स्पाच्या नावाखाली अनैतिक मानवी वाहतुकीचा आरोप; पुणे पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई, ४ महिलांची सुटका

Date:

मांजरी आणि हडपसरमध्ये संयुक्त छापे; तिघांना अटक, सुमारे १.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या परिमंडळ-६ अंतर्गत मांजरी आणि हडपसर परिसरात स्पाच्या नावाखाली अनैतिक मानवी वाहतुकीचा व्यवसाय सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी दोन ठिकाणी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, संबंधित प्रकरणांत तिघांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्वाण स्पा, शेवाळेवाडी, मांजरी येथे मांजरी आणि मुंढवा पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने छापा टाकला. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी स्पा मालक सेबू उर्फ शेखर मुबारक अली शेख याला अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरून मोबाईल फोन, लॅपटॉप, एटीएम स्वाइप मशीन, फोन-पे स्कॅनर आणि अन्य साहित्य असा सुमारे ९५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा, १९५६ मधील कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अरमानी स्पा, तुपे कॅपिटल, डी.पी. रोड येथे हडपसर आणि काळेपडळ पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली. या ठिकाणाहून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली.

या प्रकरणात इबादुल अन्वर हुसेन (वय १९, व्यवस्थापक) आणि अरमान रहमतअली खान (वय २०) यांना अटक करण्यात आली असून, एका अनोळखी व्यक्तीचाही आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. या कारवाईत मोबाईल फोन, फोन-पे स्कॅनर आणि अन्य साहित्य असा सुमारे ७० हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सुटका करण्यात आलेल्या चारही पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून, त्यांना आवश्यक समुपदेशन, संरक्षण आणि पुनर्वसनासाठी रेस्क्यू फाउंडेशन येथे सुरक्षित ठेवण्यात आले असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

मांजरी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम, तर हडपसर पोलीस ठाण्यातील प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील आणि परिमंडळ-६ चे पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरी, मुंढवा, हडपसर आणि काळेपडळ पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकांनी केली.

पुणे शहर पोलिसांनी नागरिकांना परिसरात संशयास्पद अथवा बेकायदेशीर प्रकार आढळल्यास जवळच्या पोलीस ठाण्याला तातडीने माहिती देण्याचे आवाहन केले असून, माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अतिरेकी धमक्यांना न जुमानता काश्मीरमध्ये साजरा होणार गणेशोत्सव

काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मूर्ती प्रदान ⁠सलग...

पदाधिकारी-नगरसेवकांमध्ये समन्वय वाढवणार; सर्वांच्या प्रश्नांवर तोडगा काढू : मुरलीधर मोहोळ

१२६ नगरसेवकांशी संवादानंतर मोहोळ माध्यमांसमोर; महापौर, सभागृह नेते आणि...

आशाजींची गाणी कित्येक पिढ्यांना आनंद देत राहतील– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

• आशा भोसले यांच्या ९३ व्या जन्मदिनानिमित्त संगीतकार ए....