सिंहगड रोड परिसरातून दोघांना ताब्यात; पुढील कारवाईसाठी पर्वती पोलिसांच्या स्वाधीन
पुणे : वाहन तोडफोड प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींना पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ ने सिंहगड रोड परिसरातून ताब्यात घेतले. ही कारवाई १२ ऑगस्ट रोजी करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नितीन रमेश उदगिरे (वय २५, रा. पद्मावती, पुणे) आणि अनिकेत सुरेश गायकवाड (वय ३०, रा. भन्साळी कॉम्प्लेक्स, सिंहगड रोड, पुणे) हे वाहन तोडफोडीनंतर फरार होते.
गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस अंमलदार कुंदन शिंदे, महेश मंडलिक आणि संदीप शिर्के यांना दोन्ही आरोपी सिंहगड रोड परिसरात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरात शोध घेऊन दोघांनाही ताब्यात घेतले.
दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पर्वती पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलिस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश सांखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, महिला पोलीस उपनिरीक्षक तेजश्री पवार, पोलीस उप निरीक्षक ज्ञानेश्वर दळवी पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, महेश मंडलिक, संदिप शिर्के, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, नागानाथ राख, सर्जेराव सरगर, विजयकुमार पवार, साधना ताम्हाणे, विदया शिंदे, आशिष यादव, शंकर कुंभार, योगेश मांढरे, ओमकार कुंभार, शिवानंद कायगुडे विनायक वगारे यांनी केली आहे.

