नगरविकास खात्यासारखे भुक्कड खाते पाहिले नाही. मुख्यमंत्र्यांकडील खात्यावर गडकरींची टिका

Date:

 

पुणे-“शहराचे नियोजन करण्यासाठी २० वर्षे लावणारे नगर विकास खाते हे ‘होपलेस’ असून अशी ‘भुक्कड’ संस्था मी अद्याप पाहिली नाही”, अशा शब्दांत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नगर विकास खात्यावर सडकून टीका केली. दरम्यान, त्यांनी सिंगापूरच्या धर्तीवर नगर विकासाचे नियोजन व्हायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली. विशेष म्हणजे राज्याचे नगरविकास खाते हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे.
शहरातील पश्चिम प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणा-या चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात येणा-या उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, खासदार अनिल शिरोळे, शिवाजीराव आढळराव पाटील, श्रीरंग बारणे, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, बाळा भेगडे, विजय शिवतरे, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह सर्व आमदार, खासदार आणि महापालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गडकरी पुढे म्हणाले की, पैसा ही समस्या नाही अधिकारी काम करत नाहीत ही समस्या आहे. डंडा घेऊन मागे लागल्याशिवाय अधिकारी काम करत नाहीत, अशी मिश्कील टीकाही गडकरी यांनी अधिका-यांच्या कारभारावर केली. तसेच मुळा-मुठा नदीत काम करायला सरकारने एनओसी द्यावी जलमार्ग, ड्राय पोर्ट बांधून वाहतूक सुरू करू त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक कमी होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर पुणे सातारा रस्ता रुंदीकरणाचे रखडलेले काम हा काळा डाग आहे. समस्या आहेत त्या सोडवून  6 महिन्यात काम पूर्ण करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. पुण्याची मेट्रो नागपूरपेक्षा चांगली होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

ते पुढे म्हणाले,वाहतूक समस्येबाबत पुणे ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. त्याच्या जोडीला प्रदूषणाची मोठी समस्या पुण्याला भेडसावत आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची देशात 22 टक्यांनी वाढ झाली आहे पुण्यात यापेक्षाही अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे पुण्याला पब्लिक ट्रान्स्पोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी शिवाय पर्याय नाही, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. गडकरी म्हणाले, देशातील दहा नद्यांचे जलमार्गात रुपांतर करण्यात येत असून लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन केले जाईल. त्या धर्तीवर पुण्यातही मुळा-मुठा जलमार्ग विकसित झाल्यास शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होईल. तसेच पुणे, सांगली, कोल्हापूर येथे ड्रायपोर्ट बांधण्यास राज्य शासनाने जागा उपलब्ध करून द्यावी. पाटस ते बारामती आणि बारामती ते इंदापूर पालखी मार्गाचा डीपीआर तयार झाला असून लवकरच त्या कामास प्रारंभ होईल. नागपूरपेक्षाही चांगली मेट्रो पुण्यात निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शरद पवार म्हणाले, रस्ते हे विकासाचे साधन असते. सुलभ आणि मर्यादित वेळेत दळणवळणाचे साधन उपलब्ध असणे परिसराच्या विकासासाठी आवश्यक आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून रेंगाळलेल्या अनेक प्रकल्पांना गती मिळाल्याचा आनंद आहे.

पालकमंत्री बापट म्हणाले, पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यातील रस्ते विकासांच्या कामासाठी तब्बल 15 हजार 139 कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. चांदनी चौक येथे बांधण्यात येणाऱ्या पुलाद्वारे नागरिकांच्या वेळेची बचत होणार आहे.  नियोजित वेळेत पुलाचे काम पुर्ण  करण्यास प्रयत्नशील असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मेट्रोचे काम सुरु झाल्याने आनंद व्यक्त केला.  जिल्ह्यातील विविध पालखी मार्ग लवकरच पुर्ण होईल असे त्यांनी सांगितले.

महसुल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, चांदणी चौकातील पुलामुळे वाहतुकीला सोपेपणा येईल व सौंदर्यात वाढ होईल. सध्या राज्यात 1 लाख 6 हजार कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरु आहेत. रस्त्यांचा सर्व  नागरिकांना  उपयोग होईल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी डि.ओ.तावडे यांनी तर आभार राजीव सिंह यांनी मानले.

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय मार्गासह पुणे-पौड रस्ता आणि कोथरूड-बावधनकडे जाणाऱ्या रस्त्यांमुळे चांदणी चौकात कायम वाहतूक कोंडी होते. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे या भागातील अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी आणि अपघात रोखण्यासाठी हा उड्डाणपूल प्रस्तावित करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने हा उड्डाणपूल उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे ४१९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. चांदणी चौकातून मुंबई, मुळशी, सातारा, कोथरूड, बावधन आणि एनडीएकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या दृष्टीकोनातून या उड्डाणपूलाची रचना करण्यात आली असून पाषाण-बावधन ते कोथरूड मार्गासाठी दोन उपमार्ग बांधण्यात येणार आहेत. नियोजित उड्डाणपूलासाठी तब्बल सत्तावीस हेक्टरची जागा आवश्यक असून त्यापैकी साडेबारा हेक्टर जागेचे संपादन महापालिकेतर्फे केले जाणार आहे. त्यामध्ये खासगी जागा, वनविभाग, महापालिका आणि संरक्षण विभागाच्या जागेचा समावेश आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...