‘नाफा’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुण्याचा डंका; ‘बटरस्कॉच’ला चार पुरस्कार

Date:

पुणे : नॉर्थ अमेरिकन असोसिएशन्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नाफा’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुण्याच्या कलावंतांनी दमदार कामगिरी करत मराठी चित्रपटसृष्टीचा झेंडा अमेरिकेत फडकवला आहे. अमेरिकेत ८ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या या फेस्टिव्हलमध्ये ‘अथर्व खारकर फिल्म्स’ निर्मित आणि प्रफुल्ल खारकर दिग्दर्शित ‘बटरस्कॉच’ या शॉर्ट फिल्मने तब्बल चार पुरस्कार पटकावले.

देऊळ चित्रपटाचे निर्माते अभिजित घोलप यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘नाफा’ फिल्म फेस्टिव्हलचे यंदाचे तिसरे वर्ष होते. यावर्षीच्या शॉर्ट फिल्म कॅटेगरीमध्ये ‘बटरस्कॉच’ला बेस्ट शॉर्ट फिल्म (अमेरिका), बेस्ट डायरेक्टर, बेस्ट सिनेमॅटोग्राफर आणि बेस्ट एडिटर असे चार पुरस्कार मिळाले.

या चित्रपटाचे संकलन पुण्यातील तरुण संकलक अथश्री ठुबे यांनी केले आहे. फेस्टिव्हलमध्ये बेस्ट एडिटरचा पुरस्कार सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते अथश्री ठुबे यांना प्रदान करण्यात आला.

दहा वर्षांचा अनुभव; ‘ऑल इज वेल’पासून नेटफ्लिक्सपर्यंत काम

अथश्री ठुबे गेल्या १० ते १२ वर्षांपासून चित्रपट व दृक्-श्राव्य क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या कामाच्या प्रवासात ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटाचा समावेश आहे. तसेच नेटफ्लिक्सच्या ओरिजनल ‘ब्लू कोबाल्ट’ या चित्रपटासाठी त्यांनी ऑनलाइन एडिटर म्हणून काम पाहिले आहे.

याशिवाय त्यांनी अनेक डॉक्युमेंटरी आणि कॉर्पोरेट फिल्म्सचे संकलन केले आहे. ‘अभिमानास्पद महाराष्ट्र’ आणि ‘मीट द वर्ल्ड विथ एसकेएफ’ या त्यांच्या उल्लेखनीय डॉक्युमेंटरी आहेत.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय जाहिरातींचेही संकलन

आयसीआयसीआय बँक, लाईफ रिपब्लिक, इंदिरा युनिव्हर्सिटी आणि चितळे डेअरी यांसह विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवरील जाहिरातींचे एडिटिंग अथश्री ठुबे यांनी केले आहे.

व्हिज्युअल प्रमोशनमध्येही त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले असून ‘तेंडल्या’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनच्या कामाची विशेष चर्चा झाली होती.

तसेच अथश्री यांनी एडिट केलेल्या ‘सुतक’ आणि ‘लास्ट विश’ या शॉर्ट फिल्म्सनीही विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत मोठे काम करण्याचा मानस

कलाक्षेत्रात अथश्री ठुबे या जेन-झी पिढीचे प्रतिनिधित्व करत असून ‘बटरस्कॉच’साठी मिळालेल्या चार पुरस्कारांमुळे त्यांच्या पुढील कारकिर्दीला नवी दिशा आणि मोठा हुरूप मिळाला आहे. भविष्यात मराठी चित्रपट क्षेत्रात अधिक मोठे आणि दर्जेदार काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

पुण्यातील तरुण तंत्रज्ञाच्या कामाची अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर झालेली दखल ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी निश्चितच अभिमानाची बाब मानली जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रीय महामार्गांवर जड वाहनांसाठी ‘रनवे/एस्केप रॅम्प’ उभारावेत – नगरसेवक रविंद्र साळेगावकर

अपघातप्रवण व तीव्र उताराच्या ठिकाणी सुविधा उभारण्याची केंद्रीय मंत्री...

हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदम

पिंपरी येथील हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाच्या कामकाजाचा आढावा; उत्पादनक्षमता...

राहुल गांधींचा दौरा उधळून लावण्याचा दुष्यंत मोहोळ यांचा इशारा

सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे...