खेड-आळंदी मतदारसंघातील विकासकामांसाठी आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या स्थानिक आमदार निधीतून ६० लाख रुपये

Date:

  • उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते निधी मंजुरीच्या पत्राचे वितरण

पुणे – खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी शिवसेना नेत्या, विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सन २०२६-२७ च्या स्थानिक आमदार निधीतून एकूण ६० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या निधी संदर्भातील पत्राचे वितरण राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान नारायण पोखरकर यांनी केलेल्या विनंतीनुसार आ. डॉ. गोऱ्हे यांनी खेड-आळंदी मतदारसंघातील कामांसाठी निधी मागितला होता. यात नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि स्थानिक विकासाच्या दृष्टीने सहा कामांसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली आहे.यामध्ये धुवोली येथे महिला अस्मिता भवन, सांडभोरवाडी (तिन्हेवाडी) येथे महिला अस्मिता भवन, वाळद (कोयाळकर) येथे सभामंडप, रोहकल येथे महिला अस्मिता भवन, आंबोली येथील गायमाळवाडी येथे सभामंडप तसेच गोणवडी येथे सभामंडप उभारण्याच्या कामांचा समावेश आहे.या सहा विकासकामांसाठी प्रत्येकी १० लाख रुपये याप्रमाणे एकूण ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, आवश्यक प्रशासकीय मान्यता घेऊन कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना आ. डॉ. गोऱ्हे यांनी केल्या आहेत.यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख विकास रेपाळे, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, अतुल देशमुख, श्रद्धा सांडभोर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

स्वारगेट–कात्रज मेट्रो:५.४६ किमी संपूर्ण भूमिगत मार्गावर पाच स्थानकांचे नियोजन:मार्केट यार्ड स्थानकाचे भूमिपूजन संपन्न

दृष्टिक्षेपात स्वारगेट–कात्रज मेट्रो मार्गिका : लांबी ५.४६ किलोमीटर, संपूर्ण...

नवीन समाविष्ट गावांतील रस्ते, ड्रेनेजची कामे तातडीने करा; महापौर मंजुषा नागपुरेंच्या प्रशासनाला सूचना

म्हाळुंगेसह सर्व समाविष्ट गावांचे स्थळनिहाय सर्वेक्षण करण्याचे निर्देश; तात्पुरत्या...

नवले ब्रिज परिसरात तरुणीचा मोबाईल हिसकावणारा जेरबंद; सिंहगड रोड पोलिसांची कारवाई

सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध; चोरीचा...

परिस्थिती कोणतीही असो, विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत:सहपोलीस आयुक्त संजय दराडे

अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे सुमारे १ हजार गरजू...