रस्त्याच्या कडेला फेकलेल्या बॅगेत नवजात बालिका; रिक्षाचालकाच्या सतर्कतेने वाचला जीव

Date:

आव्हाळवाडी-सातववस्ती परिसरातील घटना; पाच-सहा दिवसांच्या बालिकेवर ससून रुग्णालयात उपचार, दुचाकीस्वारांचा पोलिसांकडून शोध

पुणे : वाघोली परिसरातील आव्हाळवाडी-सातववस्ती येथे रस्त्याच्या कडेला फेकून दिलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेत अवघ्या पाच ते सहा दिवसांची नवजात बालिका आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बॅगेतून बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्यानंतर रिक्षाचालक आकाश कोळी यांनी तत्काळ बॅग उघडून बालिकेला बाहेर काढले. त्यानंतर तिला वाघोली पोलिसांच्या मदतीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

ही घटना २५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. आकाश कोळी हे मांजरी येथून प्रवासी घेऊन पुणे स्टेशनच्या दिशेने जात होते. आव्हाळवाडीतील सातववस्ती परिसरात त्यांच्या रिक्षाच्या पुढे दुचाकीवरून दोन व्यक्ती जात होत्या. या दोघांनी रस्त्याच्या कडेला काळ्या रंगाची बॅग फेकली आणि वेगाने निघून गेल्याचे कोळी यांच्या निदर्शनास आले.

संशय आल्याने त्यांनी रिक्षा थांबवून बॅगेजवळ जाऊन पाहिले. बॅगेतून बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. तसेच बॅगेच्या फटीतून बालिकेचा पाय दिसत होता. त्यांनी तातडीने बॅग उघडली असता आत कपड्यात गुंडाळलेली नवजात बालिका आढळून आली.

कोळी यांनी कोणताही विलंब न करता बालिकेला आपल्या रिक्षातून वाघोली पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तिला तत्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली बालिकेवर उपचार सुरू आहेत.

नवजात बालिकेला बॅगेत टाकून रस्त्याच्या कडेला सोडून देणाऱ्या व्यक्तींचा वाघोली पोलिसांकडून शोध सुरू आहे. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित दुचाकीस्वारांचा शोध घेतला जात आहे.

आकाश कोळी यांच्या तक्रारीवरून संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

ऑफिसमधून बाहेर पडताच दोघांचा हल्ला; दोन दिवसांपूर्वी खंडणी मागितल्याचा...

खडकी रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्ग उभारण्याची उपमहापौर परशुराम वाडेकर यांची मागणी

पुणे : खडकी रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या...

“गुन्हेगारांना फासावर लटकवल्याशिवाय शांत बसणार नाही” — उद्धव ठाकरे

प्रदीप ऊर्फ बाळू पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची ठाण्यात सांत्वनपर भेट;...