ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

Date:

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन जाधव अटकेत, १.३४ कोटी रुपये गोठवण्यात पोलिसांना यश

पुणे : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत पुण्यातील ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केल्याच्या प्रकरणातील फरार आरोपी रोहन रामेश्वर जाधव याला पुणे शहर सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आरोपींनी स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवत ज्येष्ठ नागरिकाला अटक होण्याची तसेच कुटुंबीयांवर कारवाई होण्याची भीती दाखविल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २३ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत आरोपींनी तक्रारदाराच्या आधारकार्डच्या आधारे त्यांच्या नावाने कॅनरा बँकेत बनावट खाते उघडल्याचे सांगून त्यांना भीतीच्या वातावरणात ठेवले. संबंधित खात्यावर २४ नागरिकांच्या फसवणुकीच्या तक्रारी असल्याचे सांगत “तुम्हालाही आणि तुमच्या कुटुंबीयांनाही अटक होऊ शकते,” अशी भीती निर्माण करण्यात आली.

यानंतर स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून तक्रारदाराला त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यास भाग पाडल्याचा पोलिसांचा आरोप आहे. अशाप्रकारे तक्रारदाराकडून एकूण ₹१०,७४,६५,००० वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळते करून घेण्यात आल्याचे तपासात समोर आले.

आधीच तीन आरोपी अटकेत

तपासादरम्यान तक्रारदाराने ३० जानेवारी रोजी एका खात्यावर पाठवलेल्या ७५ लाख रुपयांच्या व्यवहाराचा माग काढण्यात आला. त्यातून पुढे बँक ऑफ महाराष्ट्रातील तीन वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे गेल्याचे निष्पन्न झाले. सीसीटीव्ही फुटेज व सायबर क्राइम पोर्टलवरील माहितीच्या आधारे हर्षद सुभाष धनतोळे, समर्थ सुरेश देशमुख आणि अमर अतरंगी यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती.

तपासात दिल्लीतील प्रणव करणसिंग आर्या याचाही सहभाग उघड झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याचबरोबर आरोपी रोहन जाधव हा या साखळीतील प्रमुख साथीदारांपैकी एक असल्याचे समोर आले. आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यांशी संबंधित २९ सायबर गुन्हे किंवा NCRP तक्रारी उघडकीस आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

रोहन जाधव पिंपळे गुरवमधून अटकेत

फरार आरोपीच्या बँक व्यवहारांचा, आर्थिक देवाणघेवाणीचा आणि इतर आरोपींसोबत असलेल्या संपर्काचा तपास करत पोलिसांनी रोहन रामेश्वर जाधव याचा शोध घेतला. त्याला पिंपळे गुरव परिसरातून अटक करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार तो मूळ छत्रपती संभाजीनगर येथील असून काही काळापासून पुण्यात राहत होता आणि सोशल मीडियावर रिलस्टार म्हणूनही काम करत होता.

१.३४ कोटी रुपये गोठवले

या गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत १ कोटी ३४ लाख रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच तक्रारदाराची रक्कम देशभरातील तब्बल ५,४३६ बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलिस आयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते आणि आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करीत आहेत.

सायबर पोलिसांनी नागरिकांना सीबीआय, ईडी, पोलिस किंवा अन्य सरकारी संस्थेचे अधिकारी असल्याचे सांगून व्हिडिओ कॉल, फोन किंवा मेसेजद्वारे पैशांची मागणी करणाऱ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. अशा प्रकारची फसवणूक झाल्यास तातडीने राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा किंवा अधिकृत सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे पोलिसांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...

ई-२० इंधनाच्या परिणामांविरोधात गुडलक चौकात युवक काँग्रेसचे अनोखे ‘श्राद्ध’ आंदोलन

पुणे | १२ ऑगस्ट २०२६ ई-२० इंधनामुळे वाहनांच्या सुट्या भागांवर...