भारतातील 84% महिला उद्योजिका डिजिटल पेमेंट साधनांचा करतात वापर

Date:

डीबीएस बँक इंडियाच्या ‘वुमन अँड फायनान्स’ संशोधन अभ्यासातील निष्कर्ष

पेमेंट्सपलीकडे जाऊन सर्वेक्षणातील 38% महिला उद्योजिका कर्ज आणि क्रेडिट प्लॅटफॉर्म्सचा , तर 29% ब्रोकरेज प्लॅटफॉर्मचा वापर करतात

मुंबई – एमएसएमई डे 2026 च्या अनुषंगाने डीबीएस बँक इंडियाने आपल्या ‘वुमन अँड फायनान्स’ मालिकेतील दुसरा अहवाल सादर केला आहे. या अभ्यासासाठी डेलॉइट टुश तोहमात्सु इंडिया एलएलपी (डीटीटीआय एलएलपी) यांनी संशोधन भागीदार म्हणून काम केले आहे.

द डिजिटल ऑपॉर्च्युनिटी: अॅक्सेस, अडॉप्शन अँड ट्रस्ट या अहवालात भारतभरातील कमावत्या महिलांचा डिजिटल पेमेंट्स, बँकिंग, क्रेडिट आणि गुंतवणूक प्लॅटफॉर्म यांच्यामध्ये असलेला सहभाग अभ्यासण्यात आला आहे. या अभ्यासात उत्तर भारत (23%), दक्षिण भारत (36%), पूर्व भारत (14%) आणि पश्चिम भारत (27%) येथील एकूण 1,342 महिलांकडून माहिती गोळा करण्यात करण्यात आली. त्यामध्ये महिला उद्योजिका, उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या (HNW) महिला तसेच ग्रामीण भागातील कमावत्या महिलांच्या दृष्टिकोनाचा समावेश आहे.

या अहवालाच्या नव्या आवृत्तीत जीवनातील विविध टप्पे, उत्पन्नाचे विविध स्तर आणि भौगोलिक क्षेत्रांनुसार महिलांच्या आर्थिक प्रवासावर डिजिटलायझेशनचा कसा प्रभाव पडत आहे, यावर भर देण्यात आला आहे. तसेच विविध गटांमधील खर्चाची प्राधान्ये, डिजिटल स्वीकारामागील प्रमुख घटक आणि सुरक्षित डिजिटल बँकिंग पद्धतींबाबतची जागरूकता यांचाही अभ्यास करण्यात आला आहे.

या निष्कर्षांनुसार, सर्वेक्षणातील विविध गटांमध्ये महिला उद्योजिका डिजिटल आर्थिक साधने आणि प्लॅटफॉर्मचा सर्वाधिक सक्रियपणे वापर करतात. डिजिटल पेमेंट साधनांचा वापर सर्वाधिक असून 84% महिला उद्योजिका त्यांचा वापर करतात. सर्व गटांमध्ये यूपीआयचा वापर सातत्याने वाढत असून, सर्वेक्षणातील 72% महिला उद्योजिका, 77% उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या महिला आणि 54% ग्रामीण भागातील उत्पन्न मिळविणाऱ्या महिला यूपीआयचा वापर करतात. यावरून भारतातील डिजिटल पेमेंट्स पायाभूत सुविधांचा वाढता व्यापक वापर अधोरेखित होतो.

बँकिंग आणि पेमेंट्सपलीकडेही महिला उद्योजिका डिजिटल आर्थिक साधने आणि प्लॅटफॉर्मच्या व्यापक परिसंस्थेशी अधिकाधिक जोडल्या जात आहेत. सर्वेक्षणातील 38% महिला उद्योजिका कर्ज आणि क्रेडिट प्लॅटफॉर्मचा वापर करतात, तर 29% ब्रोकरेज प्लॅटफॉर्मचा वापर करतात. सर्वेक्षणातील उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या महिलांपैकी 28% महिला त्यांच्या गुंतवणुकीसाठी सक्रियपणे ब्रोकरेज प्लॅटफॉर्मचा वापर करतात. यावरून डिजिटल गुंतवणूक साधनांमुळे होत असलेली वाढती सोय आणि सहज उपलब्धता यामुळे त्यांचा वापर करण्याबाबतचा आत्मविश्वास आणि प्राविण्य वाढत असल्याचे दिसून येते.

