पुण्यात काँग्रेसचा कँडल मार्च; नीट पेपरफुटी प्रकरणी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी

Date:

पुणे-नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुण्यातील कोथरूड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवारी कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून दशभुजा गणपती मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या या मार्चचे नेतृत्व काँग्रेस पक्षाचे गटनेते चंदू शेठ कदम आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले. या वेळी मोठ्या संख्येने युवक-युवती सहभागी झाले असून केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी नगरसेवक रफिक शेख नगरसेवक विशाल मलके,नगरसेवक साहिल केदारी,नगरसेवक सुनील शिंदे,
नगरसेविका दिपाली डोख,नगरसेविका अश्विनी लांडगे,नगरसेविका वैशाली भालेराव,माजी नगरसेवक अविनाश बागवे,माजी नगरसेवक गोपाळ तिवारी,माजी नगरसेवक शिवा मंत्री, सौरभ आमराळे, केदार सातपुते,अभिजित गोरे,प्रथमेश अबनावे,स्वाती शिंदे यांच्या सह आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेसचे गटनेते चंदू शेठ कदम म्हणाले, “केंद्रात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर अनेक गंभीर घटना घडल्या असून प्रत्येक वेळी विरोधी पक्षांनी आवाज उठवला. मात्र नीट पेपरफुटी प्रकरणात देशभरातील तरुणाई रस्त्यावर उतरली आणि त्यांच्या संघर्षामुळे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली. हा तरुणाईच्या एकजुटीचा विजय आहे.”
ते पुढे म्हणाले, “दिल्लीतील आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्या युवकांवर झालेल्या लाठीमाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी. तसेच, नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकारने प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी. या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचा लढा सुरू राहील.”

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘विद्यार्थ्यांसोबत गुन्हेगारांसारखे वर्तन यापूर्वी कधीही झाले नाही’:संसदेत खरगे यांचा हल्ला, गदारोळात अँटी पेपर लीक विधेयक सादर

नवी दिल्ली-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात सोमवारीही सत्ताधारी...

मेंदूचे आरोग्य जपा,मेंदूच्या आजारांबाबत जनजागृती ही काळाची गरज-डॉ. निर्मल सूर्या

पुणे, २७ जुलै : स्ट्रोक, पार्किन्सन्स, डिमेन्शिया यांसारख्या मेंदूच्या...