नाट्यस्पर्धा हा महावितरणचा सांस्कृतिक ठेवा; आव्हानात्मक सेवेसोबत कर्मचाऱ्यांकडून कलागुणांचे जतन – श्री. राजेंद्र पवार

Date:

पुण्यात ‘आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा-२०२६’ चे उद्घाटन

              पुणे, दि. २१ऑक्टोबर२०२६: महाराष्ट्राला नाट्यकलेची उज्ज्वल परंपरा आहे. वीज क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे काम २४ तास आव्हानात्मक व अविरत सेवा देणारे आहे. या दैनंदिन कामाच्या धकाधकीतही कर्मचाऱ्यांमधील सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी आयोजित करण्यात येणारी ही नाट्यस्पर्धा म्हणजे महावितरणचा एक मौल्यवान सांस्कृतिक ठेवा आहे, असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी बुधवारी (दि.२१) केले.

पुणे येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये महावितरण अंतर्गत ‘आंतर प्रादेशिक राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा-२०२६’ च्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप जगदाळे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य अभियंते सर्वश्री इब्राहिम मुलाणी, दत्तात्रेय बनसोडे, स्वप्निल काटकर, धर्मराज पेठकर, मिलिंद दिग्रसकर, आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव पडळकर तसेच मुख्य समन्वयक श्री. संजय ढोके, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. ललित गायकवाड यांची उपस्थिती होती.

संचालक श्री. पवार पुढे म्हणाले की, नाटकामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संवाद कौशल्य व वेळेचे नियोजन यासारखे गुण विकसित होतात आणि हीच सकारात्मक ऊर्जा त्यांच्या कार्यालयीन कामकाजातही दिसून येत आहे. तर अध्यक्षीय मनोगतामध्ये श्री. दिलीप जगदाळे म्हणाले की, महावितरणमधील नाट्यकृतींचे सादरीकरण व्यावसायिक नाटकांच्या तोडीचे आहे आणि महावितरणची ही रंगभूमी नाट्याविष्काराने प्रगल्भ होत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्य अभियंता श्री. ज्ञानदेव पडळकर यांनी केले.

              या दोन दिवसीय स्पर्धेत चारही प्रादेशिक विभागांतून प्रथम ठरलेल्या नाटकांचे सादरीकरण होणार आहे. यात आजच्या पहिल्या सत्रात कोकण विभागाचे ‘ओल्या भिंती’च्या सादरीकरणाने नाट्य रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर पुणे विभागाचे ‘समोरच्या घरात’ नाट्यकृती सादर होणार आहे. दुसऱ्या दिवशी (दि.२२) छत्रपती संभाजीनगर विभागाचे ‘वारी’, नागपूर विभागाचे ‘थलाई कुथल’ ह्या नाट्यकृती सादर केल्या जाणार आहेत.

              सामाजिक व संवेदनशील विषयांवरील या कलाकृतींना उपस्थित प्रेक्षकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सूत्रसंचालन सौ. मृदुला शिवदे व सौ. भक्ती जोशी यांनी केले. तर अधीक्षक अभियंता श्री. सिंहाजीराव गायकवाड यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या १९१ पोलीस वीरांना पुण्यात मानवंदना; पोलीस स्मृतिदिनी शोक कवायत

पाषाण येथील पोलीस हुतात्मा स्मारकावर पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर...

विजयादशमी निमित्त पराक्रमी सेनाधिकारी सन्मान सोहळा

सैनिक मित्र परिवार, पुणे च्या वतीने आयोजन ; निवृत्त...

जागतिक पॉवरलिफ्टर प्रतिभा लोणे हिला ‘चक्रवर्ती सम्राट अशोक राज्य क्रीडारत्न पुरस्कार’ प्रदान

​पुणे: अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून...