध्या चित्र पाहता या संदर्भात सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या संदर्भातले फोटोज आणि रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये संपूर्ण पवार कुटुंब हे शरद पवार यांच्यासोबत कसे आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची ही लढाई पवार विरुद्ध पवार होणार असून आता ती प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. एकंदरीत संपूर्ण पवार कुटुंब हे सुप्रिया सुळे यांच्या बाजूने लढत असल्याने अजित पवार यांच्या समोरील अडचणी आणखीनच वाढल्या आहेत.
कात्रजच्या तलावात सापडला तरुणीचा मृतदेह
पुणे- – कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात रविवारी तरुणीचा मृतदेह सापडला. अग्निशमन दलाला शनिवार टाळून गेल्यावर रविवारी रात्री साडेबाराच्या वेळी कॉल मिळाला.कात्रज अग्निशमन दलाच्या जवानांकडून व पोलिसांकडून तलावात बोटीच्या साहाय्याने दोन ते तीन तास शोध घेण्यात आला. परंतु, रात्रीच्या वेळी मृतदेह मिळून आला नाही. त्यामुळे अग्निशमन दलाकडून सकाळच्या वेळी सात वाजता शोध घेण्यात आला. शोध मोहिमेदरम्यान मृतदेह आढळून आला .
त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांकडून महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच, महिलेचा मृतदेह पुढील तपासणीसाठी ससून येथे पाठवण्यात आला आहे. अंदाजे २२ ते २४ वर्षाची महिला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून ही कार्यवाही कात्रज अग्निशमन दलाचे तांडेल वसंत भिलारे, तांडेल प्रसाद कदम, वाहनचालक फारुख शेख आदीच्या पथकाने केली.
नेमके मोदी कोण? मला का घाबरतात ? सांगितले राहुल गांधींनी … प्रचंड गर्दीत शिवाजी पार्कवर सभा संपन्न
राहुल गांधी म्हणाले – राजाचा आत्मा EVM, ED,CBI मध्ये:मला यंत्रणा समजते, त्यामुळे मोदी मला घाबरतात, सोशल मिडियावर हि मोदींचा कंट्रोल
महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस सोडली अन् माझ्या आईकडे रडले…राहुल गांधींनी सांगितला किस्सा!
मोदी एक मास्क -बॉलीवूड प्रमाणे एक अॅॅक्टर.. ज्यांना सांगितले जाते आज सुमुद्र किनाऱ्यावर जा .. आज हे करा ….
आरएसएस व मनुवादी शक्तींकडून लोकांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न: मल्लिकार्जून खरगे.
नरेंद्र मोदी केवळ मुखवटा, विरोधकांचा लढा एकाव्यक्ती विरोधात नाही एका शक्तीविरोधात: राहुल गांधी
ईव्हीएम शिवाय नरेंद्र मोदी निवडणुका जिंकू शकत नाहीत.
‘अब की बार, भाजपा तडीपार’ घोषणा गावागावात पोहचवा : उद्धव ठाकरे
महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’चा नारा दिला आता ‘छोडो भाजपा’ चा नारा देण्याची गरज: शरद पवार
इंडिया आघाडीच्या नेत्यांचा भाजपा व मोदी सरकारवर तुफान हल्लाबोल, ‘लढेंगे, मगर झुकेंगे नही’ चा निर्धार..
शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची अतिविराट ऐतिहासिक सभा.
मुंबई, दि. १७ मार्च
नरेंद्र मोदींचे कार्यक्रम श्रीमंतासाठी आहेत तर काँग्रेसचे कार्यक्रम गरिब समाजासाठी आहेत. मोदींना प्रचंड अहंकार आहे. २०१४ साली देश स्वतंत्र्य झाला अशी मोदींची धारणा आहे. नेहरू, आंबेडकर यांचे योगदान ते नाकारतात. राहुल गांधी यांनी ज्या शक्तीचा उल्लेख केला ती शक्ती आरएसएसची शक्ती आहे, मनुवादची शक्ती आहे आणि या शक्तीने ते लोकांना चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यंनी केला आहे.
शिवाजी पार्कवरील इंडिया आघाडीच्या अतिविशाल सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संबोधित करत होते ते पुढे म्हणाले की. मुंबई हे सर्वात शक्तीशाली शहर आहे. सर्व देशाचे लक्ष मुंबईवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांची भूमी आहे, इथला विचार सर्व देशात पोहचतो. मोदींनी किती गॅरंटी दिल्या व त्या पूर्ण केल्या का? असा सवाल केला. आज लोकशाही व संविधान अबाधित ठेवणे आपली जबाबदारी आहे. संविधान बदलणे सोपे नाही पण तसा प्रयत्न केला तर देशात मोठी क्रांती होईल असा इशारा दिला.
सभेला संबोधित करताना खासदार राहुल गांधी म्हणाले की, देशातील सर्व विरोधी पक्ष एका पक्षाविरोधात किंवा एका व्यक्तीच्या विरोधात लढत आहेत हे चुकीचे आहे. एका व्यक्तीला चेहरा बनवनू पुढे केले आहे. आम्ही या शक्तीच्या विरोधात लढत आहोत. नरेंद्र मोदी हा केवळ मुखवटा आहे. अभिनेत्याला जसे भूमिका दिल्या जातात तशाच भूमिका त्यांच्या कडून करून घेतल्या जातात, मोदींची ५६ इंचाची छाती नाही, मोदी एक पोकळ व्यक्ती आहे. राजा की आत्मा ईव्हीएममध्ये आहे हे खरे आहे. ईडी, सीबीआय सारख्या हिंदुस्थानच्या प्रत्येक संस्थेत राजाचा आत्मा आहे. भिती दाखवून पक्ष फोडले जात आहेत. पक्ष सोडणारे सर्वजण घाबरून भाजपात गेले आहेत. देशातील मीडिया व सोशल मीडियासुद्धा सामन्यांच्या हातात नाही. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, महिलांचे प्रश्न आहेत पण ते दाखवले जात नाहीत.
नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणुका जिंकू शकत नाहीत. विरोधीपक्षाला ईव्हीएम दाखवावे, ईव्हीएमबरोबर मतदान केल्यानंतर VVPAT स्लीप डब्ब्यात पडते त्याचीही मोजणी करा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली परंतु निवडणूक आयोग मोजणी करण्यास नकार देत आहे. मोदी फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत. मला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली, ईडी ऑफीसमध्ये अनेक तास बसवले पण घाबरलो नाही, मी कोणालाही घाबरत नाही. तसेच इंडिया आघाडीतील नेतेही घाबरत नाहीत. ही आघाडी हिंदुस्थानचे रक्षण करण्यास एकत्र आले आहेत. नरेंद्र मोदींकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी आहे. इलोक्टोरोल बाँडमधून खंडणी वसुली केली जाते. महान व्यक्तींनी एकच संदेश दिला आहे आणि तो म्हणजे नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान उघडा,असे आवाहन राहुल गांधी यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, आज ज्यांच्या लोकांच्या हातात सत्ता आहे त्यांनी महिला, शेतकरी, कामगार, आदिवासी, दलितांनी जे आश्वासन दिली होती ती पूर्ण केली नाहीत. आश्वासन देऊन जनतेला फसवले त्यांना हटवण्याची गरज आहे. मोदींची गॅरंटी खोटी आहे, ती चालणार नाही. मुंबईतूनच महात्मा गांधी यांनी छोडो भारतचा नारा दिला होता आज छोडो भाजपा हा नारा दिला पाहिजे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा हा एक फुगा आहे आणि त्या फुग्यात हवा भरण्याचे काम शिवसेने केले आहे. आता भाजपच्या डोक्यात हवा गेली आहे. आता लढाई आहे ती लोकशाही व संविधान वाचवण्याची. घटना बदलण्यासाठी भाजपाला ४०० पार जागा आहेत. देश हाच माझा धर्म आणि देश वाचला तरच आपण वाचू. कोणी कितीही मोठा असू त्याच्यापेक्षा देश मोठा असतो. २०१४ पासून एकाच पक्षाचे सरकार आहे, कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आला नाही. जनता एकवटली तर हुकूमशाहीचा अंत होतो. अब की बार भाजपा तडीपार अशी घोषणा घेऊन गावागावात जा, असे ठाकरे म्हणाले.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इलोक्टोरल बाँडबदद्ल अमित शाह स्पष्टीकरण देत आहेत पण फ्युचर गेमिंग सारख्या अनेक कंपन्या आहेत ज्यांनी नफ्यापेक्षा जास्त किमतीचे बाँड खरेदी केली, त्यांच्याकडे हा पैसा कुठुन आला, याची चौकशी केली पाहिजे. ईव्हीएमच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी आवाज उठवावा असे आवाहनही त्यांनी केले.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलीन यांनी भाजपावर टीका करत सेव्ह इंडियाचा नारा दिला व भारत जोडो न्याय यात्रेने देश जोडण्याचे काम केल्याचे म्हणाले.
बिहारचे विरोधी पक्ष नेते तेजस्वी यादव म्हणाले की, कितीही दबाव टाकला तरी आम्ही कोणीही झुकणारे नाहीत, सर्वजण लढणारे आहेत. लालू प्रसाद यांच्यावर दबाव आणला पण ते झुकले नाहीत. भारताच्या स्वातंत्र्यात भाजपाचे योगदान काय असा सवाल त्यांनी विचारला.
झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन म्हणाले की, देशातील हुकुमशाहीविरोधात सर्वजण एकत्र आलो आहेत, ही एकजूट कायम ठेवू व हुकूशाही वृत्तीच्या भाजपा सरकारला सत्तेतून खाली खेचू.
झारखंड मुक्ती मार्चाच्या नेत्या कल्पना हेमंत सोरेन म्हणाल्या की, आमदारांना खरेदी करुन महाराष्ट्रातील सरकार पाडले. विरोधकांवार दबाव टाकला जातो. भाजपा सरकारने हेमंत सोरेन यांनाही जेलमध्ये टाकले पण झारखंड झुकला नाही व इंडियाही झुकणार नही असा निर्धार केला.
शिवाजी पार्कवरील सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, खासदार राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, पिडिपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, प्रभारी रमेश चेन्नीथला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
सभेपूर्वी खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले.
संगीत आणि नृत्याने रसिकांची मने जिंकली !
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत गायन आणि नृत्य सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील संगीत आणि नृत्याने रसिकांची मने जिंकली ! हा कार्यक्रम इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (पुणे विभागीय कार्यालय) यांनी सादर केला. आय सी सी आर चे संचालक राज कुमार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.अनुप्रिता लेले यांनी सूत्रसंचालन केले. सानिया पाटणकर यांच्या भारतीय शास्त्रीय गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. दुर्गा रागातील बंदीश ‘ सखी मोरी रूम झूम बादल गरजे ‘ ‘जय भवानी दुर्गे ‘ तराना आणि ‘सकल ब्रिज धून मची ‘ होली गीत सादर करून रसिकांची मने जिंकली. माधव लिमये यांनी हार्मोनियम तर किशोर बोर्डे यांनी तबल्यावर साथसंगत केली. आस्था गोडबोले-कार्लेकर यांनी कथक नृत्य सादर केले. ‘आदी देव महादेव ‘, दूर्गा प्रणाम , आमद , गतनिकास , तराना आदी रचना सादर केल्या.संजय आगळे (तबला), अक्षय शेवडे ( पखवाज) , पूर्वा कवठेकर (पढ़न), मेघा तळेकर( गायन) , सुधीर टेकाळे (हार्मोनिअम) यांनी साथसंगत केली. हा कार्यक्रम रविवार,१७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे झाला.
जिल्ह्यात एकूण ८२ लाख २४ हजार ४२३ मतदार, निवडणुकीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे
पुणे दि.१७: भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील एकूण ८ हजार २१३ मतदान केंद्र आणि १६९ सहाय्यकारी मतदान केंद्र अशा एकूण ८ हजार ३८२ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड शहर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणुक निर्णय अधिकारी अजय मोरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर आदी उपस्थित होते.
डॉ. दिवसे म्हणाले, जिल्ह्यात पारदर्शक लोकसभा निवडणुका पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. यासाठी स्थीर पथक, भरारी पथक व व्हिडीओ चित्रीकरण पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘सी-व्हिजील’ ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता विषयक तक्रारींचा जलदगतीने निपटारा होणार आहे. आचार संहिता जाहीर झाल्यापासून ४८ तासाच्या आत सर्व राजकीय प्रचार साहित्य, पोस्टर, बॅनर्स काढण्यासाठी सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यांना निर्देश दिले आहेत. निवडणुका निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस विभागामार्फत प्रतिबंधात्मक कारवाई, शस्त्रे जमा करणे आदी कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.
दिव्यांग व वयोवृद्धांसाठी मतदान केंद्रावर विशेष सुविधा
जिल्ह्यात एकूण ८२ लाख २४ हजार ४२३ मतदार आहेत. दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. अशा मतदारांना रांगेत उभे न करता त्यांना मतदानासाठी सहकार्य करण्यात येईल. मतदान केंद्रावर येणे शक्य नसल्यास त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल.
निवडणुकीसाठी चोख सुरक्षा व्यवस्था
जिल्ह्यात २० संवेदनशील मतदान केंद्र असून याठिकाणी आवश्यक खबरदारी घेण्यात येणार आहे. ३ हजार ९४१ मतदान केंद्रावरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या सहाय्याने वेबकास्टींग करण्यात येणार असून नियंत्रण कक्षाद्वारे येथील मतदान प्रक्रियेचे अवलोकन करण्यात येईल. केंद्रीय सशस्त्र पोलीस बलाचे कर्मचारी आवश्यकतेनुसार तैनात करण्यात येतील. भोर तालुक्यात ३२, खेड-आळंदी ५ आणि आंबेगाव तालुक्यात २ असे एकूण ३९ ठिकाणी इंटरनेट व अन्य सुविधा नसलेले मतदान केंद्रे आहेत. त्याठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात संवेदनशील मतदान केंद्रावर २४x७ एकात्मिक नियंत्रण कक्ष, संवेदनशील बुथमध्ये वेबकास्टींग, पुरेसा सशस्त्र पोलीस बंदोबस्त, प्रतिबंधात्मक कार्यवाही, संपूर्ण जिल्ह्यात चेक पोस्टचे जाळे आणि सूक्ष्म निरीक्षक तैनात करणे आदी उपाय योजण्यात येणार आहेत.
बारामती मतदारसंघात ७ मे तर इतर तीन मतदारसंघात १३ मे रोजी मतदान
३५- बारामती लोकसभा मतदार संघात १२ एप्रिल पासून नामनिर्देशन पत्रे दाखल करून घेण्यात येतील. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा शेवटचा दिनांक १९ एप्रिल आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी २० एप्रिल रोजी, उमेदवारी मागे घेण्याचा शेवटची तारीख २२ एप्रिल, मतदानाची तारीख ७ मे रोजी, मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.
३३- मावळ, ३४- पुणे व ३६- शिरूर लोकसभा मतदार संघात १८ एप्रिलपासून नामनिर्देशन पत्रे दाखल करून घेण्यात येतील. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा शेवटचा दिनांक २५ एप्रिल आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी २६ एप्रिल रोजी, उमेदवारी मागे घेण्याचा शेवटची तारीख २९ एप्रिल, मतदानाची तारीख १३ मे रोजी, मतमोजणी ४ जून रोजी होणार आहे.
मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करणार
जिल्ह्यात प्रत्येकी २१ आदर्श मतदान केंद्र, महिला संचलित, दिव्यांग संचलित, युवकांद्वारे संचलित आणि विशेष मतदान केंद्र असतील. याद्वारे मतदान केंद्रावर चांगले वातावरण निर्माण करून मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, रॅम्प, स्वच्छतागृह, व्हीलचेअर, मतदार सुविधा केंद्र, पुरेशी प्रकाश व्यवस्था आणि उन्हापासून संरक्षणासाठी मंडप किंवा छत असणार आहे.
मतदानासाठी २० हजार ११७ बॅलेट युनिट, १० हजार ५९ कन्ट्रोल युनिट आणि १० हजार ८९७ कन्ट्रोल युनिट पुरविण्यात येणार आहेत. मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघाची मतमोजणी एफसीआय गोदाम कोरेगाव पार्क येथे तर शिरूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव (कोरेगाव) औद्यागिक वसाहतीतील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे.
लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवून लोकशाही मजबूत करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी केले.
निवडणुकीसाठी पोलीसांचे प्रशिक्षण पूर्ण-अमितेश कुमार
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पुणे शहर आयुक्तालयात ३ हजार २८७ मतदान केंद्र असून त्यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघातील ४३० मतदान केंद्र आहेत. १६ संवदेनशील मतदान केंद्र आहेत. याकरीता ७ हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
आदर्श आचारसंहितेची अतिशय पारदर्शक, प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार असून त्याकरीता पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. निवडणुकीवर प्रभाव पाडणाऱ्या बाबीवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस दलाच्यावतीने प्रभावीपणे उपाययोजना करण्यात येत आहे. ‘सी-व्हिजील’ ॲप आणि ‘सुविधा’ संकेतस्थळावरील तक्रारीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येणार आहे, लोकसभा सार्वत्रिक निवडणुका भयमुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी योग्य नियोजन करण्यात असून, याकरीता पुणे शहर पोलीस दल सज्ज आहे, असेही श्री. कुमार म्हणाले.
अडीच हजारापेक्षा अधिक व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई-विनयकुमार चौबे
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त श्री. चौबे म्हणाले, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात १ हजार ८५४ मतदान केंद्र असून त्यात प्रामुख्याने मावळ व शिरुर लोकसभा मतदारसंघाचे क्षेत्र आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने १ डिसेंबर २०२३ पासून आतार्यंत २ हजार ५०० पेक्षा अधिक आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई, एमपीडीएअंतर्गत १३, मोक्का कायद्याअंतर्गत १८ संघटनेवर कारवाई करुन ९९ आरोपींना अटक, तसेच ९५ आरोपींना हद्दपार, शस्त्र जमा करणे अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. यापुढेही आदर्श आचारसंहितेचे अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे, असेही श्री. चौबे म्हणाले.
निवडणुकीसाठी सुरक्षा आराखडा तयार-पंकज देशमुख
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, पुणे ग्रामीण पोलीस विभागाअंतर्गत शिरुर, बारामती मावळ असे तीन लोकसभा मतदारसंघ असून ३ हजार १०२ मतदान केंद्र आहेत. याकरीता लागणारे पुरेसे मनुष्यबळ असून बारामती व शिरुर लोकसभा निवडणुकीच्याकरीता अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. या मतदासंघात ५ संवदेनशील मतदान केंद्र आहेत. जानेवारीपासून २२ अवैध शस्त्रधारकांकडून शस्त्रे जमा करण्यात आली असून संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आराखडा तयार करण्यात आला असून विविध गुन्ह्याअंतर्गत असलेल्या आरोपी तसेच अवैध शस्त्रधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे. सार्वत्रिक निवडणुकीकरीता पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दल सज्ज असून निवडणुक अतिशय शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
0000
तुम्हाला गरिबीच्या खाईत लोटून मूठभर धनदांडग्यांना आणखी धनवान करणारे मोदींचे सरकार
मुंबई, दि. १७ मार्च
कन्याकुमारी ते काश्मीर ४ हजार किलोमीटरची पदयात्रा केल्यामुळे हिंदुस्थान जवळून पाहण्याची संधी मिळाली. मी जो हिंदुस्थान समजत होता त्यापेक्षा तो वेगळा असल्याचे या यात्रेतून समजले. भारत जोडो यात्रेतून लोकांशी संवाद साधल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे दिसले त्यामुळे दुसऱ्या यात्रेत न्याय हा शब्द जोडला. या यात्रेतून पाच घटकांना गॅरंटी देण्यात आल्या. ही गॅरंटी काँग्रेस पक्ष, मल्लिकार्जून खरगे वा राहुल गांधीची नाही तर तो हिंदुस्थानचा आवाज आहे, जनतेची मते विचारात घेऊन गॅरंटी दिलेली आहे, असे खासदार राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.
मुंबईत आयोजित न्याय संकल्प सभेत खासदार राहुल गांधी बोलत होते, ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने जनतेला विचारून, सर्वांची मते विचारात घेऊन या गॅरंटी दिल्या आहेत. भारतीय जनता पक्ष हे करु शकत नाही कारण त्यांच्याकडे सर्वकाही वरून येते. भाजपात केंद्रीकृत पद्धत आहे. सर्व काही नरेंद्र मोदी सांगतात तसेच चालते. आरएसएस व त्यांच्यामते ज्ञान एकाच व्यक्तीजवळ आहे, कामगार, शेतकरी यांना काहीच समजत नाही. बेरोजगाराला काही माहितीच नाही, असे ते समजतात. देशातील सर्वात विद्वान शास्त्रज्ञानाजवळ जेवढे ज्ञान आहे तेवढेच ज्ञान शेतकऱ्याजवळ आहे. बीडी कामगार महिलांच्या हातात जे कौशल्य आहे त्याचा आदर केला जात नाही, त्यांना पाठिंबा देणे गरजेचे आहे, आर्थिक मदत करा, मग बघा किती फरक पडतो, त्यांच्या हातातून मेक इन इंडिया घडतो. हिंदुस्थान द्वेषाचा देश नाही तर प्रेमाचा देश आहे. भारतीयांच्या डीएनएमध्येच आदर, प्रेम भरपूर आहे. हिंदुस्थान हा जगातील पहिला देश आहे ज्याने स्वातंत्र्याची लढाई प्रेमाने लढली. दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्याची प्रेरणा भारताकडून मिळाली, गांधीजींचे तत्वज्ञान व दिशा मिळाली त्यातूनच दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले. हिंदुस्तान प्रेमाचा देश आहे तर त्यात द्वेष का परवला जातो? तर या द्वेषाचे कारण अन्याय आहे. गरिब, शेतकरी, दलित, महिला, तरुण या घटकांवर अन्याय होत आहे. देशातील केवळ दोन तीन टक्के लोकांना न्याय मिळतो, त्यांच्यासाठी न्यायपालिका काम करतात, सरकार काम करते, सर्व संस्थांमध्ये त्यांना स्थान आहे पण ९० टक्के लोकांवर सातत्याने अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय निघाला तेव्हा असे सांगितले गेले की, कर्जमाफीमुळे शेतकरी आळशी बनेल, त्याची सवय बिघडले मग २०-२२ लोकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले तर त्यांची सवय बदलत नाही का? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. गरिब, आदिवासी, मागास, वंचित, शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करुन २०-२२ धनदांडग्यांची घरे भरली जात आहेत.
भारत जोडो यात्रेत केवळ राहुल गांधी चालला नाही तर हिंदुस्थानातील कोट्यवधी लोक पायी चालले, कोट्यवधी लोकांची जी भावना आहे त्यातील मी एक आहे. या यात्रेची शक्ती देशातील जनता आहे आणि ही लढाई आपल्याला एकत्र लढायची आहे. मोदी-राहुल, भाजपा-काँग्रेस यांच्यातील ही लढाई नाही तर देशाच्या स्वभावातील दोन आत्म्यांमधील ही लढाई आहे. एक आत्मा म्हणतो हिंदुस्थान मध्यातून चालवावा, वरून आदेश देऊन चालवावा आणि दुसरा म्हणतो विकेंद्रीकरण करून सर्वांची मते विचारात घेऊन चालवला पाहिजे. घाबरू नका, भाजपा सत्तेत येईल व संविधान बदलेल असे काही होणार नाही, भाजपा असे काहीही करू शकत नाहीत आणि त्यांच्यात तेवढी धमकही नाही पण सत्य व हिंदुस्थान आपल्याबाजूने आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.
खासदार राहुल गांधी यांनी सकाळी मणिभवनला भेट देऊन महात्मा गांधी यांना आदरांजली पाहिली त्यानंतर ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत न्याय संकल्प पदयात्रा काढली, या यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत महासचिव प्रियंका गांधी, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, अभिनेत्री स्वरा भास्कर यांच्यासह सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पदयात्रेनंतर न्याय संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती.
सायबर गुन्हयाच्या आक्रमणांना रोखण्यास तंत्रज्ञान व समानतावादी विचारांची विधायक एकजुट गरजेची – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
६८ व्या जागतिक महिला आयोगाच्या चर्चासत्रात स्त्री आधार केंद्र सहभागी; ऑनलाईन सत्रात अनेक मान्यवर तज्ञांचा सहभाग…
पुणे: जगभरातील नागरिकांसमोर जागतिकीकरणाचे मोठे आव्हान आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये शाश्वत विकासामध्ये वाढ झाली आहे तसेच सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वाढ झाल्यामुळे जगासमोर एक मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या विषयावर महाराष्ट्रातील सायबर विषयातील तज्ञ व अधिकारी मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षात झालेल्या सायबर गुन्ह्यांचा छडा महाराष्ट्रातील सायबर गुन्हे शाखेच्या वतीने यशस्वीरित्या लावण्यात आला असल्याचे मत स्त्री आधार केंद्राच्या मानद अध्यक्षा तथा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मांडले.
६८ व्या जागतिक महिला आयोगाच्या चर्चासत्रात ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पर्वात स्त्री पुरूष समानतेला सायबर गुन्ह्यांचे आव्हान’ या विषयावर शनिवार दि. १६ मार्च रोजी स्त्री आधार केंद्राने ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात डॉ. नीलम गोऱ्हे अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. याप्रसंगी श्रीमती चांदनी जोशी काठमांडू, नेपाळ (लिंग समभाव विश्लेषक) या महिलांची वैयक्तिक सुरक्षा व सायबर गुन्हे, श्री. निलेश म्हात्रे (व्यवस्थापन व सायबर सुरक्षा तज्ञ) लिव्हींगस्टन न्यु जर्सी अमेरिका हे ‘महिला व सायबर गुन्हे,’
श्री संदीप प्रकाश गादिया ( सायबर क्राईम तपास तज्ञ, मुंबई) सायबर गुन्हे अन्वेषण व सायबर गुप्त वार्ता, बालसिंग राजपूत (सायबर क्राईम विशेष तज्ञ) मा. मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी हे ऑनलाईन आर्थिक गुन्हे, ऑनलाईन लैंगिक छळ,
श्रीमती प्रणिती देशपांडे (हेग ,नेदरलँड) लिंग समभावा पुढील आव्हाने व सायबर गुन्हे, श्रीमती प्राची वॅन ब्रेण्डेनबर्ग कुलकर्णी (नेदरलॅंडस)या आर्टिफिशियल इंटेलिजन्स पक्षपात व सायबर गुन्हे प्रतिबंध तज्ञ, श्रीमती जेहलम जोशी विश्वस्त, स्त्री आधार केंद्र, यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात, कृष्णा समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, प्रियदर्शिनी, विवेक पाटकर, वैभव कांबळे, शिरीष कुलकर्णी, राजश्री, मेखाला, सौम्याब्राता चक्रवर्ती, विभावरी कांबळे, संदीप गादीया, अंजुषा चौगुले यांसह अन्य मान्यवर ऑनलाइन सहभाग घेतला.
श्रीमती चांदनी जोशी काठमांडू, नेपाळ (लिंग समभाव विश्लेषक)यांनी महिलांची वैयक्तिक सुरक्षा व सायबर गुन्हे या विषयावर बोलताना सांगितले की, स्त्री विषयक काम करत असताना मानसिक चर्चा ही समाजातील मोठी समस्या असल्याचे निदर्शनास येत आहे तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वाढ होत आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. स्मार्टफोनमुळे माहिती उपलब्धतेचे स्त्रोत वाढत असल्यामुळे त्याचा फायदा आणि तोटा दोन्ही असल्याचे त्यांनी सांगितले.
महिलांची वैयक्तिक सुरक्षा व सायबर गुन्हे या विषयावर बोलताना सांगितले की, स्त्री विषयक काम करत असताना तंत्रज्ञानामुळे स्त्रिया कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शिकार होत आहेत. ही समाजातील मोठी समस्या बनत असल्याचे निदर्शनास येत आहे. तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात सायबर गुन्ह्यांमध्ये देखील वाढ होत आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. स्मार्टफोनमुळे माहिती उपलब्धतेचे स्त्रोत वाढत असल्यामुळे त्याचा फायदा आणि तोटा दोन्ही असल्याचे त्यांनी सांगितले. पण यातून मार्ग निघू शकतो असा विश्वास देखील त्यांनी दाखवला.
श्री. निलेश म्हात्रे (व्यवस्थापन व सायबर सुरक्षा तज्ञ) लिव्हींगस्टन न्यु जर्सी अमेरिका यांनी ‘महिला व सायबर गुन्हे,’या विषयावर बोलताना सांगितले की, अनेक नामांकित व्यक्तींना देखील सायबर गुन्ह्यांना सामोरे जावे लागले आहे. जर्मनी यु एस यांसह भारतामध्ये देखील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. भारतीय बनावटीचे एअप्लिकेशन यावर उत्तम काम करत असल्याचे दिसत आहे असे त्यांनी सांगितले. तसेच सायबर क्राइम घटक जोडण्यासाठी विद्यमान यूएन करारांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे.तळागाळातील आणि स्थानिक पातळीवर क्षमता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. लोकांच्या खाजगी जीवनावरील आक्रमणाचा सामना व त्यांची सुरक्षा वाढवणे तितकेच गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री संदीप प्रकाश गादिया ( सायबर क्राईम तपास तज्ञ, मुंबई) यांनी सायबर गुन्हे अन्वेषण व सायबर गुप्त वार्ता, याविषयावर बोलताना सांगितले की, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहितीचे स्रोत वाढत आहेत. कृत्रिम बुद्धिमतेचा सुयोग्य वापर करून त्या माध्यमातून कंपन्या आपल्या सेवा ग्राहकांपर्यंत उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले .परंतु आपली फसवणुक होऊ शकते हे लक्षात धेऊन तंत्रज्ञानाच्या माध्यमातील दक्षता याविषयी जनमानसात जनजागृती होणे हे तितकेच गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
बालसिंग राजपूत (सायबर क्राईम विशेष तज्ञ) मा. मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी यांनी ऑनलाईन आर्थिक गुन्हे, ऑनलाईन लैंगिक छळ याविषयावर बोलताना सांगितले की, व्हाट्सएप, इमेल सोशल मीडिया साईट्सच्या माध्यामातून सायबर गुन्हे वाढत आहेत. ही गुन्हेगारी रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करत आहे. तसेच भारत सरकार खूप चांगल्या पद्धतीने सायबर गुन्हे या विषयात काम करत आहे. हेल्पलाइनच्या माध्यमातून तक्रारी नोंदवून त्या खूप जलद गतीने सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सायबर क्राईम गुन्ह्यामध्ये आपला ओटीपी किंवा बँक डिटेल्स कोणाबरोबरही शेअर करू नये असा सल्ला देखील यावेळी त्यांनी या चर्चासत्राच्या माध्यमातून दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती प्रणिती देशपांडे (हेग ,नेदरलँड) यांनी लिंग समभावा पुढील आव्हाने व सायबर गुन्हे, याविषयावर बोलताना सांगितले की, ‘सायबर स्वच्छता केंद्र’ या संस्थेच्या माध्यमातून अनेक सायबर विषयक उपक्रम राबविले जात आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रमाण समाजात वाढत असल्याने लिंग सामानातेत अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. मानवनिर्मित बुद्धिमत्ता ही मर्यादित स्वरूपाचे काम करते तर कृत्रिम बुद्धिमत्ता ही डेटा फोटो आणि असंख्य गोष्टी यामध्ये तयार केल्या जाऊ लागल्या आहेत. .कृत्रिम बुद्धिमत्ता च्या माध्यमातून मोठ्या व्यक्तींचे व्हिडिओज ,फोटो फेक म्हणून वापरले जाऊ लागले आहेत. यावर उपाययोजना करताना सक्षम सारखे माध्यम मोठ्या प्रमाणावर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती प्राची वॅन ब्रेण्डेनबर्ग कुलकर्णी (नेदरलॅंडस)यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स पक्षपात व सायबर गुन्हे प्रतिबंध तज्ञ याविषयावर बोलताना सांगितले की, सोशल मीडिया हाताळताना सायबर गुन्ह्यामध्ये आपण अडकले जाणार नाही हे पाहणे महत्वाचे आहे. पुरुष आणि स्त्री हे दोघेही सायबर गुन्ह्यांचे बळी पडताना दिसतात. यामध्ये अनेक सुप्रसिद्ध व्यक्ती, महत्वाच्या पदावरील व्यक्ती यांचे नावे समाज माध्यमांवर खोटे खाते उघडून त्याद्वारे सायबर गुन्हे घडविले जात आहेत. याबाबत सर्व नागरिकांनी जागृत राहणे आवश्यक आहे. तसेच सायबर सुरक्षाविषयक,भारतीय संविधान आणि लैंगिक समानता समानतेचा अधिकार कलमांतर्गत समाविष्ट आहे .सायबर स्वच्छता केंद्राच्या माध्यमातून कोड साफ करण्यासाठी प्रोग्राम आणि विनामूल्य तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती जेहलम जोशी विश्वस्त स्त्री आधार केंद्र यांनी सांगितले की, आजच्या परिसंवादाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत सर्वांनी जाणून घेतले. यातून समोर आलेल्या माहितीत प्राविण्य सर्वांना होणे तेवढेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
समारोपाच्या शेवटी डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आजच्या सत्रात सर्वांनी अभ्यासपूर्ण मांडणी तुन आलेल्या मुद्दयांवर आम्ही पाठपुरावा करणार आहोत . कृत्रिम बुद्धीमत्तेस शत्रु न मानता कृत्रिम बुद्धिमत्तेला सहकारी शक्ती मानुन त्याचा विधायक ऊपयोग करण्यास संवाद व समन्वय गरजेचा आहे. या चर्चासत्रामध्ये सर्व सहभागी मान्यवरांनी केलेले सादरीकरण अतिशय उपयुक्त व ज्ञानात भर पाडणारे आहे. तसेच महाराष्ट्र शासन आणि भारत सरकार हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानावर काम करत आहे. आगामी काळात सायबर क्राईमती गुन्हेगारी रोखण्यासंदर्भात प्रयत्न महाराष्ट्र शासन करत राहील असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
या चर्चासत्रात राज्यासह, युरोप, चीन, अमेरिका, नेपाळ ,अशा – विदेशातून व भारतातून विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच याकार्यक्रमाचे प्रक्षेपण स्त्री आधार केंद्राच्या फेसबुक खात्यावरूनही प्रक्षेपित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अपर्णा पाठक यांनी केले.
लोकसभा निवडणुका निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करा-जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे
पुणे दि. १७- लोकसभा सार्वत्रिक निवडणुका निकोप वातावरणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक सिंगला, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.
डॉ.दिवसे म्हणाले, निवडणुकांच्यादृष्टीने प्रशासनाने आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. पुरेशा प्रमाणात मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रीयेच्या प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्षांना माहिती देण्यात येत आहे. ईव्हीएम सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच स्थिर आणि भरारी पथके कार्यान्वित करण्यात आली असून ईएसएमएस ॲपवर होणाऱ्या कारवाईची माहिती भरण्यात येणार आहे.
बँकेतून होणाऱ्या मोठ्या रकमेच्या व्यवहारांची माहिती घेतली जाणार आहे. पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असणार आहे. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्यास किंवा खाजगी जागेत परवानगी न घेता प्रचार केल्यास कारवाई करण्यात येईल. राजकीय पक्षांनी भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेबाबत दिलेल्या सुचनांचे पालन करावे.
दिव्यांग आणि वयोवृद्ध नागरिकांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रीया पारदर्शक राहील यावर भर देण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात शांततेच्या वातावरणात निवडणुका होण्याची परंपरा आहे. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी आणि मुक्त वातावरणात निवडणुका व्हाव्यात यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे,असे आवाहन त्यांनी केले.
महादेव सट्टा ॲप-छत्तीसगडच्या माजी CMसह 21 आरोपी
रायपूर-
महादेव सट्टा ॲप प्रकरणात, ईओडब्ल्यू (आर्थिक संशोधन शाखा) ने ईडीच्या तक्रारीवरून छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह 21 आरोपींविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. त्यात ॲप प्रमोटर्स सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि अनेक अनोळखी पोलीस अधिकारी आणि व्यावसायिकांच्या नावांचाही समावेश आहे.
ईडीने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, महादेव ॲप प्रमोटर्स पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह प्रभावशाली राजकीय व्यक्तींचे संरक्षण होते. ॲपच्या प्रमोटर्सवर कारवाई थांबवण्यासाठी या आरोपींना संरक्षण मनी म्हणून नियमितपणे मोठी रक्कम दिली जात होती.
हादेव बुकच्या ऑपरेटर्सच्या माध्यमातून पोलीस, प्रशासकीय अधिकारी आणि राजकारण्यांना हवाल्याद्वारे प्रोटेक्शन मनी पाठवण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे. या अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून प्रवर्तकांकडून आर्थिक लाभ घेत अवैध संपत्ती मिळवली. ईडीने तात्पुरत्या स्वरूपात अनेक स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत.
4 मार्च रोजी, या सर्व आरोपींवर EOW मध्ये कलम 120B, 34, 406, 420, 467, 468, 471, सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 चे कलम 7, 11 आ्णिया भ्रष्टाचार विरोधी (सुधारणा) कायदा 2018 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ च्या व्यावसायिक गुणवत्ता पारितोषिकांचे उत्साहात वितरण
एकत्रित कामाने शाश्वत विकास शक्य : विनायक पै
पुणे :’आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’च्या वतीने ‘एईएसए व्यावसायिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ’ शनिवारी सायंकाळी उत्साहात पार पडला.टाटा प्रोजेक्टस् लि.चे व्यवस्थापकीय संचालक विनायक पै हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रामप्रसाद आखिशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमात होती.आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा आणि सर्वोत्तम बांधकाम प्रकल्पांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.
