पुणे, दि.२७: रेल्वे भरती बोर्ड मार्फत पॅरा- मेडिकल पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी १६ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
भरतीसाठीचे अर्ज रेल्वे भरती बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन करणे आवश्यक आहे. अर्ज शुल्काच्या भरणासह अर्जातील दुरुस्त्या १७ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर पर्यंत करता येतील. यामध्ये ‘खाते तयार करा’ या अर्जात भरलेले तपशील आणि ‘रेल्वे भर्ती मंडळ निवडले’ या तपशीलात बदल करता येणार नाही याची इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी.
या पदांसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तपशीलवार केंद्रीकृत रोजगार सूचना क्र. ०४/२०२४ पहावी, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी कळविले आहे.
0000