दिल्लीतील EC विरोधी आंदोलन आणखी पेटले, BJDही मैदानात,रस्त्यावर ठिय्या; विरोधक राष्ट्रपतींची भेट घेणार, नऊहून अधिक FIR

Date:

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मंगळवारी आणखी व्यापक राजकीय स्वरूप आले. INDIA आघाडीच्या आंदोलनात नवीन पटनाईक यांच्या बिजू जनता दलानेही सहभाग घेतला. BJDचे नेते मानस मंगराज आणि सुलता देव यांनी आंदोलनात भाग घेतल्याने निवडणूक आयोगाविरोधातील विरोधकांच्या मोहिमेला आणखी एक पक्ष जोडला गेला आहे.

दुसरीकडे, राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव आणि इतर विरोधी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही मध्य दिल्लीतील आंदोलनाची तीव्रता कमी झालेली नाही. जंतरमंतर, संसद परिसर आणि निवडणूक आयोगाकडे जाणाऱ्या मार्गांवर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. विविध गटांकडून वारंवार मोर्चाचे प्रयत्न होत असल्याने दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत नऊहून अधिक FIR दाखल केल्याचे वृत्त आहे.

BJDची आंदोलनात एन्ट्री

आतापर्यंत INDIA आघाडीच्या बाहेर राहिलेल्या BJDने या आंदोलनात सहभाग घेतल्याने राजकीयदृष्ट्या महत्त्वाची घडामोड घडली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आणि SIR प्रक्रिया मागे घेण्याच्या मागण्यांसोबत BJDचे प्रतिनिधीही उभे राहिले.

राष्ट्रपतींकडे जाणार SIRचा मुद्दा

INDIA आघाडीचे नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन SIR प्रक्रियेबाबत आपले आक्षेप मांडणार आहेत. मतदार याद्यांतील नावांची वगळणी, पारदर्शकता आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत विरोधक राष्ट्रपतींकडे निवेदन देणार असल्याचे वृत्त आहे.

दिल्ली पोलिसांसमोर मोठे आव्हान

विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष, नागरी कार्यकर्ते आणि इतर गट वेगवेगळ्या दिशांनी मध्य दिल्लीतील प्रतिबंधित भागाकडे जाण्याचा प्रयत्न करत असल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवणे पोलिसांसाठी आव्हानात्मक बनले आहे. जंतरमंतरकडे जाणारे मार्ग बॅरिकेड्सने बंद करण्यात आले असून निमलष्करी दलासह मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.


Previous article
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

https://pockerstack.com/

Механика онлайн-казиноНедавно зашел на сайт https://pockerstack.com/, и там реально...

hungry wolf

Understanding the Odds in Sports BettingI always find it...

Найди своё идеальное казино

Как найти своё идеальное казиноКогда дело доходит до выбора...

gods of troy

Breaking Down the Mechanics of Gods of TroySo, I've...