“त्यासाठी कुणाचे पाय धरायला लागले तरी मी तयार आहे”; राज ठाकरेंनी MPSC आंदोलकांना दिला शब्द

Date:

पुणे:पुण्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अनियमित कारभाराविरोधात आणि पेपरफुटी प्रकरणांविरोधात हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे.
स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे केंद्र असलेल्या पुण्यात मागील दिवसांपासून हजाराे विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.या ठिकाणी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भेट दिली.

यावेळी ते म्हणाले,’मी विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आलो आहे. ज्या-ज्या मार्गाने शक्य होईल, त्या-त्या मार्गाने तुमचा प्रश्न आपण सोडवला पाहिजे. महाराष्ट्राच्या मुला-मुलींना नोकरी मिळण्यासाठी कुणाचेही पाय धरायला लागले, तर राज ठाकरे ते पाय धरायला तयार आहे. परिस्थिती आणि वस्तुस्थिती समजून घ्या आणि मगच पुढचं आंदोलन सुरू ठेवा. लोक येतील, भाषणं करतील, नवी उमेद दाखवतील; पण परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. दबाव काय असतो, हे सरकारला कळलं पाहिजे. असा दबाव निर्माण करा. हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा बाळगतो.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आणि सरकारविरोधातील संताप

राज ठाकरे म्हणाले, “गेले अनेक दिवस तुम्ही आंदोलन करत आहात. काही जण उपोषणाला बसले आहेत. अनेक लोक येत आहेत आणि पाठिंबा देत असल्याचं सांगत आहेत. मी आज तुमच्या रागात सामील व्हायला आलो आहे. तुम्हाला राग आला आहे, हे मला माहिती आहे. सरकारी फसवणुकीमुळे आपल्या आयुष्याचा उमेदीचा काळ कसा जातो, हे माझ्यापेक्षा जास्त कुणी सांगू शकणार नाही. तुमच्याकडे पेपर फुटत आहेत, आमच्याकडे मतं फुटत आहेत. जसं तुमच्या आयुष्यातली वर्ष निघून जातात, तशी आमचीही जातात. संपूर्ण देशभर बेधुंदशाही सुरू आहे.”
जातीपातीच्या राजकारणात अडकू नका!

“रोज कुणीतरी येणार, इथे भाषण करणार, तुम्ही टाळ्या वाजवणार… याच्यामध्ये आयुष्य घालवू नका. माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. जे आयुष्य आहे ते हेच. निवडणुका झाल्यानंतर आमच्या लक्षात येतं की मतं चोरी झाली आहेत, मतपत्रिका पळविल्या आहेत. आमच्याकडे आयुष्यातली पाच-पाच वर्ष अशीच निघून जातात. तुमच्या वेदना मला कळत आहेत. जातीपातीच्या भानगडीत पडू नका, हे मी कधीपासून सांगत आहे. लोक तुम्हाला याच्यात अडकवतील, जेणेकरून रोजच्या विषयांकडे तुमचं लक्ष जाऊ नये. महाराष्ट्रात काय सुरू आहे, यातच वेळ गेला तर घरी जाऊन आई-वडिलांना काय तोंड दाखवणार? हा तुमचा राग कायम असणं गरजेचं आहे.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

लातूरच्या आदर्श कॅम्पस प्रकरणात कठोर कारवाई करा : डॉ. नीलम गोऱ्हे

पीडितेचे संरक्षण व तीन दिवसांत कार्यवाही अहवाल देण्याबाबत निवेदन लातूर,...

दुष्काळामुळे मराठवाड्यातून पुण्यात मोठे स्थलांतर होण्याची शक्यता

साखर कारखाने केवळ ६० दिवस सुरू राहिल्यास ऊसतोड कामगारांवर...