बिबवेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या भूखंडावरील आरक्षण रद्द करण्यासाठी पुणे महापालिकेला प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारांचे आदेश

Date:

मुंबई दि.१९ : - पुणे जिल्हा परिषदेची निवासस्थाने बांधण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या बिबवेवाडी येथील जागेवरील आरक्षण रद्द करणे आवश्यक आहे. हे आरक्षण रद्द करण्यासंदर्भात महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७(१) खाली पुणे महानगरपालिकेने प्रक्रिया करून नगर विकास विभागाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा,असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.पुण्यातील बिबवेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या भूखंडांवरील आरक्षण रद्द करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथिगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम (दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे), उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील , नगरविकास विभागाच्या सहसचिव सुलेखा वैजापूरकर आदि मान्यवर उपस्थित होते.

कोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळा

जमीन हस्तांतरित करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे परिवहन विभागाला निर्देश

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे मंजूर असलेल्या, मात्र जागेअभावी प्रलंबित राहिलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न अखेर सुटला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष बैठकीत यावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.​कोरेगाव भीमा येथील ६४ आर जमीन उपलब्ध असून, जागेच्या नियोजनाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या. परिवहन विभागाने रस्त्याच्या कडेला व्यावसायिक कारणासाठी आवश्यक असलेली जागा विकसित करावी आणि उर्वरित उपलब्ध जागा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीसाठी जिल्हा परिषदेकडे तात्काळ हस्तांतरित करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले.

​या निर्णयामुळे गेल्या काही काळापासून जागेअभावी रखडलेले प्राथमिक आरोग्य केंद्र प्रत्यक्ष सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला असून, कोरेगाव भीमा व परिसरातील नागरिकांना लवकरच उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या बैठकीस आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर,पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी,जिल्हा परिषद सदस्य मोनिका हरगुडे,उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे),पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कॉमेडी, सस्पेन्स ते कौटुंबिक कथा; ‘या’ महिन्यात ओटीटीवर पाहा ट्रेंडिंग मराठी कंटेंट!

मुंबई :- मराठी सिनेमाची खरी ताकद त्यांच्या कथेत आहे. वेगवेगळे...

राहुल गांधींच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ला अखेर पोलिसांची परवानगी; 30 कठोर अटी

ड्रोन शूटिंगला पूर्ण बंदी; ‘डी-झोन’मध्ये बॅरिकेडिंग, महिला सुरक्षा आणि...