ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात लक्ष दुर्वा गणेशयाग संपन्न

Date:

मंदिरात मंत्रजागराचे आयोजन

पुणे : श्रावण शुद्ध चतुर्थी अर्थात विनायकी चतुर्थीनिमित्त पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात झालेल्या लक्ष दुर्वा गणेशयागाने मंदिर परिसर वेदमंत्रांच्या घोषाने दुमदुमून गेला. श्री जयती गजाननाच्या मूळ मूर्तीसमोर करण्यात आलेल्या या यागात एक लाख दुर्वांचे हवन करण्यात आले. यज्ञकुंडातून दरवळणारा धूप, वेदमंत्रांचा अखंड घोष आणि भक्तांच्या उपस्थितीत झालेली पूर्णाहुती व महाआरती यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार, खजिनदार हेरंब ठकार, विश्वस्त संगीता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मिहीर ठकार, मंदार ठकार, तेजस ठकार, हर्षद ठकार आदी यावेळी उपस्थित होते.

मंदिरात यानिमित्त मंत्रजागराचे आयोजन करण्यात आले होते. गणेशयागाच्या यागविधीनंतर पूर्णाहुती आणि महाआरतीने सोहळ्याची सांगता झाली. यावेळी गणेशभक्तांनी श्री जयती गजाननाच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेतले तसेच यागादरम्यान झालेल्या मंत्रोच्चाराचे श्रवण केले.

विनायक ठकार म्हणाले, श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुःख आणि अनिष्टतेचा नाश करणारी म्हणून दुर्वेचे महत्त्व सांगितले जाते. दुर्वेच्या उत्पत्तीच्या कथा श्री गणेश पुराण तसेच श्री मुद्गल पुराणात आढळतात. दुर्वेची महती सांगणारे दुर्वा स्तोत्रही मुद्गल पुराणात उपलब्ध आहे. पार्वती देवीने भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत केलेल्या श्री गणेश पार्थिव पूजाविधीची सुरुवात श्रावण शुद्ध चतुर्थीपासून केल्याचे संदर्भ आढळतात. या पार्श्वभूमीवर विनायकी चतुर्थीचे औचित्य साधून लक्ष दुर्वा गणेशयागाचे आयोजन करण्यात आले होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

साध्या-साध्या गोष्टींतून विनोद टिपता आला पाहिजे

ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांचे मत; आदिश जैन...

२,५०० कोटींच्या सीमा शुल्क चुकवेगिरीचे जाळे DRI कडून उद्ध्वस्त

बांगलादेशी असल्याचे भासवून आग्नेय आशियाई सुपारीची आयात;SAFTA अंतर्गत शुल्कमाफीचा...

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने नगररचना संचालनालयात रक्तदान शिबिर संपन्न

पुणे, दि. १६: भारताच्या ८० व्या स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून,...

रक्तदानातून मानवतेचा श्वास जपू : नरेंद्राचार्यजी

परमवंदनीय समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांच्या रजत पुण्यस्मृती वर्षानिमित्त...