पुणे – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आर के लक्ष्मण, शि. द. फडणीस, वसंत सरवटे यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक
गाजलेल्या व्यंगचित्रकारांनी रेखाटलेल्या व्यंगचित्र व हास्यचित्रांचे प्रदर्शनातून जुन्या राजकीय घडामोडींना “हस-या
मैफली”ने आज उजाळा दिला. पुणे फेस्टिव्हलमध्ये या दिग्गज व्यंगचित्रकारांच्या हास्य व व्यंगचित्रांची बालगंधर्व
रंगमंदीरच्या कलादालनात भरलेली ही मैफल केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजमंत्री नितीन गडकरी आणि सिक्कीमचे
राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी आज दीपव्रज्वलन करून रसिकांसाठी खुली करताच व्यंगचित्र व हास्यचित्रांचाही
मनमुराद आनंद घेतला. ही हासरी मैफल पुढील दोन दिवस (सोमवार आणि मंगळवारी) सकाळी ११ ते रात्री ८
वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुली रहाणार आहे. यावेळी पुण्यातील अनेक नामवंत हास्य व व्यंगचित्रकार, आणि
नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस होते. यावेळी पुणे
फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे, सासवड माळेगाव शुगर फॅक्टरीचे व्यवस्थापकीय संचालक रंजन गिरमे,
कोहिनूर ग्रूपचे कृष्णकुमार गोयल उपस्थित होते. साहित्य वेध प्रतिष्ठानचे अध्यक्ष कैलास भिंगारे यांनी अशा
महाराष्ट्रातील नामवंत व्यंगचित्रकारांची सुमारे १२०० व्यंगचित्र व हास्यचित्रांचे हे प्रदर्शन आयोजित केले आहे.
सोमवारी आर. के. लक्ष्मण यांच्या मालगुडी डेज आणि यू सेड इट या मालिकेतील चित्रे बघण्याची संधी मिळणार आहे.
व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कौतुक करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सबनीस म्हणाले,
बाळासाहेब मोठे व्यंग व हास्यचित्रकार होतेच. पण पुढे जाऊन त्यांनी राजकीय पक्ष स्थापन करून तो कधी सत्तेत तर
कधी विरोधी पक्ष करण्यापर्यंत नेला. ही किमया देशात फक्त त्यांनाच साधता आली कारण ते व्यंगचित्रकार होते.
देशातील राजकीय व्यवस्था दुरूस्त करण्यासाठी, सांस्कृतिक विकृतीवर मात करण्यासाठी व्यंगचित्रकार व हास्य
चित्रकरांनीच आता पुढे येण्याची गरज आहे. या हस-या मैफलीत सुमारे ४०० व्यंगचित्र व हास्यचित्र लावण्यात आलेली
असून ती रोज बदलती रहाणार आहेत.
त्यात राजकारणाबरोबरच समाजकारण आणि सामाजिक समस्यांवरील व्यंग व हास्यचित्रांचा समावेश केला जाणार
आहे. त्यामुळे रसिकांना रोज नविन चित्रे बघून जुन्या आठवणींना उजाळा देतानाच विरंगुळाही अनुभवता येईल. हास-
यामैफलीत आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, वसंत सरवटे, शि. द. फडणीस, मनोहर सप्रे, विकास सबनीस अशा
दिग्गज व्यंग – हास्य चित्रकारांसह नव्या दमाच्या संजय मिस्त्री, प्रभाकर झळके, संजय मोरे, सतीश उपाध्ये, उमेश
पाटोळे, उमेश वाघ व्यंग – हास्य चित्रकांच्या चित्रांचा समावेश आहे.
पुणे फेस्टीव्हलमध्ये भरलेल्या “हसरी मैफल”चे नितीन गडकरी यांच्या हस्ते उदघाटन
Date: