पुणे-मुसळधार पावसाने आणि धरणात वाढू लागलेल्या पाणी साठ्याने येणारा पूर यामुळे पूरग्रस्तांच्या मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफची दोन पथके एकता नगर मध्ये आणि एक टीम बालेवाडी येथे तैनात करण्यात आल्या आहेत.
*एनडीआरएफच्या पथकांना पाचारण, बोटीही बचाव कार्यात दाखल
*नागरिकांना घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन
*मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा, मदत कार्याला गती देण्याचे निर्देश, नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश
*एकता नगर भागातील मदत कार्याचाही अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
*पाणी असलेल्या सखल भागातील *नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचा सूचना.
*उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात, मदत कार्याला गती देण्याचे निर्देश
*पावसाचा जोर लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
*पुणे महानगरपालिकेच्या ८ बोटी आणि बचाव पथक मदातकार्यासाठी नियुक्त
*विद्युत धक्का लागल्याने नदीपात्रात स्टॉल्स काढण्यासाठी गेलेल्या तीन नागरिकांचा मृत्यू
*पुरात अडकलेल्या नागरिकांना खाद्य पदार्थ व पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना