पुणे : पुण्यनगरीचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दिनांक २५ ऑगस्ट २०२४, रविवार रोजी श्रींच्या उत्सव मंडपात रक्तदान शिबिर आयोजित केले होते. मंडळ दरवर्षी विविध समाजोपयोगी कार्ये करत असते. रक्तदान शिबिर हे त्यापैकी एक.
मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिली. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासांमधे शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.
ब्लड बँकेच्या रेफ्रिजरेटरमध्ये रक्त ४-५ आठवड्यांपर्यंत सुरक्षित ठेवता येते.
रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते.
आपल्या १४० कोटी लोकसंख्येच्या भारत देशात केवळ दरवर्षी १ कोटी ते १ कोटी ५० लाख लिटर इतकेच रक्त रक्तदानातून उपलब्ध होते.
तरी रक्तदानाचे महत्व लोकांना, कार्यकर्त्यांना कळावे आणि ह्याची किती गरज आहे हे मंडळाने लक्षात घेत दरवर्षी उपक्रम यशस्वीरित्त्या पार पाडत समाजकल्याणासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करत आहे.
ह्यावर्षी मंडळाला देशस्थ ऋग्वेदी शिक्षणउत्तेजक संस्थेची मोलाची साथ या कार्यात लाभली.
२००९ साली स्वाईन फ्लू च्या वेळेस मंडळाने हे शिबिर राबविण्यास सुरुवात केली. २०२४ हे ह्या शिबिराचे १५ वे वर्षे आणि ह्यावर्षी विक्रमी असे २०४ पिशव्यांचे रक्तदान जमा झाले. ह्यामध्ये लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद, उत्साह आणि कार्यकर्त्यांमधील समाज सेवेकरता असणार भाव ह्यामुळेच हे साध्य झाले अंशी भावना मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत शेटे यांनी व्यक्त केली. ह्या रक्तदान शिबिरात संघर्ष ढोल ताशा पथक, रुद्र गर्जना ढोल ताशा पथक, शौर्य ढोल ताशा पथक आणि रमणबाग युवा मंच हे सुद्धा सहभागी झाले होते.
मंडळाच्या सर्व विश्वस्त, सभासद आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या मनःपूर्वक प्रयत्नांमुळेच अतिशय स्तुत्य उपक्रम उत्तमपणे पार पडला.
श्री. कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे मंडळाचे अध्यक्ष श्री. श्रीकांत शेटे, उपाध्यक्ष श्री. सूरज गाढवे, श्री. अनिल पानसे, विश्वस्त श्री. निलेश वकील, श्री. जयंत देशपांडे हे मान्यवर उपस्थित होते. तसेच श्री. राजेंद्र कुलकर्णी आणि श्री. सुनील पारखी ह्यांची मोलाची साथ लाभली.