मार्केटयार्ड पोलिसांच्या गंभीर गुन्ह्यातील वर्षभरापासून फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

Date:

पुणे, दि. ६ : मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यात मागील एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने कोंढवा परिसरातून अटक केली. आकाश किशोर नवगिरे (वय २७, रा. कानज कोंढवा रोड, म्हसोबा मंदिराजवळ, गल्ली नं. १, टिळेकरनगर, कोंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, महेश मंडलिक आणि आशिष यादव हे गुन्हे शाखा युनिट-२च्या हद्दीत पाहिजे आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दाखल गु.र.नं. १८८/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आकाश नवगिरे हा कोंढवा परिसरात असल्याची माहिती पोलीस अंमलदार कुंदन शिंदे यांना मिळाली.मिळालेल्या माहितीची खातरजमा करून गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने कोंढवा परिसरात सापळा रचला. आकाश नवगिरे हा त्याच्या राहत्या घराजवळ असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.आकाश नवगिरे हा संबंधित गुन्ह्यात मागील एक वर्षापासून फरार होता. त्याला अटक करून पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, तसेच पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, महेश मंडलिक, ओंकार कुंभार, शंकर कुंभार, योगेश मांढरे, उज्ज्वल मोकाशी, विजय पवार, संदीप शिर्के, संतोष टकले, सर्जेराव सरगर, शिवानंद कायगुडे, विद्या शिंदे आणि आशिष यादव यांच्या पथकाने केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

राज्य शासनाकडून अभूतपूर्व निर्णय; बळीराजाला दिलासा विशेष निधीद्वारे शेतीसाठी अखंडित...

“पुणे बंदची भाषा खपवून घेणार नाही; महापौर नागपुरे-बिडकरांची तंबी”

‘विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकीय स्कोअर करू नका’; सभागृह नेते गणेश...

EC विरोधात विरोधकांचा मोर्चा रोखला; राहुल-प्रियांका, अखिलेश पोलिसांच्या ताब्यात

‘लोकशाही वाचवा’ मोर्चात 19 विरोधी पक्षांचे खासदार; ज्ञानेश कुमारांच्या...