पुणे- रस्त्यावरील जाहिरातीच्या शुल्क् वसुली साठी बड्या बड्या उद्योजकांकडे तगादा लावलेल्या, आणि त्यासाठी थकून बसून राहिलेल्या महापालिकेला आता निवडणूक आचारसंहिता लागल्यावर शहरात होणारी बेकायदा पोस्टर बाजी, फ्लेक्स आणि होर्डिंग्जवर कारवाईला प्रारंभ करावा लागतो आहे. अनेक ठिकाणी राजकीय , बिगर राजकीय लोकांनी बेकायदा पोस्टर बाजी करत फ्लेक्स लावून शहर विद्रूप करून ठेवले आहे. कुठे संकल्पना माझीच असे बोर्ड झळकत आहेत तर कुठे शिल्पकाराचे बोर्ड झळकत आहेत. या सर्वांसाठी आता स्वतःचा खर्च मनुष्यबळ लावून महापालिकेला हे बोर्ड काढावे लागत आहेत. अर्थात या साऱ्यांचे ओझे पुणेकरांच्या म्हणजेच महापालिकेच्या खांद्यावर च असणार आहे कारण आजवर असंख्य कोट्वायांधीच्या कोट्यावधींचे शुल्क वसुलीचे तगादे वाऱ्यावर विरलेले आहेत.
दरम्यान भाजपने शहरभर रंगवून ठेवलेल्या भिंती आता महापालिकेच्या कारवीच्या टप्प्यात येतील काय ? हे पाहावे लागणार आहे. गेली काही महीने शहरभर भाजपच्या विविध पदाधिकारी , माजी नगरसेवकांनी ठीक ठिकाणी सार्वजनिक भिंतीवर भाजपचा प्रचार करणाऱ्या जाहिराती बेकायदा पद्धतीने रंगविल्या आहेत . या विरोधात काहींनी आंदोलने केली पण त्यावर कारवाई करण्याची हिंमत महापालिकेने दाखविली नाही , आता आचारसंहिता लागल्यावर या भिंतींचा श्वास मोकळा होऊ शकणार आहे.
शनिवारी महापालिकेचे कामकाज बंद असल्याने हे कर्मचारी सुट्टीवर होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांची जबाबदारी असलेल्या भागात कारवाई सुरु केली आहे. यामध्ये सर्व पेठा, कोथरूड, बाणेर बालेवाडी, बालाजीनगर, कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, हडपसर, संपूर्ण नगर रस्ता आदी भागात कारवाई सुरु झाली आहे.’आचारसंहिता सुरु झाल्याने राजकीय पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांसह अन्य व्यक्ती, संस्थांचे फ्लेकस, बॅनर, बोर्ड काढून टाकण्यात सुरुवात झाली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत ही कारवाई पूर्ण होईल. आचारसंहितेच्या काळात आयोगाची परवानगी न घेता फ्लेक्स, बॅनर लावल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.’– संतोष वारुळे, उपायुक्त