दिल्लीत धरपकड सुरु तर मुंबईत तयारी … आज CJPचे आंदोलन;सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे विनापरवानगी ‘जेल भरो’ आंदोलन; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त..

Date:

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP) आज, २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलन करणार आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सायंकाळी ४ वाजता ‘जेल भरो’ आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली असून, मुंबई पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. CJPने SIR प्रक्रियेवर आक्षेप घेत मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. ज्ञानेश कुमार यांनी पदाचा राजीनामा द्यावा, SIR प्रक्रिया थांबवावी

आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेची चौकशी व्हावी, अशा प्रमुख मागण्या पक्षाने केल्या आहेत. दिपके यांनी यापूर्वी ज्ञानेश कुमार यांच्याविषयी अत्यंत कठोर शब्दांत टीका केली होती. हे आरोप CJPचे असून निवडणूक आयोगाने अशा आरोपांमध्ये राजकीय हेतू असल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगातील अंतर्गत मतभेदांच्या मुद्द्यामुळे हा वाद आणखी तीव्र झाला आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’च्या तपास वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी गेल्या दहा महिन्यांत किमान १४ वेळा काही निर्णयांवर लेखी आक्षेप नोंदवले होते. काही निर्णयांबाबत त्यांना पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.sSIR प्रक्रियेदरम्यान ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मसुदा मतदार याद्यांमधून १३ कोटींपेक्षा अधिक नावे कमी झाल्याचेही समोर आले आहे. या प्रक्रियेमुळे पात्र मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप विरोधक आणि CJPकडून केला जात आहे; निवडणूक आयोगाने मात्र SIR ही मतदार यादी अद्ययावत आणि शुद्ध करण्याची प्रक्रिया असल्याची भूमिका मांडली आहे. दिपके यांनी मुंबईतील आंदोलनानंतर गोवा, बंगळुरू, कोलकाता, रांची यांसह विविध शहरांत आंदोलन नेण्याची घोषणा केली आहे. ऑक्टोबरअखेरीस दिल्लीतील जंतर-मंतर येथे मोठे आंदोलन करण्याचा CJPचा कार्यक्रम आहे. मात्र ६ ऑक्टोबर रोजी विरोधी पक्षांच्या प्रस्तावित आंदोलनात CJP सहभागी होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतर परिसरातही SIRविरोधी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. विद्यार्थी संघटना आणि विविध राजकीय नेत्यांनी निवडणूक आयोगाविरोधात निदर्शनांचे आवाहन केले असून दिल्ली पोलिसांनी अनेक भागांत निर्बंध लागू केले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डेक्कन ते गांधी भवन दरम्यान शांती मार्च; तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग

‘गांधी विचार हा राष्ट्रीय एकात्मतेचा विचार’चा संदेश;अहिंसा, सामाजिक सलोख्याच्या...

अभिनव कला महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी प्रा. राहुल बोरावके यांची नियुक्ती

'ए.आय.च्या युगातही चित्रकारांच्या रेषांचे महत्व कायम' -प्रा. राहुल बोरावके पुणे-कला क्षेत्रात...

विधान परीषद पदवीधर निवडणूकीत असे करा मतदान

पुणे: भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीची मतदान...