कॉमेडी, सस्पेन्स ते कौटुंबिक कथा; ‘या’ महिन्यात ओटीटीवर पाहा ट्रेंडिंग मराठी कंटेंट!

Date:

मुंबई :- मराठी सिनेमाची खरी ताकद त्यांच्या कथेत आहे. वेगवेगळे विषय, लक्षवेधी कथानकं आणि दमदार अभिनयामुळे मराठी कंटेंटने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता जुने आणि नवे मराठी चित्रपट तसेच वेबसीरिज अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर एकाच ठिकाणी पाहता येतील. यातील काही कलाकृती कदाचित तुम्ही याआधी पाहिल्या नसतील. त्यामुळे या ऑगस्टमध्ये कॉमेडी, सस्पेन्स, कौटुंबिक नाती आणि भावनिक कथांचा खास अनुभव ओटीटीवर घेता येणार आहे. या यादीत कोणते चित्रपट आणि वेबसीरिज आहेत, जाणून घेऊया…

नुकताच अल्ट्रा झकासवर स्ट्रीम झालेला ‘बाई ग’ हा चित्रपट धनुषच्या (स्वप्नील जोशी) आयुष्याभोवती फिरतो.जो वैवाहिक आयुष्यातील अडचणींमुळे आपल्या निर्णयांचा विचार करत असताना त्याच्या मागील पाच जन्मांतील पत्नी वर्तमान आयुष्यात परत येतात. प्रार्थना बेहरे तुम्हाला या चित्रपटात  महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. भूतकाळातील नाती आणि वर्तमानातील परिस्थिती यांची सांगड या कथेत पाहायला मिळते.

अल्ट्रा झकास ओरिजिनल वेब सिरीज ‘सौभाग्यवती सरपंच २’मध्ये अवलीची (देविका दफ्तरदार) गावातील राजकीय आणि सामाजिक लढाई पुढे सुरू राहते. नाना हा नवा प्रतिस्पर्धी तिच्यासमोर आव्हान उभं करतो. त्याचवेळी गावातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारीही अवलीसमोर आहे.

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’मध्ये रतन (अशोक सराफ), चंदन (भरत जाधव) आणि मदन (मकरंद अनासपुरे) या तीन भावांची गॅरेजमधील गोष्ट दाखवण्यात आली पाहिजे. त्या तिघांनीही लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला असतो. मात्र, त्यांच्या आयुष्यात एका महिलेचा प्रवेश झाल्यानंतर त्यांच्या निर्णयाला वेगळं वळण मिळतं आणि त्यातून गैरसमज तसेच विनोदी प्रसंग निर्माण होतात.

‘भागुबाई’ चित्रपटामध्ये निर्मिती सावंत यांनी साकारलेली व्यक्तिरेखा गावातील घडामोडी आणि गुपितांभोवती फिरते. माहिती मिळवण्याची आणि ती इतरांपर्यंत पोहोचवण्याची तिची सवय गावातील नातेसंबंध आणि समीकरणांवर परिणाम घडवते. सत्य, हेतू आणि सामाजिक संबंधांचा वेध या कथेत घेतला आहे.

अल्ट्रा झकास ओरिजिनल वेब सिरीज ‘८ वाजून १३ मिनिटे’ ही सुनील बर्वे यांनी साकारलेल्या बँक मॅनेजरच्या आयुष्याभोवती फिरणारी सस्पेन्स-थ्रिलर वेबसीरिज आहे. निवृत्तीनंतर शांत आयुष्य जगण्याची त्यांची योजना एका अनपेक्षित घटनेमुळे बदलते. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घेतलेले निर्णय, गुन्हा आणि कुटुंबाची सुरक्षितता यांच्यातील संघर्ष या कथेत पाहायला मिळतो.

‘नशीब – किस्मत’मध्ये एका छोट्या गावातील तीन बेरोजगार अभियंत्यांच्या आयुष्याला चोरीच्या एका प्रकरणामुळे अनपेक्षित वळण मिळतं. पैशांच्या गरजेतून सुरू झालेली त्यांची धावपळ त्यांना अशा परिस्थितीत घेऊन जाते, जिथे त्यांना आपल्या निर्णयांचे परिणाम भोगावे लागतात.

‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही मालिका ९०च्या दशकाच्या उत्तरार्धातील पारगाव गावातील पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख भूमिकेतील या कथेत पारंपरिक कामकाजाच्या पद्धती आणि बदलत्या डिजिटल युगातील संघर्ष दाखवण्यात आला आहे.

‘मारुती नगर पोलीस स्टेशन’मध्ये चार मित्र आपल्या मित्राच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याला आणि कुख्यात गुंडाला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतात. मात्र, त्यांच्या योजनेआधीच तिसरी व्यक्ती हे काम पूर्ण करते आणि त्यानंतर कथेला अनपेक्षित वळण मिळतं.

‘वडापाव’ या चित्रपटाची गोड कुटुंबाची तिखट लव्ह स्टोरी’ ही लंडनमध्ये राहणाऱ्या जयदेव देशमुख (प्रसाद ओक) आणि त्यांच्या कुटुंबाची कथा आहे. ‘वडापाव’ रेस्टॉरंट चालवणाऱ्या जयदेवसमोर व्यवसायासोबतच कुटुंबातील नाती आणि मूल्यं जपण्याची आव्हाने उभी राहतात.

‘ज्ञानेश्वर माऊली’ ही मालिका संत ज्ञानेश्वर यांच्या जीवनावर आणि शिकवणीवर आधारित आहे. वरुण भागवत यांनी संत ज्ञानेश्वरांची भूमिका साकारली असून, त्यांच्या बालपणापासून वयाच्या २१व्या वर्षी घेतलेल्या समाधीपर्यंतचा प्रवास मालिकेत मांडण्यात आला आहे. त्यांच्या आध्यात्मिक प्रवासासोबतच त्यांच्या शिकवणीचाही कथेत समावेश आहे.

‘कैरी’ चित्रपटामध्ये सायली संजीव यांनी साकारलेली ग्रामीण महिला पतीसोबत शहरात राहायला येते. मात्र, तिचा पती अचानक बेपत्ता झाल्यानंतर त्याचा शोध घेताना तिला अनोळखी शहरी परिस्थितीचा सामना करावा लागतो. सिद्धार्थ जाधव आणि सुबोध भावे हे कलाकार सुद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

लवकरच‘रहस्यम’ आणि ‘असावमी’ या दोन नव्या वेबसीरिजचीही अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर भर पडणार आहे. रहस्य आणि सस्पेन्सने भरलेल्या या कथांमुळे प्रेक्षकांना मराठी मनोरंजनाचे आणखी नवे पर्याय पाहायला मिळणार आहेत.

हे सर्व चित्रपट आणि वेबसीरिज केवळ अल्ट्रा झकास या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींच्या पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ला अखेर पोलिसांची परवानगी; 30 कठोर अटी

ड्रोन शूटिंगला पूर्ण बंदी; ‘डी-झोन’मध्ये बॅरिकेडिंग, महिला सुरक्षा आणि...