हा पारितोषिक वितरण समारंभ रॉयल कोर्ट लॉन (चांदणी चौक)येथे झाला. पारितोषिक वितरण समारंभाचे हे २९ वे वर्ष होते.प्रत्येकी ५० हजार रक्कम ,मानचिन्ह असे या पारितोषिकांचे स्वरूप होते.रहिवासी बंगला,इमारत,सोसायटी,इन्स्टिट्यूट,उद्योग,कार्यालय,पूल बांधणी,उद्यान,रेस्टोरंट,दुरुस्ती आणि संवर्धन,युवा आर्किटेक्ट अशा अनेक गटातून ही पारितोषिके दिली गेली.तज्ज्ञांच्या समितीने या प्रकल्पांचे परीक्षण करून नावे निवडली. सीईपीटी युनिव्हर्सिटी कडून मिळालेल्या डॉक्टरेट बद्दल ख्रिस्तोफर बेनिंजर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या वतीने रामप्रसाद आखिशेट्टी यांनी तो स्विकारला.
एकत्रित कामाने शाश्वत विकास शक्य : विनायक पै
विनायक पै म्हणाले, ‘ भारतात शहरीकरणाने वेग पकडला आहे. नव्या संधी तयार झाल्या आहेत. सरकार आणि खासगी क्षेत्राकडून मोठया प्रमाणात बांधकाम क्षेत्रात कामे चालू आहेत. जीडीपीतील मोठा वाटा बांधकाम क्षेत्रामुळे आहे. बांधकामे पूर्ण होताना होणारा उशीर ही सार्वत्रिक आहे. त्याच्या मागील कारणांवरही विचार व्हायला हवा. आर्किटेक्ट, इंजिनियर्सनी जास्तीत जास्त वेळ एकत्र काम केल्यास उपाय निघतील. अधिक चांगले नियोजन करता येईल. गुणवत्तेत वाढ होईल. उत्तम नियोजन ही या क्षेत्रातील यशाची गुरुकिल्ली आहे.एकत्रित कामाने शाश्वत विकास होईल.
ख्रिस्तोफर बेनिंजर यांच्या वतीने उपस्थित प्रतिनिधी रामप्रसाद आखिशेट्टी म्हणाले ,’ भारत परिवर्तनाच्या वाटेवर आहे. आपण सर्व आपल्या कामातून राष्ट्र निर्मितीत कार्यरत आहोत. पुणे बदलत आहे, सातत्याने बांधकामे चालू आहेत, त्यावर आपण गुणवत्तेचा ठसा उमटविला पाहिजे.’ परीक्षकांच्या वतीने लक्ष्मण थिटे यांनी मनोगत व्यक्त केले.
‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ चे प्रेसिडेंट इंजिनिअर पराग लकडे यांनी प्रास्ताविक केले.’आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ चे चेअरमन महेश बांगड तसेच आलोका काळे यांनी सूत्रसंचालन केले.विश्वास कुलकर्णी,दिवाकर निमकर,केशव देसाई हे विश्वस्त,खजिनदार हेमंत खिरे, सचिव संजय तासगावकर,सहसचिव मनाली महाजन ,निनाद जोग,शेखर गरुड,मकरंद गोडबोले,नितीन भोळे, आनंद कुंकलोळ,हृषीकेश कुलकर्णी,जयंत पटवर्धन,नुपूर चिचखेडे,स्काँन प्रोजेक्ट्सचे नीलेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. राजीव राजे यांनी आभार मानले.
असोसिएशनचे माजी अध्यक्ष आर्कीटेक्ट पुष्कर कानविंदे हे या पारितोषिक वितरण सोहळ्याचे निमंत्रक होते. स्काँन प्रोजेक्ट्स ,एस जे काँट्रॅक्ट्स प्रा लि ,कुमार प्रॉपर्टीज,रोहन बिल्डर्स,बेहरे -राठी ग्रुप , सी एस आर एल प्रा .लि. यांचे सहकार्य या सोहळ्याला लाभले .
बांधकाम क्षेत्रातील नवनिर्मितीचा,उत्तम प्रकल्पांचा गौरव
या कार्यक्रमात उत्तम प्रकल्पांना गौरविण्यात आले.मुख्य पुरस्कारामध्ये प्रकल्पांना प्रत्येकी ५० हजार रुपये प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.अनघा पाटील, अर्चना देशमुख – कुलकर्णी यांना एईएसए यंग अचिव्हर्स अवॉर्ड’ देण्यात आले. २५ हजार रोख, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
पुण्याबाहेरील नॉन रेसिडेन्सीयल ऑफीस रिटेल प्रकल्पासाठी यश टेक्नोलॉजी प्रा.लि., स्ट्रीट फॉर ऑल प्रकल्प (पेन्सिल चौक , बारामती), करंदीकर वाडा संवर्धन प्रकल्प(सातारा ) या प्रकल्पाला गौरविण्यात आले. साईट मॅनेजमेंटसाठी आय.आय .टी., धारवाड ला तसेच नरेंद्र मोदी स्टेडियम प्रकल्पाला ज्युरी रेकमेंडेशन अवॉर्ड देण्यात आले.
रेसिडेन्शियल विभागात सिंगल फॅमिली हाऊस अॅट कामशेत प्रकल्पाला गौरविण्यात आले. ग्रुप हाऊसिंग प्रकल्पांना आयआयटी गांधीनगर प्रकल्पाला गौरविण्यात आले. जालिहाल हाऊस, राजभवन ( महाबळेश्वर ) या प्रकल्पांना ज्युरी रेकमेंडेशन अवॉर्ड देण्यात आले.
पुण्यातील नॉन रेसिडेन्शियल विभागात संस्थातंर्गत पुरस्कारासाठी व्ही.एन. लाहोटी स्टुडंट होस्टेलला, पुण्यातील कमर्शियल प्रकल्पासाठी तौराल इंडिया प्रा.लि. कार्यालयाला गौरविण्यात आले. इंडस्ट्री विभागासाठी बजाज ऑटो लि. च्या ग्रँड कॅनोपी प्रकल्पाला गौरविण्यात आले. ‘ऑफीस अॅट आमराई ‘ , मंगलम लाईफपार्क एक्स्पीरियन्स सेंटर, कैलास भेळ फूड कोर्ट, एनझेन बायो सायन्सेस लि. या प्रकल्पांना ज्युरी रेकमेंडेशन अवॉर्ड देण्यात आले.
सिंगल फॅमिली होम रेसिडेन्शियल विभागात अभिमानश्री प्रकल्प यांना गौरविण्यात आले.मायरा बंगलो, अरिहंत कृपा होम, हाऊस अराऊंड स्कायलाईट, माहेश्वरी हाऊस , गीते फार्म हाऊस यांना ज्युरी रेकमेंडेशन अवॉर्ड देण्यात आले.
मल्टी टेनमेंट बिल्डींगसाठी अंजली प्रकल्पाला गौरविण्यात आले.तत्व प्रकल्पाला ज्युरी रेकमेंडेशन अवॉर्ड देण्यात आले.ग्रुप हाऊसिंगसाठी मंगलम ब्रीझ प्रकल्पाला गौरविण्यात आले.
पुण्याच्या विकासात ५४ वर्षांचे योगदान:
‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन'(एईएसए ), पुणे ही शहराच्या सर्वांगिण सुधारणेसाठी सर्व प्रकारच्या बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येऊन काम करण्यासाठी १९७० मध्ये स्थापन झालेली एक आगळीवेगळी संस्था आहे. ज्ञानाचा प्रसार, मूल्याधारित व्यवसाय, आणि स्थानिक सरकारी संस्थांबरोबर सामंजस्याने काम करण्यासाठी संस्था सतत कार्यरत असते. यामुळे असोसिएशनला आणि व्यावसायिक गुणवत्ता पारितोषिकांना बांधकाम क्षेत्रात मानाचे स्थान आहे.
घरोघरी वृत्तपत्रांतून पोहोचली पत्रके, अनिल शिरोळे,मेधा कुलकर्णी, योगेश गोगावले,मुळीक यांच्यासह माध्यमांच्या कार्यालयांना दिल्या भेटी
कॉंग्रेसचा उमेदवार घोषित होण्यापूर्वी लोकसभा प्रचारात मोहोळ यांनी घेतली आघाडी
पुणे-पुणे लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी जाहीर होताच पक्षांतर्गत भेटीगाठी घेत प्रचाराला सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवार आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची घरी जावून भेट घेत प्रचारात आघाडी घेतली आहे. या भेटींना सकारात्मक प्रतिसाद मिळत असून भेटींमुळे पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह वाढत असल्याचे चित्र आहे. शिवाय या भेटींदरम्यान मोहोळ यांचा विजय मताधिक्याचा उच्चांक गाठेल, असा विश्वास राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीने निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उमेदवाराची घोषणा केल्याने प्रचाराली लागलीच सुरुवात झाली आहे. मोहोळ यांनी प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात पक्षांतंर्गत भेटीगाठींना प्राधान्य दिल्याने संघटना पातळीवर सर्वच घटक कार्यरत करण्याचा मोहोळ यांचा प्रयत्न आहे. मोहोळ यांनी सर्वात आधी त्यांचे राजकीय गुरु माजी खासदार अनिल शिरोळे यांची भेट घेत संवाद साधला. आपल्याच तालमीतील पैलवान लोकसभेच्या आखाड्यात आल्याने शिरोळे यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले. शिवाय शिवाजीनगरचे मा. आमदार विजय काळे यांच्याशीही मोहोळ यांनी संवाद साधला.
कोथरुडच्या माजी आमदार आणि राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्याही घरी मोहोळ यांनी भेट देत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. यावेळी खा. कुलकर्णी यांनी मोहोळ यांचे औक्षण करत विजयाचा संकल्प केला. मोहोळ आणि खा. कुलकर्णी एकत्र आल्याने याचा मोठा फायदा कोथरुड विधानसभेच्या मताधिक्यात होईल, अशी शक्यता राजकीय जाणकारांना आहे. शहर भाजपाचे मा. अध्यक्ष योगेश गोगावले यांचीही भेट मोहोळ यांनी घेऊन त्यांनाही प्रचारात सक्रिय करण्याचा प्रयत्न केला आहे.
भेटींबाबत मोहोळ म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टी ही केवळ पार्टीच नाही तर परिवार आहे. त्यामुळे सर्वात आधी परिवारातील घटकांशी संवाद आणि भेटी आवश्यक असतात. शिवाय या निमित्ताने जुन्या आठवणींनाही उजाळा मिळतो. या सर्व भेटींमधून सर्वांचा मिळालेला सकारात्मक प्रतिसाद माझ्या प्रचाराचा उत्साह वाढवणारा आहे. पुढील काळातही या भेटीगाठी कायम सुरु राहणार आहेत.’
मोहोळ विक्रमी मतांनी विजयी होतील : खा. मेधा कुलकर्णी
मोहोळ यांचा विजय निश्चित असून त्यांचा हा विजय आजवर मिळालेल्या विजयांपेक्षा अधिक मतांचा असेल, असा विश्वास खा. कुलकर्णी यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आता अधिकच्या मताधिक्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. मोहोळ यांच्याशी प्रचाराच्या रणनितीसंदर्भातही बोलणे झाले आहे, असेही खा. कुलकर्णी म्हणाल्या.
उमेद फाऊंडेशनतर्फे पौड येथे बालक-पालक प्रकल्पाचे भूमीपूजन
पुणे : दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सर्वत्र आहेत. परंतू दिव्यांग विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी निवासासाठी सुरू केलेला ‘बालक-पालक’ हा स्तुत्य उपक्रम आहे, असे मत माजी प्रांतपाल लायन रमेश शहा यांनी व्यक्त केले. उमेद फाऊंडेशनचे संस्थापक राकेश सणस यांनी हा सेवाप्रकल्प सर्वांच्या सहकार्याने कार्यान्वित राहणार आहे. यासाठी सर्वांनी सर्व प्रकारचे सहकार्य करावे, असे आवाहन केले.
उमेद फाउंडेशनच्या वतीने पौड येथे उभारण्यात येत असलेल्या ‘बालक-पालक’ प्रकल्पाचे भूमीपूजन रमेश शहा व स्मिता शहा यांच्या हस्ते झाले. दिव्यांग व्यक्तीसोबत त्यांच्या पालकाना मायेचा निवारा देणारा हा पहिला प्रकल्प आहे, असे या प्रकल्पाच्या मार्गदर्शक सीमा दाबके यांनी सांगितले. श्रीमती प्रतिभा केंजळे यांनी हा प्रकल्प सुरू करून दिव्यांग व्यक्ती व त्यांचे पालक यांना खराखुरा मायेचा आधार दिला असे मत व्यक्त केले.