ग्लोबल ट्रान्झॅक्शन सर्व्हिसेस, कॉर्पोरेट बँकिंग, फायनॅन्शियल इन्स्टिट्यूशन्स अँड एसएमईजचे व्यवस्थापकीय संचालक आणि कंट्री हेड दिव्येश दलाल म्हणाले, “या अहवालातील निष्कर्ष महिलांच्या आर्थिक व्यवहारांमधील सहभागाच्या पद्धतीत होत असलेला सकारात्मक बदल अधोरेखित करतात. महिला उद्योजिकांसाठी डिजिटल साधने व्यवसाय व्यवस्थापनाचा अविभाज्य भाग बनत असून, पेमेंट्स, क्रेडिट, पेरोल, ग्राहक संपादन तसेच भविष्यातील नियोजनापर्यंतच्या सर्व बाबींमध्ये ती सहाय्य करत आहेत. तसेच डिजिटल स्वीकाराला चालना देण्यासाठी विश्वास, सुविधा आणि सहज उपलब्धता यांचे महत्त्वही या अभ्यासातून स्पष्ट होते.”

ते पुढे म्हणाले, “डिजिटल साधनांचा स्वीकार अधिक सखोल होत असताना उद्योजक कामकाज कार्यक्षमतेत वाढ करणारे आणि त्यांच्या वाढीच्या महत्त्वाकांक्षांना पाठबळ देणारे उपाय शोधत आहेत. हा वेग कायम राखण्यासाठी पारंपरिक बँकिंगच्या पलीकडे जाऊन उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या प्रत्येक टप्प्यावर सहाय्य करणारी परस्पर-संलग्न परिसंस्था उभारणे आवश्यक आहे. या घटकसमूहाविषयीची आमची समज अधिक व्यापक करत आणि बदलत्या गरजांनुसार सातत्याने नावीन्यपूर्ण उपाय विकसित करत महिला उद्योजिकांना त्यांचा व्यवसाय उभारण्यासाठी आणि विस्तारण्यासाठी आम्ही सहाय्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.”

इतर महत्त्वपूर्ण निष्कर्ष

शहरी भारतातील उत्पन्न मिळविणाऱ्या महिलांमध्ये क्रेडिट कार्डचा वापर वेगाने वाढत आहे.

सर्वेक्षणातील निम्म्या (50%) महिला उद्योजिका वैयक्तिक क्रेडिट कार्डचा बऱ्याचदा वापर करतात. यामध्ये 19% महिला दररोज, तर 31% महिला आठवड्यातून काही वेळा क्रेडिट कार्ड वापरतात. उच्च उत्पन्न मिळविणाऱ्या महिलांमध्ये 53% प्रतिसादकर्त्या क्रेडिट कार्डचा वापर करतात. त्यायोगे यूपीआय नंतर ते सर्वाधिक वापरले जाणारे दुसरे पेमेंट माध्यम ठरते.

प्रवासाशी संबंधित लाभांना क्रेडिट कार्ड सुविधांमध्ये सर्वाधिक पसंती

हॉटेल ऑफर्स, एअर माइल्स, लाउंज अॅक्सेस आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स यांसारखे प्रवासाशी संबंधित लाभ हे महिला उद्योजिका आणि उच्च उत्पन मिळविणाऱ्या महिला या दोन्ही गटांमध्ये सर्वाधिक पसंतीचे क्रेडिट कार्ड लाभ असून, 65% प्रतिसादकर्त्यांनी त्यांना प्राधान्य दिले आहे. विशेषतः तरुण प्रतिसादकर्त्यांमध्ये ही पसंती अधिक ठळक असून, 25–30 वर्षे वयोगटातील उच्च उत्पन मिळविणाऱ्या महिलांमध्ये ती 70% पर्यंत, तर 26–35 वर्षे वयोगटातील महिला उद्योजिकांमध्ये 68% पर्यंत दिसून आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

साचलेल्या पाण्यात करंट उतरल्याने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई-मुंबई-ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान आणखी एक धक्कादायक घटना...

भीमाशंकर परिसरातील आदिवासी-कातकरी विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा साहित्य व शालेय वस्तूंचे वाटप

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

भाजप पुणे शहराच्या ‘शासकीय योजना प्रमुख’पदी गणेश शेरला यांच्या निवड

तीन दशकांच्या सामाजिक- राजकीय अनुभवाची दखल; धीरज घाटे यांच्या...

२४ तासांत खडकवासला धरण साखळीत ०.२० टीएमसीची वाढ

💧 एकूण पाणीसाठा : ३.९७ टीएमसी (१३.६१%) पुणे | पुणे...