पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे मैदानात; एकनाथ शिंदेंची घोषणा

Date:

AB फॉर्मही दिला; भाजपचे कौस्तुभ गावडे आधीच रिंगणात, महायुतीत उमेदवारीवरून पेच

पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील मतभेद उघड होताना दिसत आहेत. शिवसेनेकडून मंगेश चिवटे हेच अधिकृत उमेदवार असतील आणि त्यांना पक्षाचा AB फॉर्म देण्यात आला आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. दुसरीकडे भाजपने याच मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली असून त्यांनी अर्जही दाखल केला आहे. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीतील अंतर्गत पेच वाढला आहे.

दिल्ली दौऱ्यावर असलेल्या शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना चिवटे यांच्या उमेदवारीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. “मंगेश चिवटे यांना AB फॉर्म दिला आहे आणि ते निवडणूक लढणारच,” असे शिंदे यांनी सांगितले. महायुतीतील जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप-शिवसेना आमनेसामने

भाजपने पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. गावडे हे कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

त्याचवेळी शिवसेनेने मंगेश चिवटे यांच्यावर ठाम राहण्याचा निर्णय घेतल्याने या जागेवर महायुतीतील दोन घटक पक्षांचे उमेदवार समोरासमोर येण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

जागावाटपाचा निर्णय अद्याप बाकी

एकनाथ शिंदे यांनी या जागेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा झाल्याचे सांगितले. मात्र महायुतीच्या पातळीवर अंतिम निर्णय अजून झालेला नाही. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत या जागेबाबत तोडगा निघतो का, याकडे आता लक्ष लागले आहे.

दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपकडून डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून त्या जागेसाठी सचिन सानप यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांत महायुतीतील अंतर्गत स्पर्धा स्पष्ट झाली आहे.

शिंदे-मोदी भेटीत दुष्काळाचाही मुद्दा

दिल्लीतील भेटीत महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि केंद्राकडून अपेक्षित मदत याबाबतही चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. राज्यातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘एका दिवसात महाराष्ट्र बंद नाही केला तर नाव बदलेन’; जरांगे पाटीलांचा सरकारला थेट इशारा

पुण्यात MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट; अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी, आंदोलन...

“त्यासाठी कुणाचे पाय धरायला लागले तरी मी तयार आहे”; राज ठाकरेंनी MPSC आंदोलकांना दिला शब्द

पुणे:पुण्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अनियमित कारभाराविरोधात आणि पेपरफुटी प्रकरणांविरोधात...

लातूरच्या आदर्श कॅम्पस प्रकरणात कठोर कारवाई करा : डॉ. नीलम गोऱ्हे

पीडितेचे संरक्षण व तीन दिवसांत कार्यवाही अहवाल देण्याबाबत निवेदन लातूर,...

दुष्काळामुळे मराठवाड्यातून पुण्यात मोठे स्थलांतर होण्याची शक्यता

साखर कारखाने केवळ ६० दिवस सुरू राहिल्यास ऊसतोड कामगारांवर...