स्वारगेट–कात्रज मेट्रो:५.४६ किमी संपूर्ण भूमिगत मार्गावर पाच स्थानकांचे नियोजन:मार्केट यार्ड स्थानकाचे भूमिपूजन संपन्न

Date:

दृष्टिक्षेपात स्वारगेट–कात्रज मेट्रो मार्गिका : लांबी ५.४६ किलोमीटर, संपूर्ण भूमिगत मार्ग, स्वारगेट , मार्केट यार्ड–पद्मावती–कात्रज–बिबवेवाडी–बालाजीनगर अशी पाच प्रस्तावित स्थानके आणि मूळ मंजूर खर्च २,९५४.५३ कोटी रुपये.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, स्वारगेट–कात्रज मेट्रो मार्गिकेमुळे दक्षिण पुण्यातील दळणवळणाला मोठी गती मिळेल

पुणे : स्वारगेट–कात्रज मेट्रो मार्गिकेमुळे दक्षिण पुण्यातील दळणवळणाला मोठी गती मिळणार असून नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होईल, असा विश्वास नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला.

महामेट्रोच्या स्वारगेट–कात्रज मेट्रो प्रकल्पातील मार्केट यार्ड स्थानकाचे भूमिपूजन सोमवारी माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. दक्षिण पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीवरील ताण लक्षात घेता ही मार्गिका नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मिसाळ म्हणाल्या, “पुण्याच्या विकासाला गती देणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून आधुनिक आणि सक्षम पुण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले आहे. दक्षिण पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता हा मेट्रो मार्ग नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.”

पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या विद्यमान मेट्रो मार्गाचा स्वारगेट ते कात्रज हा ५.४६ किलोमीटरचा विस्तार संपूर्णपणे भूमिगत असणार आहे. मूळ मंजूर आराखड्यात मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज या तीन स्थानकांचा समावेश करण्यात आला होता. मात्र प्रवाशांची सोय आणि परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन बिबवेवाडी आणि बालाजीनगर ही आणखी दोन स्थानके प्रस्तावित करण्यात आली आहेत.

त्यामुळे स्वारगेट–कात्रज भूमिगत मार्गावर एकूण पाच स्थानकांचे नियोजन करण्यात आले आहे. स्वारगेट येथे हा विस्तार विद्यमान मेट्रो मार्गाशी जोडला जाणार असल्याने कात्रज, बिबवेवाडी, पद्मावती, मार्केट यार्ड आणि दक्षिण पुण्यातील नागरिकांना शहराच्या इतर भागांपर्यंत थेट मेट्रो प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

केंद्र सरकारने स्वारगेट–कात्रज मेट्रो विस्तार प्रकल्पासाठी २ हजार ९५४ कोटी ५३ लाख रुपयांच्या खर्चाला मूळ मान्यता दिली आहे.

भूमिपूजन कार्यक्रमाला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक (कार्य) अतुल गाडगीळ, नगरसेविका स्मिता वस्ते, मानसी देशपांडे, वर्षा साठे, तन्वी दिवेकर, सिद्धी शिळीमकर, सई थोपटे, प्रियांका शेंडगे-शिंदे, तसेच नगरसेवक महेश वाबळे, राजेंद्र शिळीमकर, बाळासाहेब ओसवाल आणि रघुनाथ गौडा उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हडपसरमध्ये रिक्षात विसरलेली बॅग अवघ्या १५ मिनिटांत मालकाच्या हाती

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जनार्धन भागवत यांच्या तत्परतेमुळे मोबाईल, महत्त्वाची...

खेड-आळंदी मतदारसंघातील विकासकामांसाठी आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या स्थानिक आमदार निधीतून ६० लाख रुपये

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते निधी मंजुरीच्या पत्राचे वितरण पुणे...

नवीन समाविष्ट गावांतील रस्ते, ड्रेनेजची कामे तातडीने करा; महापौर मंजुषा नागपुरेंच्या प्रशासनाला सूचना

म्हाळुंगेसह सर्व समाविष्ट गावांचे स्थळनिहाय सर्वेक्षण करण्याचे निर्देश; तात्पुरत्या...

नवले ब्रिज परिसरात तरुणीचा मोबाईल हिसकावणारा जेरबंद; सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध; चोरीचा...