भर पावसात अनुसूचित जाती वर्गातील ५९ जातींचा जिल्हाधिकारीं कार्यालयावर धडकला मोर्चा

Date:

जनगणनेनंतरच  अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करण्याची ‘महामोर्चाद्वारे रिपब्लिकन पक्ष (आठवले) ची आग्रही मागणी

पुणे

अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा निर्णय राष्ट्रीय जातनिहाय जनगणनेनंतरच अचूक लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अमलात आणावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया नजीकच्या आंबेडकर पुतळ्यापासून भव्य महामोर्चा काढण्यात आल्या. पक्षाचे पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण जिल्हयातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ५९ जातींमधील नागरिक भर पावसात उत्साहाने या मोर्चात सहभागी झाले. 

या मोर्चात पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर, पुणे शहराध्यक्ष  संजय सोनवणे,  प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव,  पिंपरी चिंचवड अध्यक्ष कुणाल न्हावळकर,  पुणे जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम,  महिला आघाडी अध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, प्रदेश उपाध्यक्ष हुलगेश चलवादी, बाळासाहेब भागवत, संगीता आठवले प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, सरचिटणीस महिपाल वाघमारे,  नगरसेविका हिमाली कांबळे, सरचिटणीस श्याम सदाफुले, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकला आठवले, कालिदास गायकवाड, अर्जुन आल्हाट, विनोद टोपे, संतोष खरात, मंगल रासगे, सुन्नाबी शेख, शोभा झेंडे, मीना गालटे, चांदणी गायकवाड, मीनाज मेमन, वसंत वाघमारे, क्रिस्टोपर राजमनी, डोर्थी थॉमस, संदीप धाडोरे, आशिष भोसले, सशाक माने, अविनाश कादम, अविनाश गायकवाड, अंकिता भालेराव, रेशमा शेख, शिवाजी उजागरे, संजय पटणपल्लू, विशाल शेळके, उमेश कांबळे, प्रवीण ओव्हाल, आकाश बहुले, भारत पवार, सुनिल गवळी, अक्षय अवसरमल, फिरोज खान, निलेश रोकडे, हनुमंत गायकवाड, अतुल भालेराव, नारायण गायकवाड, सशाक माने, मिलिंद बनसोडे, हर्षा लोंढे, हर्षा गायकवाड, अयुब जहागीरदार, संग्राम साळवे, संग्राम घंगाले, सुनिल नाईकनवरे, दिनेश नहारिया, बापू बाराथे, अभिमन्यू सूर्यवंशी, सुदर्शन कांबळे, गौतम कदम, मिट्टू वाघमारे, ईश्वर ओव्हाळ, सिकंदर सूर्यवंशी, यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. बौद्ध समाज आणि इतर अनुसूचित जाती जमाती मधील ऐक्य व्यक्त करणाऱ्या घोषणा या मोर्चात देण्यात आल्या.

अनुसूचित जातींतील ५९ समाजघटकांमध्ये सामाजिक ऐक्य टिकवून ठेवणे ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)ची ठाम भूमिका आहे. उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेमुळे कोणत्याही समाजघटकात मतभेद किंवा दुरावा निर्माण होऊ नये, यासाठी ती प्रक्रिया राष्ट्रीय जातीय जनगणना पूर्ण झाल्यानंतरच राबविण्यात यावी. जनगणनेतील लोकसंख्येच्या अचूक आकडेवारीच्या आधारेच न्याय्य निर्णय घेणे शक्य होणार आहे.  अनुसूचित जातींतील विविध समाजघटकांनी सामाजिक न्याय, समान हक्क आणि आरक्षणासाठी अनेक दशकांपासून एकत्रितपणे संघर्ष केला आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घाईघाईने घेण्याऐवजी वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे घेणे आवश्यक आहे. प्रत्येक जातीची अचूक लोकसंख्या जनगणनेतून समोर आल्यानंतरच उपवर्गीकरणाबाबत धोरण निश्चित केल्यास सर्व समाजघटकांना न्याय मिळू शकेल. राज्यातील उर्वरित ५८ अनुसूचित जातींनाही शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी मिळाव्यात, ही पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच २०२७ च्या जनगणनेनंतर लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षणाच्या रचनेचाही पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

अनुसूचित जाती मधील 59 समाज घटकांची अचूक लोकसंख्या माहीत नसताना उपवर्गीकरणाची अंमलबजावणी झाल्यास या समाज घटकांमध्ये रोष उत्पन्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनुसूचित जातींमधील ऐक्य आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी जनगणने नंतर लोकसंख्येच्या प्रमाणात उपवर्गीकरण करण्याची मागणी या मोर्चाद्वारे अधोरेखित करण्यात आली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरकारच देतेय आता भेसळयुक्त पेट्रोल:E-20 पेट्रोल मुद्द्यावरून मोठे आंदोलन उभारण्याची तयारी

नवी दिल्ली : 'नीट' पेपरफुटी प्रकरणात जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर...

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते समाजगुरूंचा सन्मान…

पुणे, दि.27 : विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या,...

‘विद्यार्थ्यांसोबत गुन्हेगारांसारखे वर्तन यापूर्वी कधीही झाले नाही’:संसदेत खरगे यांचा हल्ला, गदारोळात अँटी पेपर लीक विधेयक सादर

नवी दिल्ली-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात सोमवारीही सत्ताधारी...

पुण्यात काँग्रेसचा कँडल मार्च; नीट पेपरफुटी प्रकरणी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

पुणे-नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली...