गांधींना नव्या पिढीसमोर नेणे हेच मोठे आव्हानज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र; गांधी सप्ताहाचे गांधी भवनमध्ये उद्घाटन

Date:

पुणे- महात्मा गांधी यांनी देशाला चेतना देत अद्भुत लोकशक्ती उभी केली. मात्र, गांधींना नव्या पिढीसमोर नेणे हे आजचे मोठे आव्हान आहे. ‘जेन-झी’ पिढीला गांधी समजावून सांगायचे असतील, तर गांधीभक्तांनी गांधींवर चढवलेला शेंदूर खरडून बाजूला काढावा लागेल. गांधी म्हणजे केवळ सत्य आणि अहिंसा एवढ्यापुरते त्यांचे विचार मर्यादित नाहीत. सत्य, अहिंसा आणि त्यांच्या अन्य मूल्यांचा व्यापक अर्थ नव्या पिढीला समजून सांगण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार व लेखक अंबरीश मिश्र यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान कोथरूड येथील गांधी भवनमध्ये ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहाचे उद्घाटन अंबरीश मिश्र यांच्या ‘एक थेंब गांधी’ या व्याख्यानाने झाले. यावेळी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष व भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, विश्वस्त अन्वर राजन, लक्ष्मीकांत देशमुख, प्रवीण सप्तर्षी, ॲड. अभय छाजेड, डॉ. एम. एस. जाधव, रमेश आढाव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष विशाल तांबे, यशवंतराव मोहिते महाविद्यालय प्राचार्य प्रतिभा गायकवाड, युवक क्रांती दलाचे आप्पा अनारसे, प्रशांत कोठडिया, तेजस भालेराव, सूरज कुलकर्णी, सचिन चौहान, रवींद्र धनक, चंद्रकांत जाधव देखील उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सायली मनोहर यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून केली. त्यानंतर बौद्ध धर्माचे भंते सुदर्शन, ख्रिश्चन धर्माचे प्रदीप चांदेकर, हिंदू धर्माचे अभय देशपांडे, ज्यू धर्माचे योसेफ नोगावकार, मुस्लिम धर्माचे मौलाना इसाहक शेख, पारशी धर्माचे जमशेदजी कारकेरिया आणि शीख धर्माच्या पुनीत कौर यांनी सर्वधर्म प्रार्थना सादर केली.

मिश्र म्हणाले, गांधीवादी कार्यकर्त्यांविषयी माझ्या मनात मोठा आदर आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि डॉ. कुमार सप्तर्षी यांचे अतूट नाते होते. मुख्य प्रवाहाच्या विरोधातही गांधी भवन सातत्याने काम करत राहिले आहे. गांधी समजून घेणे अवघड आहे, कारण त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आपण पुरेसा अभ्यास आणि अनुभव घेतलेला नाही. गांधी हा माझ्यासाठी ‘यमन रागा’सारखा आहे. त्यांना सोडूनही देता येत नाही आणि त्यांची पाठ सोडून पुढेही जाता येत नाही. गांधी हा केवळ अभ्यासाचा नव्हे, तर अनुभूतीचा विषय आहे.

गांधी संन्यासी नव्हते. आयुष्यभर लोकांमध्ये राहून त्यांनी समाजाच्या अनेक पिढ्या घडवल्या. गांधींचे केवळ गुळगुळीत आणि सोयीचे रूप समाजासमोर मांडले गेले. त्यांना समजून घेण्यासाठी त्यांचे मूळ गुजराती साहित्य वाचणे आवश्यक आहे. लोकांचे गुण ओळखून त्यांना योग्य जबाबदारी देण्याची गांधींची पद्धत विलक्षण होती. सामान्य माणूस मनमोकळेपणाने त्यांच्याशी संवाद साधू शकत होता.

आज समाजात नागरिक आणि प्रजा यांच्यातील संघर्ष जाणवतो. नागरिक नियम पाळतो; मात्र सत्ताधाऱ्यांकडून मनमानी होत असल्याची भावना निर्माण होते. जात आणि धर्माच्या आधारावर सामाजिक वातावरण तापत राहिल्याने अस्थिरता निर्माण होत आहे. समाजातील विषमतेचे परिणाम अखेर राज्यकर्त्यांनाही भोगावे लागतात, असे मिश्र यांनी सांगितले.

गांधींचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवताना पारंपरिक चौकटींपेक्षा त्यांच्या विचारांचा गाभा समजावून सांगणे महत्त्वाचे आहे. जेन-झी पिढी पारंपरिक पद्धतीने वागत नाही. त्यामुळे गांधींच्या विचारांकडेही नव्या पद्धतीने पाहावे लागेल. विविध धर्मांच्या आचार-विचारांमध्ये समानतेचा दृष्टिकोन, राजकारणात सत्तेच्या वापरासाठी आवश्यक असलेली नैतिक नियमावली आणि वास्तववादी जीवनपद्धती यांसारख्या मुद्द्यांमधून गांधी नव्या पिढीला अधिक जवळचे वाटू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, गांधी सप्ताहाच्या माध्यमातून गांधी विचारांना पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न होत आहे. अंबरीश मिश्र यांचे लेखन विपुल आणि अभ्यासपूर्ण आहे. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी अनेक अडचणींवर मात करून गांधी विचारांचे काम पुढे नेले. आता हा विचार समाजापर्यंत सातत्याने पोहोचविण्याची जबाबदारी पुढील पिढीने स्वीकारण्याची गरज आहे.

अन्वर राजन यांनी प्रस्तावनेत सांगितले की, डॉ. कुमार सप्तर्षी यांनी गांधी भवनला मोठी ऊर्जा दिली. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गांधी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. गांधींच्या विचारांवर आधारित उपक्रम वर्षभर राबविले जातात.

कार्यक्रमाच्या अखेरीस ‘अल्लाह तेरो नाम, ईश्वर तेरो नाम’ हे गीत सादर करण्यात आले. सूत्रसंचालन सूरज कुलकर्णी यांनी केले, तर रमेश आढाव यांनी आभार मानले.

खादीपासून पुस्तकांपर्यंत प्रदर्शन

गांधी सप्ताहानिमित्त गांधी भवन येथे खादी, पुस्तके, हातमाग तसेच विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. हे प्रदर्शन १ ते ७ ऑक्टोबरदरम्यान दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विधान परीषद पदवीधर निवडणूकीत असे करा मतदान

पुणे: भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीची मतदान...

अभिनव कला महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी प्रा. राहुल बोरावके यांची नियुक्ती

ए.आय.च्या युगातही चित्रकारांच्या रेषांचे महत्व कायम' -प्रा. राहुल बोरावके पुणे-कला क्षेत्रात...

SIR विरोधात आज दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन; ११ मेट्रो स्थानकांचे प्रवेश-निर्गम बंद

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत कडक सुरक्षा, तर...