हिंदुस्थानच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात.

Date:

इलोक्टोरल बाँड हे पंतप्रधान मोदींनी चालवलेले जगातील सर्वात मोठे वसुली रॅकेट: राहुल गांधी

सीबीआय, ईडी, आयकर विभागाकडून दबाव टाकून कार्पोरेट्सकडून वसुली.

सर्व सरकारी यंत्रणा मोदींनी वसुलीच्या कामाला जुंपल्या, ईडी सीबीआय भाजपा आरएसएसचे शस्त्र.

भिवंडी, दि. १५ मार्च
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय अर्थकारण साफ करण्याची भाषा करून इलेक्टोरल बाँड पद्धत आणली पण या बाँडची खरी बाजू आज देशाला समजली आहे. इलोक्टोरोल बाँड हे जगातील सर्वात मोठे हप्तावसुली रॅकेट आहे आणि सीबीआय, ईडी, आयकर विभागाला यासाठी गुंतवून वसुली केली आहे. हिंदुस्थानच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे, असा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे.
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संध्याकाळी भिवंडी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी या घोटाळ्यावरून भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर हल्ला केला. ते पुढे म्हणाले की, सीबीआय, ईडी, आयकर विभागाकडून कार्पोरेट कंपन्यांवर दबाव टाकून ही वसुली करण्यात आलेली आहे. एखाद्या कंपनीवर सीबीआय ईडी किंवा आयकर विभागाची कारवाई होते त्यानंतर ती कंपनी बाँड खरेदी करते हे उघड झाले आहे. काही कंपन्यांना काम देऊन त्यातील हिस्सा या बाँडच्या माध्यमातून वसूल केला आहे. काही कंपन्यांना राष्ट्रीय महामार्ग, रस्ते, टनेलचे कंत्राट दिले त्या कंपन्यांकडूम मोठी वसुली केली आहे. हा गंभीर गुन्हेगारीचा प्रकार असून राष्ट्रद्रोह आहे. या घोटाळ्यात नितीन गडकरींचा सहभाग नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच हात आहे. ईडी, सीबीआय, आयकर, निवडणूक आयोग या संस्थांना मोदींनी वसुलीच्या कामाला जुंपले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात शेल कंपन्यांचा वापर केला आहे. सर्वच्या सर्व यंत्रणाच वसुलीच्या कामाला जुंपल्या आहेत. या संस्था भाजपा व आरएसएसच्या शस्त्र बनवल्या आहेत. परंतु भाजपाची कधीतरी सत्ता जाईल आणि त्यावेळी जी चौकशी होईल ती अत्यंत कठोर कारवाई असेल.
काँग्रेससह विरोधी पक्षांनाही या बाँडचे पैसे मिळाले आहेत या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, यातील सर्वात जास्त पैसा भाजपाला मिळालेला आहे. १०-२० टक्के पैसा विरोधी पक्षांना मिळाला असेल परंतु काँग्रेसकडे हायवे किंवा इतर कंत्राट देण्याचे अधिकार नाहीत. सीबीआय, ईडी, आयकर विभाग यांच्यावर विरोधी पक्षांचे नियंत्रण नाही ते या सर्व संस्था पंतप्रधानांच्या नियंत्रणात आहेत असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेश विसर्जनासाठी पुण्यात ४१६ घाट व कृत्रिम हौदांवरील विद्युत व्यवस्थेचा आढावा

सुमारे १०० ठिकाणी अतिरिक्त फ्लड लाइट्स; स्पीकर्स आणि तात्पुरते...

पुण्यात पीजी-हॉस्टेलसह भंगार गोडाऊनवर महापालिकेची कारवाई

वडगाव बुद्रुक, नऱ्हे, धायरीतील १३ पीजी आणि ७ भंगार...

चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीवर टाटा ट्रस्ट्सचा आक्षेप; ठराव ‘बेकायदेशीर’ असल्याचा दावा

दोन नॉमिनी संचालक असताना बहुमतासाठी दोघांची संमती आवश्यक; कास्टिंग...

उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटी

महापालिकेच्या तयारीची मंडळ पदाधिकाऱ्यांना माहिती; मेट्रो, पोलिस आणि पालिका...