मालाडमध्ये दहीहंडी खेळताना विटांचा कॉलम कोसळला; ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

Date:

दोरीच्या ताणामुळे कच्चा कॉलम कोसळल्याचा प्राथमिक अंदाज; मालवणी परिसरात हळहळ

मुंबई : मालाड पश्चिमेकडील मालवणी परिसरात दहीहंडी खेळताना विटांचा कच्चा कॉलम कोसळून सात वर्षीय रुद्र कदम याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. दहीहंडीची दोरी बांधलेल्या कॉलमवर ताण आल्याने तो अचानक कोसळल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

मालाड पश्चिमेतील मार्वे रोडवरील चिकूवाडी परिसरातील एकता वेल्फेअर सोसायटीमध्ये दुपारी तीनच्या सुमारास स्थानिक मुले दहीहंडी खेळत होती. दहीहंडीची दोरी एका बाजूला झाडाला, तर दुसऱ्या बाजूला इमारतीच्या तळमजल्यावरील विटांच्या कच्च्या कॉलमला बांधण्यात आली होती.

मुले दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करत असताना दोरीच्या ताणामुळे विटांचा कॉलम अचानक कोसळला. त्याखाली रुद्र दबला गेल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपस्थितांनी त्याला तातडीने मालवणी जनरल रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि महापालिका प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून दुर्घटना नेमकी कशी घडली आणि यामध्ये कोणाचा निष्काळजीपणा होता का, याचा तपास सुरू आहे.

उत्सवाच्या दिवशीच घडलेल्या या दुर्घटनेमुळे मालवणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे दहीहंडी तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दोऱ्या, मंडप किंवा इतर साहित्य बांधताना सुरक्षित आणि मजबूत आधार वापरण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अमरावतीतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी कुटुंबीयांशी डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद

गोपनीयता राखा, नशाखोरी व टवाळखोरीला आळा घाला; आरोपीला जलद...

झीचे संस्थापक सुभाष चंद्रांविरोधात CBIची FIR; ₹1,322 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

LIC Housing Financeच्या तक्रारीवरून कारवाई; कथितरीत्या फुगवलेली नेटवर्थ दाखवून...

फडणवीस साहेब,आश्वासने खूप झाली, हिंजवडी मेट्रो कधी धावणार, ते सांगा

-माजी आमदार मोहन जोशी पुणे : हिंजवडी आयटी पार्क मधील...

राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष आढावा; उच्चस्तरीय समिती १२ सप्टेंबरला पुण्यात

विद्यार्थी-उमेदवारांसह पालक, शिक्षक, क्लासेस आणि नागरिकांच्या सूचना घेणार; जिल्हाधिकारी...