लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. लोकसभा मुख्य आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त सुखविंदर संधू, ज्ञानेश कुमार यांनी माहिती दिली. दरम्यान, देशभरात सात टप्प्यात हे मतदान होणार असून महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान
देशातील 543 लोकसभा जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभा मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिला तर 25 मे रोजी शेवटचा टप्पा असेल
- पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
- दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
- तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
- चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
- पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
- महाराष्ट्रात 26 एप्रिल ते 25 मे पर्यंत पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडेल. संपूर्ण लोकसभा निवडणूक निकाल 4 जून रोजी असेल.
- १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत लोकसभा निवडणूक, ४ जूनला लागणार निकाल…
- *४० वेळा भारतातले मतदार EVM विरोधात न्यायालयात गेले तरीही प्रत्येक वेळेस त्यांच्या विरोधात न्यायालयाने निकाल दिला आता कोणी न्यायालयात गेले तर कोर्ट त्यांना काही शुल्क आकारण्याच्या मनस्थितीत असल्याचे निवडणूक आयुक्त यांनी स्पष्ट केले*
भारतात यंदा ९६ कोटी ८० लाख मतदार आहेत. १९ कोटी ७४ लाख तरुण मतदार आहेत. या तरुणांच्या मतांचा खूप मोठा वाटा या निवडणुकीत असणार आहे. ८२ लाख मतदार असे आहेत जे आमचे प्राऊड मतदार आहेत अशीही घोषणा राजीव कुमार यांनी केली आहे.सगळ्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर आम्ही आता निवडणूक आयोग म्हणून लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतो आहोत. मागच्या वर्षभरात ११ निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुका राज्यांच्या होत्या.८५ वर्षापेक्षा जास्त असेल, दिव्यांगांमध्ये ज्यांची श्रेणी ४० टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि त्यांनी फॉर्म १२ डी च्या माध्यामातून नोंदणी केली तर घरी जाऊन त्यांचे मतदान घेतले जाईल असं राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं आहे.२ लाख उमेदवार असे आहेत ज्यांचे वय १०० जास्त आहेत. आमच्याकडे यादीत १८ हजार तृतीय पंथी आहेत. अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे. व्दिष्ट नागरिक जेव्हा लोकसभा निवडणुकीसाठी तेव्हा व्हिल चेलची आणि अटेंन्डची व्यवस्था असेल. आम्ही अशा नागरिकांची मतं चांगल्या स्थितीत घ्यायला तयार आहोत. मात्र जर या मतदान केंद्रावर असेल तर आम्ही तयारी केली आहे.कुठे पैसे किंवा भेटवस्तू वाटल्या जात आहेत याची तक्रार सी-व्हिजिल ॲपमध्ये कोणाला करायची असल्यास फक्त एक फोटो घ्या आणि आम्हाला पाठवा. तुम्ही कुठे उभे आहात ते आम्हाला कळेल. 100 मिनिटांत त्यांची टीम पाठवून तक्रारीचे निराकरण करेल.मतदाराला त्याच्या मोबाइल क्रमांकावरून माहिती मिळू शकते. Know your candidate द्वारे मतदार त्यांच्या उमेदवाराबद्दल देखील पाहू शकतात. गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या कोणालाही वर्तमानपत्र आणि टीव्हीवर 3 वेळा माहिती द्यावी लागेल. दुसरा उमेदवार का मिळाला नाही, याचा खुलासा राजकीय पक्षाला करावा लागेल.