इंदापूर-इंदापूर शहरात जेवण करण्यास गेलेल्या तरुणाचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आलाय. अचानक गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंदापूर शहरातील जगदंबा हॉटेलमध्ये (दि.16) रात्री ही घटना घडली. अविनाश धनवे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो पुण्यातील आळंदी परिसरातील राहिवासी आहे.
पिंपरी-चिंचवड येथील तरुण हा आपल्या मित्रांसोबत जेवण करण्यासाठी इंदापूर येथे हॉटेल जगदंब येथे थांबला असता, काही अज्ञात हल्लेखोरांनी पाठीमागून येत खुर्चीत बसलेल्या तरुणाच्या डोक्यात पिस्तुलातून गोळी झाडून आणि कोयत्याने वार करत हत्या केली. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून ही घटना शनिवारी रात्री घडली. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवना केले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
शनिवारी 16 मार्चला सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास हा गोळीबाराचा प्रकार घडला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार हॉटेल जगदंबा या ठिकाणी मयत धनवे इतर काही सहकार्यांसोबत जेवण करण्यासाठी बसला होता. यावेळी चार चाकी मधून आलेल्या सहा ते सात अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार करत कोयत्याने वार केला. यामध्ये धनवे नामक युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश धनवे याच्या डोक्यातही गोळी लागली.गोळीबार कोणी केला, हे अद्याप समजू शकले नसून हा गोळीबार पूर्व वैमानसातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव अविनाश धनवे असल्याचे सांगितले जात असून तो पुण्याकडील आळंदी परिसरातील राहणार असल्याचे समजते.
हल्ल्याच्या, गोळीबाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये दहशत वाढत आहे. कोणी कधीही कुठे येऊन गोळीबार, कोयत्याने हल्ला करुन जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षितेता प्रश्न ऐरणीवर आहे. राहुल पाटील गोळीबार प्रकरण ताजे असताना पुण्यात आणखी एक गोळीबार झाल्याची घटना समोर आलीय. या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला.