अभिनव कला महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी प्रा. राहुल बोरावके यांची नियुक्ती

Date:

ए.आय.च्या युगातही चित्रकारांच्या रेषांचे महत्व कायम’ -प्रा. राहुल बोरावके

पुणे-कला क्षेत्रात मानाचे समजल्या जाणाऱ्या भारतीय कला प्रसारिणी सभा न्यासाकडून चालविल्या जाणाऱ्या पुण्यातील अभिनव कला महाविद्यालय टिळक पथच्या प्राचार्य पदी प्रा. राहुल बोरावके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी पासून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्राचार्य पदाच्या नियुक्तीचे पत्र संस्थेचे सचिव पुष्कराज भालचंद्र पाठक यांनी त्यांना दिले. प्रा. राहुल अशोकराव बोरावके यांनी A.T.D., GD Art App., Dip E Ad हे सर्व शिक्षण अभिनव कला महाविद्यालय येथून पूर्ण केले असून MFA डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर येथून पूर्ण केलेले आहे.

या प्रसंगी सचिव पाठक म्हणाले, ‘विद्यार्थी हित केंद्रस्थानी ठेऊन प्रा. बोरावके त्यांचे काम करतील ही अपेक्षा आहे. या पूर्वी मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीला, त्यांचे कला प्रदर्शन संपन्न झालेले आहे. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून अशी प्रा. बोरावके यांची ख्याती आहे, अनेक वर्ष त्यांनी अभिनव कला महाविद्यालयात विभाग प्रमुख पदाचे काम सक्षमपणे केले आहे. प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल कला क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे.

प्रा. बोरावके म्हणाले, ‘माझे महाविद्यालयातील शिक्षण अभिनव कला मध्येच झाले आहे आणि आमच्याच महाविद्यालयात प्राचार्य पदी काम करण्याची मला संधी दिल्याबदद्दल सचिव पाठक आणि संस्था यांचा मी आभारी आहे. माझ्यासाठी नक्कीच हा भावनिक क्षण आहे. सध्याच्या ए.आय.च्या युगात देखील चित्रकारांच्या  हातातील रेषांचे महत्व संपणार नाही असे त्यांनी म्हणताच विद्यार्थांनी टाळ्यांचा कडकडाट झाला.  

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

SIR विरोधात आज दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन; ११ मेट्रो स्थानकांचे प्रवेश-निर्गम बंद

ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत कडक सुरक्षा, तर...

राष्ट्रपित्याच्या  १९४८ मधील स्मृती स्तंभाला विद्यार्थ्यांच्या श्रमाने झळाळी !

श्रमदान करत विद्यार्थ्यांनी केले स्वच्छता अभियान आळंदी :  राष्ट्रपिता महात्मा गांधी...