पुणे शहर पोलीस दलातील २५ अधिकारी-अंमलदारांना ‘अति-उत्कृष्ट’ व ‘उत्कृष्ट सेवा पदक’

Date:

पोलीस आयुक्त अमितेश कुमारांसह ९ जणांना अति-उत्कृष्ट सेवा पदक; सह पोलीस आयुक्त संजय दराडेंसह १६ जणांना उत्कृष्ट सेवा पदक

पुणे : महाराष्ट्र पोलीस दलामध्ये दीर्घकालीन, निष्कलंक आणि उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या अधिकारी व अंमलदारांचा स्वातंत्र्यदिनानिमित्त गौरव करण्यात आला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील २५ अधिकारी व अंमलदारांना केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांच्याकडून अति-उत्कृष्ट सेवा पदक आणि उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.

यामध्ये ९ जणांना अति-उत्कृष्ट सेवा पदक, तर १६ जणांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.

अति-उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी-अंमलदार

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे, नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस फौजदार दिलीप दिगंबर ज्ञानपुरे, लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार नितीन तुळशीराम जगताप, गुन्हे शाखेतील सहायक पोलीस फौजदार राजस हुसेन शेख, गुन्हे शाखेतील सहायक पोलीस फौजदार राजेंद्र आत्माराम पालांडे, विश्रामबाग पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदार सत्यवान बबन साबळे आणि गुन्हे शाखेतील सहायक पोलीस फौजदार संतोष भगवान कुचेकर यांना अति-उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.

उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी-अंमलदार

सह पोलीस आयुक्त संजय दराडे, येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास भिकू डाबेराव, सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्वप्नाली चंद्रकांत शिंदे, लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश अंबादास गिते, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत शांताराम लोहोकर, समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित अधिकाराव सिदपाटील आणि स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुधीर अंकुश इंगळे यांना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.

तसेच स्वारगेट पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार योगराज हरिश्चंद्र घाटगे, लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई हनुमंत विलास थोपटे, नियंत्रण कक्षातील पोलीस हवालदार मच्छिंद्र कांतीलाल भंडारे, विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सचिन सुभाष अहिवळे, फरासखाना पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राहुल रामचंद्र माने, डेक्कन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संदीप राम पाटील, विश्रामबाग पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार शैलेश शरद सुर्वे, गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार सत्यवान ज्ञानोबा ढोंबरे आणि विशेष शाखेतील महिला पोलीस हवालदार धनश्री विजय कामठे यांनाही उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस दलातील या अधिकारी आणि अंमलदारांनी केलेल्या प्रदीर्घ, निष्कलंक आणि गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेऊन त्यांचा या पदकांनी गौरव करण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यातील ३७ वर्षे जुन्या कॅम्पमधील ‘बर्गर किंग’वर FDAचा दणका; अस्वच्छ किचन, तेलाच्या वापरावरही आक्षेप

अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेतील गंभीर त्रुटींनंतर परवान्यावर कारवाई; तुकाराम मुंढेंच्या...

तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्ग ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करावा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

▪️तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्ग ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त; अतिक्रमणे हटविण्यासाठी १५ दिवसांची...

ओव्हर हेड केबल्सला वर्षाची मुदत: स्थायी समितीकडून धोरणाला मंजुरी

भूमिगत केबलसाठी एक खिडकी व्यवस्था पुणे : शहरातील रस्ते,...

तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्ग ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करावा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश

▪️तळेगाव–चाकण–शिक्रापूर मार्ग ३१ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त; अतिक्रमणे हटविण्यासाठी १५ दिवसांची...