पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून विशेष सत्कार!

Date:

पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना त्यांच्या उल्लेखनीय आणि कर्तव्यदक्ष सेवेबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मानाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या गौरवपूर्ण कामगिरीबद्दल पुणे शहरातील विविध क्षेत्रांतील प्रमुख लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने पोलीस आयुक्तांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. दरम्यान यावेळी उत्कृष्ट सेवेबद्दल सहपोलिस आयुक्त संजय दराडे यांचाही शिष्टमंडळाने विशेष सत्कार केला.

पुणे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून अमितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारी नियंत्रण, अवैध धंद्यांवरील धडक कारवाई आणि सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण या त्रिसूत्रीवर विशेष भर दिला आहे. त्यांच्या याच गतिमान आणि धाडसी कार्यपद्धतीमुळे पुणे शहर आणि पोलीस दलाचा लौकिक अत्यंत वाढल्याची भावना या सत्कार प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली.

या विशेष सत्कार प्रसंगी पुणे शहराचे माजी नगरसेवक अय्युब शेख, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शिवसेना नेते अजय भोसले, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य बाळासाहेब जानराव, रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे राहुल डंबाळे, शिवसेनेचे मिलिंद आहिरे तसेच सामाजिक कार्यकर्ते आबिद सय्यद आणि इतर सहकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

उपस्थित सर्व मान्यवरांनी आयुक्त अमितेश कुमार यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रीय महामार्गांवर जड वाहनांसाठी ‘रनवे/एस्केप रॅम्प’ उभारावेत – नगरसेवक रविंद्र साळेगावकर

अपघातप्रवण व तीव्र उताराच्या ठिकाणी सुविधा उभारण्याची केंद्रीय मंत्री...

‘नाफा’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुण्याचा डंका; ‘बटरस्कॉच’ला चार पुरस्कार

पुणे : नॉर्थ अमेरिकन असोसिएशन्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या...

हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदम

पिंपरी येथील हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या कामकाजाचा आढावा; उत्पादनक्षमता...