फडणवीस साहेब,आश्वासने खूप झाली, हिंजवडी मेट्रो कधी धावणार, ते सांगा

Date:

-माजी आमदार मोहन जोशी

पुणे : हिंजवडी आयटी पार्क मधील सुविधांबद्दल आश्वासने देण्यापेक्षा हिंजवडी मेट्रो धावणार कधी? ते सांगा. असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे केला आहे.

मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री सुनेत्रा पवार हे पिंपरी चिंचवड भागाला भेट देतात. तेव्हा हिंजवडी आयटी पार्कमधील सुविधांबाबत आश्वासने देतात, असा आजवरचा अनुभव आहे. हिंजवडीतील अंतर्गत रस्त्यांसाठी ४२६ कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. सध्याचा शासकीय कारभार पहाता प्रत्यक्ष रस्ते होण्यासाठी ३, ४ वर्षांचा कालावधी लागेल. हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतुकीचा प्रश्न अतिशय बिकट झाला असून तिथे काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या, रहिवाशांच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. त्यामुळे अजून वेळ न घालवता हिंजवडी मेट्रो त्वरीत चालू करावी, अशी आमची स्पष्ट मागणी आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी पुणे मेट्रो मार्गिका ३, या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मेट्रो सुरक्षा आयुक्तांची मंजूरी मिळालेली आहे. मेट्रो च्या सर्व चाचण्याही झालेल्या आहेत. ही सर्व तयारी झालेली असताना मेट्रो का सुरू होत नाही? महामेट्रो च्या वेळापत्रकानुसार या चालू वर्षातील मार्च महिन्यापूर्वीच मेट्रो चालू होणे अपेक्षित होते. मुदत संपून त्यावर पाच महिनेही उलटून गेले, तरी मेट्रो धावू लागलेली नाही. मेट्रो प्रशासनाच्या मते तांत्रिक बाबी पूर्ण करून ३१ मे पूर्वीच मेट्रो धावू लागली असती. परंतु भाजप सरकारने मेट्रोला हिरवा कंदील दाखवायला वेळ का लावला आहे? असा प्रश्न उपस्थित होतो.

भाजपला उदघाटनाच्या निमित्ताने मिरवून घ्यायचे आहे, म्हणून मेट्रो थांबवली आहे का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात आहे, त्याचे उत्तर मुख्य मंत्र्यांनी द्यायला हवे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झीचे संस्थापक सुभाष चंद्रांविरोधात CBIची FIR; ₹1,322 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

LIC Housing Financeच्या तक्रारीवरून कारवाई; कथितरीत्या फुगवलेली नेटवर्थ दाखवून...

राज्यातील भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष आढावा; उच्चस्तरीय समिती १२ सप्टेंबरला पुण्यात

विद्यार्थी-उमेदवारांसह पालक, शिक्षक, क्लासेस आणि नागरिकांच्या सूचना घेणार; जिल्हाधिकारी...

पंजाबमध्ये स्वराज ट्रॅक्टर्स-महिंद्रा सस्टेनचा ४२ मेगावॉट सौर प्रकल्प कार्यान्वित

स्वराजच्या उत्पादन युनिट्सच्या सुमारे ५० टक्के वीज गरजा पूर्ण...